24 जानेवारी 2020चं राशीफळ, मकर राशीच्या व्यवसायाला गती मिळण्याचा योग

24 जानेवारी 2020चं राशीफळ, मकर राशीच्या व्यवसायाला गती मिळण्याचा योग

मेष : नातेसंबंधांमध्ये कटुता येण्याची शक्यता
नातेसंबंधांमध्ये कटुता येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. मित्रांचं सहकार्य मिळेल. आर्थिक प्रकरणात विचारपूर्वक निर्णय घ्या. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

कुंभ : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
कमी वेळात अधिक उत्पन्न अशा योजनांपासून दूर राहा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रकृती खराब होण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये आलेली कटुता दूर होईल. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. वृद्धांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दया.

मीन : जुन्या आजारात सुधारणा
जुन्या आजारात सुधारणा झाल्यानं दिलासा मिळेल. एखाद्याकडून सुखद बदलाचे संकेत मिळतील. नव्या लोकांच्या भेटी व्यवसायासाठी फायदेशीर राहतील. विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते.

वृषभ : रखडलेला पैसा मिळण्याची शक्यता
रखडलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक नवीन करार मिळू शकतात. कमाच्यासाठी मनासारखे काम मिळाल्यानं प्रसन्नता असेल. जोडीदारासोबतच्या संबंधांमध्ये गोडवा टिकवण्याचं प्रयत्न करा. सामाजिक सन्मानात वाढ होईल.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : शारीरिक दुर्घटने प्रकरणी सतर्क राहा
जोडीदाराच्या आरोग्याप्रकरणी सतर्क राहा. दुखापत होऊ शकते. अपत्याला खेळामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार मनात येईल. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. परदेश यात्रेचा योग आहे.

कर्क : एखादी आनंदाची बातमी मिळू शकते
आज अपत्याकडून आनंदाची बातमी मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळू शकतो. धार्मिक कामांमध्ये आवड वाढेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. रचनात्मक कामांमध्ये मन रमेल.

सिंह : महत्त्वपूर्ण कामे आळसामुळे टाळू नका
आळसामुळे महत्त्वपूर्ण कामे टाळू नका. करार रद्द होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी घाईगडबडीत एखादी चूक होऊ शकते. अचानक धनलाभाचा योग आहे. वादापासून दूर राहा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता
उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या करारामुळे लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात महत्त्वपूर्ण योजना यशस्वीरित्या राबवून लोकप्रिय व्हाल. आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. जंगम-स्थावर संपत्ती खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते.

तूळ : नवे कामे सुरू करणं टाळा
आज कोणतेही नवीन काम सुरू करणं टाळा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत झालेल्या मतभेदामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात विश्वासघात होण्यापासून सतर्क राहा. नात्यांमध्ये आलेली कटुता दूर होईल. सामाजिक सन्मानात वाढ होईल.

वृश्चिक : आरोग्याच्या बाबतीत अस्वस्थता
आरोगाच्या बाबतीत अस्वस्थ राहू शकता. स्वभावात चिडचिडेपणा येईल.सामाजिक सन्मानात वाढ होईल. व्यवहाराप्रकरणी सतर्क राहा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : नात्यांमध्ये आलेली कटुता दूर होईल
नात्यांमध्ये आलेली कटुता दूर होईल. नवे प्रेम संबंधं निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. व्यावसायिक विस्ताराची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. मित्रांसोबत भ्रमंतीचा कार्यक्रम आखला जाऊ शकतो.

मकर : व्यवसायाला गती मिळण्याचा योग
व्यवसायाला गती येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ संतुष्ट राहतील. व्यवसाय संबंधी यात्रेची योजना आखली जाऊ शकते. राजकारणात जबाबदारी वाढण्याचा योग आहे. कायदेशीर प्रकरणे मार्गी लागतील.