25 जानेवारी 2020चं राशीफळ, कुंभ राशीला नोकरीच्या शोधात मिळेल यश

25 जानेवारी 2020चं राशीफळ, कुंभ राशीला नोकरीच्या शोधात मिळेल यश

मेष : शरीरात उत्साह संचारेल
आज एखादी नवीन गोष्ट करण्यासाठी मन उत्साहित असेल. शरीरात उत्साह संचारेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती भक्कम राहील. विवाह योग्य लोकांची जोडीदारासोबत भेट होण्याची शक्यता आहे.

कुंभ : नोकरीच्या शोधात यश मिळेल
नोकरीच्या शोधात तरुण वर्गाला यश मिळेल. नवीन कामांची योजना आखली जाईल, ज्या यशस्वी होईल. गुंतवणूक केलेल्या पैशातून लाभ मिळतील. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. आत्मविश्वासात वाढ होईल.

मीन : कर्ज घेणे टाळा
निरर्थक खर्चावर नियंत्रण आणा, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. कर्जज घेणे टाळा. व्यावसायिक प्रकरणात चढ-उतार राहतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबतच्या नात्यात जवळीकता वाढेल.

वृषभ : कौटुंबिक समस्या वाढण्याची शक्यता
कौटुंबिक प्रकरणात बाहेरील हस्तक्षेपामुळे समस्या वाढण्याची शक्यता आहे. वेळेनुसार निर्णय बदलावे लागतील. व्यावसायिक भागीदारीमध्ये मतभेद निर्माण होतील, सावध राहा. रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. घरासाठी स्वतःच्या मनाप्रमाणे खरेदी करू शकता. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. कायदेशीर प्रकरणात यश मिळण्याचा योग आहे. रखडलेली महत्त्वपूर्ण कामे पूर्ण होतील.

कर्क : वडिलांची प्रकृती खराब होऊ शकते
वडिलांच्या प्रकृती अचानक खराब होण्याची शक्यता आहे. मन अशांत राहील. दुसऱ्यांची मदत घेण्यात यश मिळेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. जोडीदाराचं सहकार्य मिळेल. धर्म, अध्यात्मामध्ये मन रमेल.

सिंह : जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या
जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. काही चुकांकडे दुर्लक्ष करा. कुटुंबियांच्या सुख-दुःखाबाबत मन अस्वस्थ राहील. व्यावसायिक यात्रा यशस्वी होतील. रखडलेली कामे ठीक करण्याचा प्रयत्न करा.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : कामाच्या ठिकाणी अडचणी वाढतील
आज निरर्थक देखाव्यापासून आणि गोंधळापासून दूर राहा. कामाच्या ठिकाणी अडचणी वाढू शकतात. व्यवसायात मन लागणार नाही. खासगी संबंधावर लक्ष केंद्रीत करा. मित्रांचं सहकार्य मिळेल. रखडलेला पैसा मिळू शकतो.

तूळ : अचानक धनलाभ होण्याची शक्यता
अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होईल. सामाजिक प्रतिष्ठा आणि धन संपदेत वृद्धी होईल. जोखीम असणाऱ्या कामांपासून दूर राहा. मित्रांसोबत आज भ्रमंतीचा योग आखली जाण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : नव्या कामास सुरुवात करू नका
आज नवीन कामास सुरुवात करणं टाळा. आळसाचा त्याग करा, अन्यथा व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : शारीरिक दुखण्यामुळे अस्वस्थ
आज कंबर किंवा टाचांच्या दुखण्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. नोकरीमध्ये जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल. कष्टामुळे कठीण कामे सहजरित्या पूर्ण होतील. कौटुंबिक वाद लवकरच सुटण्याची शक्यता आहे.

मकर : जोडीदारासोबतचे नाते दृढ होईल
जोडीदारासोबतचे नातेसंबंध दृढ होतील. अविवाहितांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात. तुमचा सुमधुर वागणुकीमुळे सामाजिक सन्मान वाढेल. उधार दिलेले पैसे पुन्हा मिळतील. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.