मेष : राजकारणात सक्रिय होण्याची संधी
राजकारणात सक्रिय होण्याची संधी मिळेल. खेळात आवड निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ : शारीरिक दुखण्यामुळे त्रस्त
कंबर किंवा गुडघे दुखीची समस्या निर्माण होऊ शकते. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रांना दिलेले वचन पूर्ण करण्यास विलंब होऊ शकतो. प्रतिष्ठित व्यक्तीशी झालेली भेट फायदेशीर राहील. प्रवास करणं टाळा.
मीन : मित्रांची नाराजी दूर होईल
नाराज झालेल्या मित्रांचा राग दूर करण्यात यश मिळेल. कौटुंबिक वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि रचनात्मक कामांमध्ये आवड वाढेल. आर्थिक स्थिती भक्कम राहील. जोडीदारासह प्रवास करण्याचा योग आहे.
वृषभ : वाढत्या खर्चामुळे तणाव
अडकलेला पैसा मिळण्यात आणखी वेळ लागू शकतो. वाढत्या खर्चामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे अपूर्ण काम पूर्ण होतील. जे तुम्हाला मनापासून आवडतात, त्यांच्यासोबत सुंदर क्षण घालवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)
मिथुन : आरोग्य राहील ठीक
घरगुती उपचारांमुळे आरोग्य ठीक राहील. काही नवीन गोष्ट करण्यासाठी उत्साहित असाल. आर्थिक स्थिती भक्कम राहील. कामाच्या ठिकाणी अनुभवाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवहारांचे प्रकरण मार्गी लागतील.
कर्क : प्रियकरासोबत मतभेद होण्याची शक्यता
प्रियकरासोबत मतभेद झाल्या कारणामुळे नाराजी निर्माण होऊ शकते. भागीदारीत संघर्ष झाल्यानं काम सोडण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी तुमच्या कमजोरीचा फायदा उचलू शकतात. रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता आहे. धार्मिक श्रद्धा वाढेल.
सिंह : गेलेला पैसा मिळण्याची शक्यता
गेलेला पैसा पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अनुभवाचा लाभ मिळू शकते. जोडीदारासोबत परदेश यात्रेचा योग आहे. विद्यार्थ्यांची खेळामध्ये आवड वाढण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी पराभूत होतील.
कन्या : आजारामुळे अस्वस्थ
सर्दी,खोकल्यामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. ज्या कामासंदर्भात तुम्ही चिंतेत आहात, ते सहजरित्या पूर्ण होईल. सामाजिक सन्मान आणि धन संपदेत वाढ होईल. प्रियकरासोबत भेट होईल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')
तूळ : प्रेमात यश मिळेल
प्रेमात यश मिळेल. नवीन मित्र मिळतील. नवीन संपर्कांमुळे लाभ मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : व्यावसायिक करारांसाठी कष्ट करा
व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. वरिष्ठांसोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती भक्कम राहील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
धनु : धन किंवा भेटवस्तू मिळतील
सासरहून पैसे किंवा भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या विस्ताराची योजना आखली जाऊ शकते. रखडलेली काम पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. सक्रिय राजकारणात सहभागी होण्याची शक्यता आहे.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)
मकर : विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची आवश्यकता
विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक कष्ट घेण्याची आवश्यकता आहे. कामाच्या ठिकाणी हक्कांसाठी संघर्ष करावा लागू शकतो. कायदेशीर प्रकरणे मार्गी लागू शकतात. आर्थिक स्थिती भक्कम होईल. मित्रांसोबत भेट होऊ शकते.