28 जानेवारी 2020चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या कौटुंबिक समस्या दूर होतील

28  जानेवारी 2020चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या कौटुंबिक समस्या दूर होतील

मेष : अप्रिय लोकांसोबत भेट होण्याची शक्यता
आज काही अप्रिय लोकांसोबत भेट होण्याची शक्यता आहे. अपत्यासंदर्भात निराशाजनक बातमी ऐकण्यास मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. खासगी प्रकरण टाळल्यानं समस्या वाढू शकतात.

कुंभ : कामाच्या ठिकाणी तणाव वाढण्याची शक्यता
आज कामाच्या ठिकाणी तणाव वाढण्याची शक्यता आहे. तरुण चांगल्या करिअरच्या शोधात असतील. व्यवसायात चढ-उताराची परिस्थिती कायम राहील. अचानक एखाद्या ठिकाणी प्रवास करावा लागेल.

मीन : शारीरिक थकवा जाणवेल
अधिक धावपळीमुळे शारीरिक थकवा आणि आळसाची तक्रार निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी वादांपासून दूर राहा. जोडीदारासोबतचे सुमधुर संबंध असतील. सामाजिक संस्थेद्वारे सन्मान होण्याची शक्यता आहे.

वृषभ : मनासारखे यश मिळण्याची शक्यता
विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वेळ आहे. कामाच्या ठिकाणी मनासारखे यश मिळण्याची शक्यता आहे. सहकर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत संबंधांमध्ये तणाव येऊ शकतो. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : पैशांसंदर्भात संकट निर्माण होण्याची शक्यता
व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. पैशांच्या बाबतीत संकट येऊ शकते. आर्थिक प्रकरणात विचार करून निर्णय घ्या. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. फसवणूक होण्याची शक्यता आहे.

कर्क : आरोग्य ठीक राहील
नियमित व्यायाम केल्यानं आरोग्य ठीक राहील. रखडलेली कामे पूर्ण होण्यात यश मिळेल. अपत्यासंदर्भात आनंदाची बातमी मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील.

सिंह : मतभेद वाढण्याची शक्यता
कुटुंबात मतभेद वाढण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी तुमच्या कमजोरीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील. खऱ्या प्रेमाचा शोध कायम राहील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : नवी संपत्ती खरेदीची योजना
नवी संपत्ती खरेदीची योजना आखली जाऊ शकते. नवे करार मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत लाँग ड्राईव्हवर जाण्याची शक्यता आहे.

तूळ : मानसिक तणाव राहील
कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक तणाव राहील. स्वभाव चिडचिडा होईल. कामाच्या ठिकाणी काम करताना अडचणी येऊ शकतात. फसवणूक करणाऱ्यांपासून सतर्क राहा. कुटुंबाचं सहकार्य मिळेल.

वृश्चिक : कौटुंबिक समस्या दूर होतील
कौटुंबिक समस्या दूर होतील. भावाच्या सहकार्यामुळे व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांसोबत संबंध चांगले असतील. सामाजिक कार्यांमध्ये आवड वाढेल. आत्मविश्वासात वाढ होईल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : करार रद्द होण्याची शक्यता
योग्य वेळेत करार पूर्ण न झाल्यास ते रद्द होण्याची शक्यता आहे. किरकोळ कामासाठी शिफारस करावी लागण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्यांमुळे उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

मकर : पैशांसंबंधी चांगली बातमी मिळेल
पैशांसंबंधी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. राजकारणात सक्रियता वाढू शकते. व्यवहारांचे प्रकरण मार्गी लागतील.