21 जानेवारी 2020चं राशीफळ, कुंभ राशीचे नवे प्रकल्प सुरू होण्याची शक्यता

 21 जानेवारी 2020चं राशीफळ, कुंभ राशीचे नवे प्रकल्प सुरू होण्याची शक्यता

मेष : नव्या प्रेमसंबंधांना मिळू शकेल मार्ग
नव्या प्रेमसंबंधांना मार्ग मिळण्याची शक्यता आहे. वृद्धांच्या सहकार्यामुळे वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भातील प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मौजमस्तीचे क्षण राहतील. कामाच्या ठिकाणी नव्या जबाबदारी मिळतील. सध्या लांबचा प्रवास करणं टाळा.

कुंभ : नवे प्रकल्प सुरू होण्याची शक्यता
व्यवसायात नवे प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. नव्या संपर्कांमुळे फायदा होऊ शकतो. उच्चाधिकाऱ्यांसोबतचा ताळमेळ प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता आहे. राजकारणात आवड निर्माण होईल.

मीन : दातासंबंधीच्या आजारामुळे हैराण
आज तुम्ही दातांसंबंधीच्या आजारामुळे हैराण असण्याची शक्यता आहे. मूड देखील बदलत राहण्याची शक्यता आहे. पैशांसंबंधी एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

वृषभ : व्यवसायात तोटा होण्याची शक्यता
शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात कठीण परिस्थितींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमतरता येईल. वादांपासून दूर राहा. जोडीदाराचं सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता
आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. मंगलमय कार्याच्या आयोजनाची तयारी आखली जाईल. आईवडिलांचं सहकार्य मिळेल.

कर्क : शैक्षणिक कार्यात अडथळे येऊ शकतील
शैक्षणिक कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतील. व्यवसायात मोठे करार रखडण्याची शक्यता आहे. मन अशांत राहील. खर्च वाढेल. नवीन कामाची सुरुवात करू नका. जोडीदाराचं सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात मन लागेल.

सिंह : जोडीदाराच्या प्रकृतीमुळे चिंता
जोडीदाराची प्रकृती खराब असल्यानं मन अशांत राहील. मनात निराशा आणि असंतोषाची भावना राहील. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. व्यवसायात नवीन संपर्कांमुळे लाभ मिळतील. व्यवहारात सावधगिरी बाळगा.

कन्या : प्रेम संबंध सुधारतील
बिघडलेले प्रेमसंबंध सुधारतील. संतान प्राप्तीची योजना आखली जाऊ शकते. आर्थिक प्रकरणात विचारपूर्वक निर्णय घ्या. विरोधकांना स्वतःचं म्हणणं पटवून द्या. राजकारणात जबाबदारी वाढतील.

(वाचा : 'या' राशीच्या व्यक्तींना प्रेमात पाडणे असते फारच कठीण)

तूळ : व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता
विद्यार्थ्यांना प्रोजेक्टच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.व्यवसायात घेतलेल्या मेहनतीचे लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन आव्हानं मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात तुमचं योगदान वाढेल.

वृश्चिक : आर्थिक नुकसानाची शक्यता
विचार करूनच गुंतवणूक करा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे टाळा. जोडीदाराच्या भावनांचा विचार करा. आरोग्यासाठीही चिंता वाटू शकते. मित्रमैत्रिणींसोबत वेळ व्यतित करण्याची संधी मिळेल.

धनु : आरोग्यादायी दिवस
आज तुम्हाला शुभ संकेत मिळतील. विशेषतः आरोग्याप्रकरणी दिलासा मिळेल. दिनक्रम नियमित राखा. पैशांच्या गुंतवणूक संबंधित निर्णय टाळा. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये लाभ होईल.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मकर : घरात तणावाची शक्यता
बाहेरील हस्तक्षेपामुळे घरात तणाव येण्याची शक्यता आहे. नवीन संपर्कांपासून सावध राहा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रकरणात यश मिळेल. सामाजिक कामांमध्ये आवड वाढेल.