30 जानेवारी 2020चं राशीफळ, कन्या राशीचे मन उत्साहित असेल

30 जानेवारी 2020चं राशीफळ, कन्या  राशीचे मन उत्साहित असेल

मेष : करार रद्द होण्याची शक्यता
घाईगडबडीत मोठी चूक होऊ शकते. करार रद्द होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद वाढण्याची शक्यता आहे. राजकारणात एखाद्या पक्षाची जबाबदारी मिळू शकते. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ : शिक्षणात कौटुंबिक अडचण येण्याची शक्यता
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कौटुंबिक अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात कमतरता येऊ शकते. र चनात्मक कामांमध्ये आवड वाढेल. आर्थिक परिस्थिती ठीक राहील.

मीन : धन लाभाची शक्यता
आज अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन तांत्रिक बाबींचा प्रयोग केल्यास चांगले लाभ मिळवू शकता. प्रतिष्ठित व्यक्तींसोबत झालेली भेट फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. प्रवासाचा योग आहे.

वृषभ : हातापायांच्या दुखण्यानं त्रस्त
हातापायांच्या दुखण्यामुळे अस्वस्थ होऊ शकता. नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू शकतो. पैशांसंबंधी एखादी चांगली बातमी मिळू शकते. रखडलेली कामे मित्रांच्या मदतीनं ठीक होतील. सध्या प्रवास करणं टाळा.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : कुटुंबात मस्ती-मौजेचं वातावरण
कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे व्यवसायात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. पदोन्नतीच्या संधी मिळतील. विद्यार्थ्याची अभ्यासात आवड वाढेल. कुटुंबात मौजमजेचे वातावरण राहील.

कर्क : रचनात्मक क्षमता वाढेल
तुमच्या इच्छित यशाचा मार्ग सोपा होईल. रचनात्मक क्षमता वाढेल. मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तिप्रती प्रेमाची भावना निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण छान राहील.

सिंह : मौल्यावान वस्तुचे नुकसान होण्याची शक्यता
एखादी मौल्यवान वस्तू तुटण्याची किंवा खराब होण्याची शक्यता आहे. व्यवहाराच्या प्रकरणात फसवणूक होऊ शकते. महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल. आरोग्य ठीक राहील.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : मन उत्साहित राहील
ताजेपणा अनुभवाल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजनांमध्ये गती येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे.

तूळ : पार्टनरसोबत तणाव वाढण्याची शक्यता
दुसऱ्यांना कमीपणा दाखवण्याची सवय सोडा. जोडीदारासोबत तणाव वाढू शकतो. भूतकाळातील गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा. प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क राहा. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.

वृश्चिक : जंगम-स्थावर संपत्ती खरेदीची योजना
जंगम-स्थावर संपत्ती खरेदीची योजना आखली जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बदलावे लागण्याची शक्यता. परदेश यात्रेचा योग आहे.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : स्वभाव चिडचिडा होईल
मनात निराशा आणि असमाधानकारक भावना असतील. स्वभाव चिडचिडा होईल. में रागावर नियंत्रण ठेवा. धार्मिक कामांमध्ये आवड वाढेल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल.

मकर : प्रेम प्रस्तावात यश
प्रेम प्रस्तावात यश मिळेल. पार्टनरसोबतचे संबंध सुमधुर राहतील. सामाजिक सन्मानात वाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल.आरोग्य ठीक राहील. आपल्या आकर्षक व्यक्तीमत्त्वामुळे इतरांना प्रभावित कराल.