29 जानेवारी 2020चं राशीफळ, तूळ राशीचा अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता

29 जानेवारी 2020चं राशीफळ, तूळ राशीचा अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता

मेष : तणाव वाढण्याची शक्यता 
अपत्याच्या चिंतेमुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती ठीक राहील. एखाद्या सामाजिक संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. व्यवहाराप्रकरणी सावधगिरी बाळगा.   

कुंभ : आयात-निर्यातीची कामे यशस्वी होण्याची शक्यता 
आयात-निर्यातीच्या कामात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची खेळात आवड वाढण्याची शक्यता आहे. नवीन मित्रांची भेट होणे शक्य आहे. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 

मीन : करार रद्द होण्याची शक्यता 
मेहनतीचा पूर्ण लाभ न मिळाल्यानं निराशा वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. रचनात्मक कामांमध्ये आवड वाढेल. आर्थिक त्रास होण्याची शक्यता आहे.  

वृषभ : जोडीदारासोबत रोमँटिक संबंध  
जोडीदारासोबत रोमँटिक संबंध असतील. सामाजिक सन्मानात वाढ होईल. आपल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी जोखीम स्वीकारण्यास तयार असाल. वरिष्ठांसोबत चांगले संबंध राहतील. व्यावसायिक यात्रेची शक्यता आहे. 

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : नवीन यश मिळेल 
व्यवसायात नवीन यश मिळतील. रखडलेली कामे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. जोडीदारासोबतची यात्रा सुखद असेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. 

कर्क : आर्थिक परिस्थिती बिघडतील  
कमी वेळात अधिक कमावण्याच्या नादात पैसा गमवाल. निरर्थक खर्चामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. तणाव वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. मित्रांसोबतची भेट सुखद राहील. 

सिंह : आरोग्य ठीक राहील  
घरगुती उपचारांमुळे आरोग्य ठीक राहील. जुन्या प्रियकरासोबत भेट होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संपर्कांमुळे फायदा मिळेल.  रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक सन्मान आणि पैशांत वाढ होईल.  

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : अडचणीत कुटुंबाचं सहकार्य मिळणार नाही  
अडचणीत कुटुंबीयांचं सहकार्य मिळणार नाही. प्रतिस्पर्ध्यांची सक्रिय होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. किरकोळ गोष्टीमुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बदलावे लागण्याची शक्यता आहे. 

तूळ : अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता 
अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमुळे आर्थिक वृद्धि आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधामध्ये सध्या महत्त्वपूर्ण निर्णय घेणे टाळा. 

वृश्चिक : आरोग्यामुळे अस्वस्थ 
आरोग्यासंबंधी त्रास उद्भवण्याची  शक्यता आहे. महत्त्वपूर्ण कामे रखडू शकतात.  उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क राहा. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील.  

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : मतभेद दूर होतील 
भावनात्मक संबंधांमधील मतभेद दूर होतील. मित्रांसोबत मौज-मजा करण्यात दिवस व्यतित होईल. सामाजिक सन्मान आणि पैशांमध्ये वाढ होईल. नवीन संपर्कांमुळे फायदा मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 

मकर : करिअरमुळे धावपळ होईल 
मनासारखे करिअर मिळावे यासाठी धावपळ होईल. कामाच्या ठिकाणी तणाव वाढू शकतो. निरर्थक खर्चावर नियंत्रण ठेवा. राजकीय जबाबदारी वाढू शकतील. जोखीम असणाऱ्या कामांपासून दूर राहा.