5 जानेवारी 2020चं राशीफळ, वृषभ राशीला मिळू शकतो प्रेम प्रस्ताव

5 जानेवारी 2020चं राशीफळ, वृषभ राशीला मिळू शकतो प्रेम प्रस्ताव

मेष : अपत्याच्या आरोग्याकडे लक्ष द्या
अपत्याचं आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे. आज जास्त ट्रॅफिक असणाऱ्या जागेवर जाणं टाळा. निरर्थक खर्च करणं टाळल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. जोडीदाराकडून भावनात्मक सहकार्य मिळेल.

कुंभ : व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता
प्रॉपर्टीच्या व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक केल्यास टॅक्सची बचत होईल. प्रियकरामुळे तणाव दूर होईल. परदेश यात्रेची योजना आखली जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीच्या संधी मिळतील.

मीन : नोकरीसाठी धावपळ राहील
मनासारखी नोकरी मिळण्यासाठी धावपळ कायम राहील. व्यावसायिक भागिदारीत काम करताना हलगर्जीपणा महागात पडू शकतो. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीमध्ये बाधा येण्याची शक्यता आहे. एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ : प्रेम प्रस्ताव मिळू शकता
प्रेम प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. मनातील गोष्ट जवळच्या व्यक्तींना सांगा, तणाव कमी होईल. कामाच्या ठिकाणी सर्वांचं समर्थन मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तींसोबत झालेली भेट फायदेशीर ठरेल. प्रवासाचा योग आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढेल
विद्यार्थ्यांची अभ्यासातील आवड वाढू शकते. किरकोळ बदलामुळे मोठं यश मिळवू शकता. व्यावसायिक विस्ताराची शक्यता आहे. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा.

कर्क : अचानक खर्च वाढू शकतो
प्रॉपर्टी संबंधी प्रकरणांपासून आज दूर राहा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. प्रवासादरम्यान खर्च वाढू शकतो. महत्वपूर्ण रखडलेली कामे पूर्ण होतील. रस्त्यावर चालताना विशेष काळजी घ्या. सध्या प्रवास करणं टाळा.

सिंह : आरोग्य चांगले राहील
निमयित दिनक्रम आणि व्यायामामुळे आरोग्य चांगलं राहील. उत्पन्नाचे अन्य स्त्रोत मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल.कामाच्या ठिकाणी सर्व कामे वेळेपूर्वी पूर्ण होतील. जोडीदारासोबत छान वेळ व्यतीत होईल.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : प्रेमात होऊ शकते निराशा
प्रेमात निराशा होण्याची शक्यता आहे. कोणतंही असं कार्य करू नका, ज्यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल. कायदेशीर प्रकरणांमुळे त्रस्त होऊ शकता. महत्त्वपूर्ण कामे रखडू शकतात. व्यवहारात सतर्कता बाळगा. आरोग्य ठीक राहील.

तूळ : भेटवस्तू मिळण्याची शक्यता
नवीन योजना सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ आहे. कामाच्या ठिकाणी सन्मान आणि भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत समारंभात जाण्याची योजना आखली जाऊ शकते. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.

वृश्चिक : आरोग्याकडे लक्ष द्या
पारिवारिक कलहामुळे तणाव वाढू शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. सध्या प्रवास करणं टाळा. कित्येक स्त्रोतामुळे धन लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत झालेली भेट सुखद असेल. धार्मिक कामांमध्ये आवड वाढेल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : सहकाऱ्यांचं समर्थन मिळेल
जोडीदारासोबत फिरण्यात आणि खरेदी करण्यात वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं समर्थन मिळेल. मतभेद विसरून कामास सुरुवात करा, यश मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

मकर : अभ्यासावरून मन भरकटू शकते
विद्यार्थ्यांचं अभ्यासावरून मन भरकटू शकते. कामाच्या ठिकाणी ईच्छेविरोधातही काम करावे लागण्याची शक्यता आहे. वादांपासून दूर राहा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. राजकारणात जबाबदारी वाढू शकते.