20 जानेवारी 2020चं राशीफळ, वृषभ राशीला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

20 जानेवारी 2020चं राशीफळ, वृषभ राशीला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

मेष : नोकरीत अडचणी येण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी आजचा दिवस गोंधळानं व्यापलेला राहील. वरिष्ठांसोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.

कुंभ : नातेवाईकाची प्रकृती खराब होऊ शकते
कुटुंबातील एखाद्या सदस्याची प्रकृती खराब होण्याची शक्यता आहे. मेहनत अधिक, पण उत्पन्न कमी येण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होऊ शकते. आत्मविश्वास कमी होईल.रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता आहे.

मीन : नव्या प्रेमाची सुरुवात होऊ शकते
नव्या प्रेम संबंधाची सुरुवात होऊ शकते. जोडीदारासोबतचे संबंधामध्ये सुधारणा होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंबंधीच्या समस्या दूर होतील. परदेश यात्रेचा योग आहे. सामाजिक संपर्कांमुळे व्यवसायात फायदा होईल.

वृषभ : कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.व्यवसायात लाभ मिळण्याचा योग आहे. सामाजिक संपर्कामुळे लाभ मिळतील. कायदेशीर प्रकरणात तुमची बाजू मजबूत होईल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : नवे काम सुरू करू नका
आज कोणतेही काम सुरू करणं टाळा. व्यावसायिक करार पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. आळसाचा त्याग करा. उत्पन्न-खर्चावर नियंत्रण आणा. धार्मिक कामांमध्ये मन रमेल. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

कर्क : पायांच्या समस्यांमुळे अस्वस्थ
आज गुडघे किंवा पायांच्या दुखण्यामुळे तुम्ही अस्वस्थ असू शकता. कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. में सुधार होगा। कौटुंबिक दायित्वांची पूर्तता होईल. राजकारणातील जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.

सिंह : अपत्याकडून आनंदाची बातमी मिळेल
आज भाग्योदयाचा दिवस आहे. अपत्यासंदर्भात मिळालेल्या आनंदाच्या बातमीनं मनोधैर्य वाढेल. प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. रखडलेली कामे मित्रांच्या सहकार्यानं पूर्ण होतील. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील. मन शांत राहील.

(वाचा : 'या' राशीच्या व्यक्तींना प्रेमात पाडणे असते फारच कठीण)

कन्या : मनासारख्या नोकरीचा शोध पूर्ण होईल
आवडत्या नोकरीचा शोध आज पूर्ण होईल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. राजकारणात आवड वाढू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करणं महाग पडू शकते, त्यामुळे लक्ष द्या. कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा येईल.

तूळ : आर्थिक संकटाची शक्यता
आर्थिक संकट कायम राहण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. धार्मिक कामांमध्ये आवड निर्माण होऊ शकते.

वृश्चिक : जुन्या आजारातून सुटका होईल
जुन्या आजारातून सुटका मिळाल्यानं आत्मविश्वास वाढेल. आजचा संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण असेल. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. कौटुंबिक मित्रांसह यात्रा होण्याचा योग आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

धनु : कौटुंबिक वाद वाढू शकतात
आजच्या दिवसाची सुरुवात तणावानं होऊ शकते. कौटुंबिक वाद वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कष्टानुसार निकाल मिळतील. अचानक धनप्राप्ती होण्याचा योग आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील. व्यवहारात सावधगिरी बाळगा.

मकर : अचानक धनलाभाचा योग
आज भाग्योदयाचा दिवस आहे. ठरवलेली कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचा योग आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. वाहन खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. आईवडिलांचं सहकार्य मिळेल.