4 जानेवारी 2020चं राशीफळ, कन्या राशीचा अडकलेला पैसा मिळेल

4 जानेवारी 2020चं राशीफळ,  कन्या राशीचा अडकलेला पैसा मिळेल

मेष : प्रेमी जोडप्यांना कुटुंबाचं समर्थन मिळेल
भावाच्या सहकार्यामुळे व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी पराभूत होऊ शकतात. प्रेमी जोडप्यांना कुटुंबाचं समर्थन मिळू शकते. रखडलेली कामे मित्रांच्या सहकार्यामुळे पूर्ण होतील. आत्मविश्वासात वाढ होईल.

कुंभ : कामात निष्काळजीपणा करू नका
विद्यार्थ्यांनी शिक्षण स्पर्धा परीक्षेत हलगर्जीपणा करू नका. कामाच्या ठिकाणी कष्ट करण्याची आवश्यकता आहे. आताच्या कार्यशैलीमुळे अधिकारी नाराज होऊ शकतात. कोर्ट-खटल्यांतून दिलासा मिळेल. धार्मिक कार्यांमध्ये श्रद्धा वाढेल.

मीन : वयोवृद्धाची प्रकृती बिघडेल
एखाद्या वयोवृद्धाची प्रकृती अचानक बिघडू शकते. नियमित दिनक्रमाची काळजी घ्या. व्यावसायिक जबाबदारी वाढण्याची शक्यता. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृषभ : व्यावसायिक कामांना गती येईल
व्यावसायिक कामांमध्ये गती येईल.कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. आत्मविश्वास वाढेल. सामाजिक सन्मान आणि धन संपदेत वाढ होण्याचा योग आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : व्यवसायात तोटा होण्याची शक्यता
लोभ-लालसा उत्पन्न करणाऱ्या योजनांपासून दूर राहा. व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. विचारविनिमयपूर्वक पैशाची गुंतवणूक करा. एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट होण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

कर्क : आरोग्य ठीक राहील
आरोग्य ठीक राहील. नवीन गोष्ट करण्यासाठी उत्साहित असाल. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. रखडलेली काम सहजरित्या पूर्ण होतील. जोडीदारासोबत लाँग ड्राईव्ह वर जाऊ शकता. कार्यशैलीमुळे वरिष्ठ प्रभावित होतील.

सिंह : संबंधांमध्ये कटुता येण्याची शक्यता
जवळील संबंधांमध्ये कटुता येण्याची शक्यता आहे. राजकारणात विरोधकांकडन अधिक समस्या निर्माण केल्या जाऊ शकतात. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.

कन्या : अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता
अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सुख-सोयींच्या साधनांमध्ये वाढ होण्याची शक्यता. व्यवहारांचे प्रकरण मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यास किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

तूळ : आरोग्याची विशेष काळजी घ्या
डोळे किंवा डोकेदुखीमुळे त्रस्त होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. संवादात ताळमेळ नसल्यानं कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. धार्मिक कामांमध्ये आवड वाढू शकते.

वृश्चिक : प्रेमभावना निर्माण होऊ शकते
एखाद्या प्रति प्रेमभावना निर्माण होऊ शकते. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. व्यवसायात राजकीय लाभ मिळण्याची शक्यता आहे. सहकर्मचाऱ्यांसोबतचे संबंध सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये सफलता मिळेल. यात्रेचा योग आहे.

धनु : पदोन्नतीमध्ये अडचणी येण्याची शक्यता
नोकरीच्या शोधात तरुणांची धावपळ होईल. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. पदोन्नतीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.मित्रांसोबत झालेली भेट सुखद असेल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

मकर : भेटवस्तू किंवा धनलाभाची शक्यता
प्रॉपर्टी विस्ताराची योजना आखली जाऊ शकते. अचानक भेटवस्तू किंवा धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत भ्रमंतीची योजना आखली जाऊ शकते. प्रियकरासोबत खरेदीमध्ये व्यस्त असाल.