22 जानेवारी 2020चं राशीफळ, वृश्चिक राशीसाठी नव्या संधींचा आहे योग

22 जानेवारी 2020चं राशीफळ, वृश्चिक राशीसाठी नव्या संधींचा आहे योग

मेष : डोके दुखीमुळे अस्वस्थ
अधिक ताणतणाव किंवा डोकेदुखीमुळे अस्वस्थ होऊ शकता. काही योजना अयशस्वी होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. मित्रांचं सहकार्य मिळेल. कागदोपत्री व्यवहार पूर्ण ठेवा. नुकसान पोहोचवणाऱ्यांपासून सावध राहा.

कुंभ : प्रेमात निराशा होण्याची शक्यता
प्रेमात निराशा होण्याची शक्यता आहे. जोडीदारापासून दूर राहावं लागू शकते. अपत्याची चिंता सतावेल. कामाच्या ठिकाणी परिवर्तनामुळे फायदा होईल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. कायदेशीर प्रकरण मार्गी लागतील.

मीन : रखडलेला पैसा मिळेल
तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील. निश्चित केलेल्या बजेटमध्ये नवीन घराचा शोध पूर्ण होईल. अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. कौटुंबिक संपत्तीचे वाद मार्गी लागण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत भ्रमंतीचा कार्यक्रम आखला जाऊ शकतो.

वृषभ : कुटुंबाचं सहकार्य मिळेल
अडचणींच्या काळात कुटुंबाचं सहकार्य मिळेल. प्रेम संबंधात दृढता निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. मित्रांसोबत व्यावसायिक यात्रेचा योग आहे.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : लक्ष्य प्राप्तीमध्ये अपयश येण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी ध्येय गाठताना अपयश मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चांवर नियंत्रण ठेवा. आरोग्याप्रकरणी सतर्क राहा. राजकारणात आवड निर्माण होऊ शकते. रचनात्मक कामांमध्ये वाढ होईल. अधिक कष्ट करण्याची आवश्यकता आहे.

कर्क : नवी योजना यशस्वी होण्याची शक्यता
आज तुम्हाला एखाद्या नव्या योजनेत यश मिळण्याची शक्यता आहे. लाभ मिळण्याची कित्येक संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेलल. कायदेशीर प्रकरणात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

सिंह : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी आव्हानं मिळण्याची शक्यता आहे. आपली कामे सावधगिरीनं पूर्ण करा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उतावळेपणावर नियंत्रण ठेवा. प्रेमाच्या प्रकरणात परिस्थिती समाधानकारक राहील.

(वाचा : 'या' राशीच्या व्यक्तींना प्रेमात पाडणे असते फारच कठीण)

कन्या : कान दुखीमुळे अस्वस्थ
कान किंवा गळ्याच्या दुखण्यामुळे त्रस्त होऊ शकता. प्रेम संबंधातील वादांपासून दूर राहा. आर्थिक समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी तुमची योग्यता आणि कुशलतेमुळे जबाबदारी वाढू शकतात. कायदेशीर प्रकरणात तुमचा विजय होईल.

तूळ : भाऊ-बहिणींमध्ये वाढेल प्रेम
भाऊ-बहिणींच्या नात्यात प्रेम वाढेल. अविवाहितांसाठी अनुकूल वेळ आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. जुन्या संपर्कांमुळे लाभ मिळतील. उत्पन्न आणि खर्चात समतोल राखा. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. मन शांत राहील.

वृश्चिक : नव्या संधींचा योग
नोकरी आणि व्यापारात सुवर्ण संधी मिळतील. वेतन वाढ किंवा पदोन्नतीसंबंधीत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. नव्या करारांमुळे फायदा मिळेल. राजकारणात आवड वाढण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक कार्यांना अधिक वेळ द्या.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

धनु : व्यवहार प्रकरणांत मिळू शकतो धोका
आजचा दिवस धावपळ आणि तणावात व्यतित होईल. पैशांच्या व्यवहारात धोका मिळण्याची शक्यता आहे. तणावाची परिस्थिती वादांपासून दूर राहा. प्रभावशाली व्यक्तींसोबत झालेली भेट फायदेशीर ठरेल. जोडीदारांचं सहकार्य मिळेल.

मकर : आरोग्यात सुधारणा होईल
हळूहळू आरोग्यात सुधारणा होईल. ताजेतवाने होण्यासाठी निसर्गाची सफर करा. कुटुंबात सुख-शांती राहील. खासगी संबंधांमुळे गैरसमज दूर होतील. व्यावसायिक विस्ताराची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये आवड वाढेल.