27 जानेवारी 2020चं राशीफळ, तूळ राशीच्या नात्यात प्रेम वाढण्याचा योग

27 जानेवारी 2020चं राशीफळ, तूळ राशीच्या नात्यात प्रेम वाढण्याचा योग

मेष : पदोन्नतीची शक्यता
नवीन नोकरीच्या संधी मिळतील. व्यावसायिक क्षेत्रातील तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. पदोन्नतीची शक्यता आहे. रखडलेली कामे सहजरित्या पूर्ण होतील. सामाजिक कामांमध्ये आवड वाढेल. प्रेम संबंधांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ : मन अस्वस्थ राहील
सर्व काही ठीक असताना मन अस्वस्थ राहील. आपल्या कामावर लक्ष द्या. रखडलेली कामे लवकरच पूर्ण होतील. रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता आहे. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. सध्या प्रवास करणं टाळा.

मीन : प्रेमात यश मिळू शकते
प्रेमात यश मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कामांमध्ये आवड निर्माण होण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रकरणातून सुटका होण्याची शक्यता. व्यवसायात राजकीय संपर्कांमुळे लाभ मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ : आर्थिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता
देखाव्याच्या नादात कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आर्थिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीसंदर्भात सतर्क राहा. व्यावसायिक यात्रेची योजना आखली जाऊ शकते. आई-वडिलांचं सहकार्य मिळेल.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : आरोग्य ठीक राहील
घरगुती उपचारामुळे तुमचं आरोग्य ठीक राहील. रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. सामाजिक कामांमध्ये आवड वाढेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा योग आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची प्रबळ शक्यता आहे. धन लाभाची शक्यता आहे.

कर्क : अप्रिय लोकांची भेट होण्याची शक्यता
काही अप्रिय व्यक्तींसोबत भेट होण्याची शक्यता आहे. अपत्यासंदर्भात निराशाजनक बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. खासगी प्रकरण टाळल्यास समस्या वाढू शकते.

सिंह : आर्थिक स्थितीत सुधारणा
पैशासंबंधी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणा होण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता राहील. रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता आहे. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील. परदेश प्रवासाचा योग आहे.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : मुलाच्या आरोग्यामुळे चिंता  
मुलाला सर्दी-खोकला झाल्यानं अडचणी निर्माण होऊ शकतात. स्वभाव चिडचिडा होईल. दैनंदिन जीवन अस्ताव्यस्त राहील. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. मित्रांसोबत झालेली भेट सुखद असेल. यावेळेस धैर्यानं काम करा.

तूळ : नात्यात प्रेम वाढण्याचा योग
कुटुंबातसोबत वेळ व्यतित केल्यानं नात्यातील प्रेम कायम राहील. मनाला सकारात्मक दिशा द्या. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. जोडीदारासोबत परदेशस्वारी होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : करियरमध्ये चढ-उतार
करियरमध्ये चढ-उतार राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळाल्यानं व्यस्तता वाढण्याची शक्यता. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : संपत्ती मिळण्याची शक्यता
कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करार मिळू शकतात. घराच्या डागडुजीचे काम होऊ शकते. कुटुंबात एखाद्या समारंभाची योजना आखली जाऊ शकते. उत्पन्नात वाढ होईल.

मकर : अडचणी निर्माण होण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. योग्य वेळी निर्णय न घेतल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होईल. जोडीदाराचं सहकार्य मिळेल. एखादं महत्त्वपूर्ण काम रखडण्याची शक्यता आहे.