31 जानेवारी 2020चं राशीफळ, सिंह राशीच्या उच्च शिक्षणातील अडचणी दूर होतील

31 जानेवारी 2020चं राशीफळ, सिंह राशीच्या उच्च शिक्षणातील अडचणी दूर होतील

मेष : नवी संपत्ती खरेदीची योजना
नवीन संपत्ती खरेदीची योजना आखली जाऊ शकते. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. कौटुंबिक दायित्वाची पूर्तता होईलल. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. जोडीदारासोबतचे सुमधुर संबंध राहतील.

कुंभ : एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट होईल
एखाद्या खास व्यक्तिसोबत भेट होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीमुळे व्यवसायात यश मिळेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या सवयीत निष्काळजीपणाम करू नका.

मीन : वरिष्ठांसोबत वाद वाढण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद वाढण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात कमतरता येईल. आरोग्य खराब होऊ शकते. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.जुनी मैत्री नवीन संबंधांमध्ये बदलण्याची शक्यता आहे.

वृषभ : व्यवसायात चढ-उताराची स्थिती
तरुणांमध्ये करिअरसंदर्भात चिंता राहील. व्यवसायात चढ-उताराची परिस्थिती निर्माण होईल. महत्त्वाच्या कामांमध्ये हलगर्जीपणा करू नका. कामाच्या ठिकाणी आपल्या जबाबदारींकडे दुर्लक्ष करू नका.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : तणाव वाढू शकतो
निरर्थक शंकांमुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक कामांमध्ये मन रमेल. पार्टनरकडून भावनिक सहकार्य मिळेल. रचनात्मक कामांमध्ये आवड वाढेल. प्रियकरासोबत झालेली भेट सुखद असेल.

कर्क : कौटुंबिक समस्यांपासून मुक्ती
कौटुंबिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. राजकारणात एखाद्या पक्षाच्या जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. प्रतिस्पर्ध्यांना तुमचं म्हणणं ऐकून घ्यावं लागण्याची वेळ येईल.

सिंह : उच्च शिक्षणात अडचणी दूर होतील
नव्या नोकरीचा शोध पूर्ण होईल. उच्च शिक्षणातील अडचणी दूर होतील. वरिष्ठांसोबत होणारा संवाद प्रगतीसाठी उपयोगी ठरेल. आपल्या व्यवहारातील कौशल्यामुळे भरपूर लाभ मिळतील.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : धन वापसीमध्ये अडचणी
आज कोणाला पैसा उधार देऊ नका. पैसे पुन्हा मिळणं कठीण असेल. निरर्थक खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक परिस्थितीत बिघाड होऊ शकते. आत्मविश्वासात कमतरता येईल. आईसोबत मतभेद होऊ शकतात.

तूळ : आरोग्य ठीक राहील
घरगुती उपचारांमुळे आरोग्य ठीक राहील. भेटवस्तू किंवा सन्मानात वाढ होईल. कौटुंबिक नात्यामध्ये गोडवा येईल. आर्थिक पक्ष मजबूत राहील. रचनात्मक कामांमध्ये प्रसिद्धी आणि पैशांमध्ये वाढ होईल.

वृश्चिक : भावांसोबत वाद वाढण्याची शक्यता
भावांसोबत वाद वाढण्याची शक्यता आहे. व्यवहाराच्या प्रकरणात समस्या निर्माण झाल्यानं मन अस्वस्थ राहील. व्यवसायात विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होईल. आर्थिक परिस्थिती ठीक राहील.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : हरवलेली मौल्यवान वस्तू मिळू शकेल
अचानक धनलाभ होण्याच्या संधी मिळतील. एखादी मौल्यवान हरवलेली वस्तू मिळण्याी शक्यता आहे. अपत्याकडून एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत परदेश यात्रेचा योग आहे. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील.

मकर : मन अस्वस्थ राहील
अज्ञात भीतीपोटी मन अस्वस्थ राहील. कामाच्या ठिकाणी नको असलेली अतिरिक्त जबाबदाकी मिळाल्यानं तणाव वाढेल. पार्टनरकडून भावनिक सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. धार्मिक कामांमध्ये मन लागेल.