23 जानेवारी 2020चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या विवाहातील अडचणी दूर होतील

23 जानेवारी 2020चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या विवाहातील अडचणी दूर होतील

मेष : रोजगाराच्या नव्या संधी मिळतील
भाग्योदयाची प्रबळ शक्यता आहे. रोजगाराच्या नव्या संधी मिळतील. व्यावसायिक यात्रा लाभदायक असतील. नव्या सहकाऱ्यांपासून फायदा होईल. वाहन खरेदीची योजना आखली जाण्याची शक्यता आहे. समाजसेवेत आवड वाढेल.

कुंभ : आरोग्यात सुधारणा होईल
आज तुमच्यात भरपूर ऊर्जा असेल. एखादं नवीन काम पूर्ण करण्यासाठी उत्साह कायम राहील. एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल. व्यापारात नफा आणि नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. परदेश यात्रेची योजना आखली जाऊ शकते.

मीन : घरात तणावाची शक्यता
बाहेरील हस्तक्षेपामुळे घरात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. विचारांमधील मतभेदामुळे चांगल्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करू शकतात.

वृषभ : शारीरिक अशक्तपणा जाणवू शकतो
शारीरिक अशक्तपणा जाणवू शकतो. कामात मन लागणार नाही. आरोग्याकडे लक्ष द्या. जोडीदारासोबतच्या नात्यात आलेली कटुता दूर होईल. वाढत्या खर्चांमुळे नवीन कामाची सुरुवात करू शकता.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : भाऊ-बहिणींचे नातेसंबंध सुधारतील
कुटुंबीयांसोबतचे तुमचे नाते चांगले होईल. विशेषतः छोट्या भाऊ-बहिणींचे नातेसंबंध सुधारतील. तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील. नशीब साथ देईल. नवी संपत्ती खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. अध्यात्मामध्ये आवड निर्माण होईल.

कर्क : निष्काळजीपणा करिअरवर होऊ शकतो परिणाम
टाळमटाळ करण्याच्या सवयीमुळे करिअरवर परिणाम होऊ शकतो. आर्थिक पातळीवर अडचणी निर्माण होऊ शकतात. आरोग्याच्या प्रकरणी अनुकूल वेळ आहे. अनोळखी व्यक्तीवर विश्वास करू नका. कायदेशीर प्रकरणे मार्गी लागतील. सध्या प्रवास करणं टाळा.

सिंह : पदोन्नतीची शक्यता
कामाच्या ठिकाणी मनासारखी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तार होऊ शकतो. अडकलेला पैसा मिळण्याचे शुभ संकेत आहेत. आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. जोडीदारासोबत एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठीची योजना आखली जाईल.

(वाचा : 'या' राशीच्या व्यक्तींना प्रेमात पाडणे असते फारच कठीण)

कन्या : हलगर्जीपणामुळे चांगल्या संधी गमवाल
हलगर्जीपणामुळे चांगल्या संधी गमावल्या जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून तणआव वाढण्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगा. वादांपासून दूर राहा. सुखसोयींमध्ये वाढ होईल. प्रिय व्यक्तींसोबत झालेली भेट सुखद असेल. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा.

तूळ : शारीरिक दुखण्यामुळे हैराण
शारीरिक दुखण्यामुळे अस्वस्थ राहू शकता. दिनक्रम आणि खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल आणा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. बिघडलेल काम पूर्ण होण्याची संधी आहे. कौटुंबिक वातावरणात मजा-मस्ती कायम राहील.

वृश्चिक : विवाह संबंधीच्या अडचणी दूर होतील
आज तुम्हाला मुलांसंबधी मोठा निर्णय घ्यावा लागेल. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. जोडीदारासोबत एखाद्या सामाजिक समारंभात सहभागी होण्याची शक्यता. जुन्या मित्रांसोबत भेट होईल. प्रतिस्पर्धी कमजोर होतील.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

धनु : नोकरीत परिस्थिती अनुकूल
विद्यार्थ्यांना ध्येय प्राप्ती करण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायातील परिस्थिती अनुकूल राहील. रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता आहे. मित्रांसोबत परदेश यात्रेचा कार्यक्रम आखला जाऊ शकतो.

मकर : आर्थिक नुकसानाची शक्यता
आज तुमचे एखादे आर्थिक नुकसान होऊ शकते. सतर्क राहा. वाहनातही बिघाड होऊ शकतो. कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी जबाबदारी पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.