26 जानेवारी 2020चं राशीफळ, मीन राशीची रखडलेली कामे पूर्ण होतील

26 जानेवारी 2020चं राशीफळ, मीन राशीची रखडलेली कामे पूर्ण होतील

मेष : एखादी महागडी वस्तू हरवण्याची शक्यता
आज पैशांसंबंधी समस्या निर्णाण होऊ शकते. एखादी मौल्यवान वस्तू चोरी किंवा हरवण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. मित्रांचं सहकार्य मिळेल.

कुंभ : कुटुंबात तुमची बाजू भक्कम असेल
जुनी मैत्री नवीन नातेसंबंधांमध्ये बदलण्याची शक्यता आहे. कौटुंबिक प्रकरणात तुमची बाजू भक्कम राहील. त्रिकोणीय व्यावसायिक भागीदारी आणि संबंधांमध्ये लाभ मिळतील. व्यवहाराच्या प्रकरणात सावधगिरी बाळगा.

मीन : रखडलेली कामे पूर्ण होतील
नवीन योजनांची सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची योजना आखली जाण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रकरणातून दिलासा मिळेल. कष्टाचं फळ मिळेल.

वृषभ : आरोग्यात सुधारणा होईल
दीर्घ काळापासून सुरू असलेल्या आजारातून मुक्तता होऊन, आरोग्यात सुधारणा होईल. जीवनशैलीमध्ये बदल करा. कुटुंबीयांसोबत क्षण व्यतित करण्यासाठी वेळ मिळेल. प्रेम संबंध सुमधुर होतील. व्यापारात नवीन संंबंध निर्माण होतील, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याी शक्यता आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : रागावर नियंत्रण ठेवा
एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत वाद करणे टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. प्रियकरासोबत संतुलित नाते राखणंच चांगलं राहील. आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नासहीत खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक कामांमध्ये मन रमेल.

कर्क : व्यावसायिक प्रगतीचा योग
आज व्यावसायिक प्रगतीचा योग आहे. मित्रांकडून भेटवस्तू किंवा पैसे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक लाभदायक राहील. जोडीदाराकडून तणाव वाढण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

सिंह : आईचे आरोग्य खराब राहील
आईचे आरोग्य खराब राहील. मनात निराशा आणि असमाधानकारक भाव राहतील. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. सध्या प्रवास करणं टाळा. व्यवहाराची प्रकरणे मार्गी लागतील.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : कौटुंबिक समस्या सुटतील
मित्रांच्या सहकार्यानं कौटुंबिक समस्या सुटण्याचा योग आहे. सुख-शांती कायम राहील. तुमच्या व्यावसायिक यशामुळे लोकप्रियता वाढेल. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ : व्यवसायात चढ-उताराची स्थिती राहील
कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात अडचणी येऊ शकतात. व्यवसायात चढ-उताराची परिस्थिती राहील. वादापासून दूर राहा. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थी अभ्यास निष्काळजीपणा दाखवू शकतात.

वृश्चिक : वाहन सुख वाढण्याचा योग
वाहन सुखात वाढ होण्याचा योग आहे. जोडीदार किंवा मित्राकडून भेटवस्तू मिळू शकते. कायदेशीर प्रकरणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राजकीय संपर्कांपासून लाभ मिळेल. खऱ्या प्रेमाचा शोध कायम राहील.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी गमवाल
निष्काळजीपणा आणि आळसामुळे कित्येक चांगल्या संधी गमावण्याची शक्यता आहे. कामातील विलंबामुळे तणाव वाढू शकतो. खोट्याचा आधार घेऊन काम करून घेण्याचा प्रयत्न कराल. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक परिस्थिती ठीक राहील.

मकर : अडचणींचा सामना करावा लागू शकतो
शारीरिक आणि मानसिक स्वरुपात कित्येक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होईल. धार्मिक कामांमध्ये आवड वाढू शकते. राजकारणात सक्रीय सहभाग घ्याल. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील.