6 जानेवारी 2020 चं राशीफळ, वृषभ राशीचे स्वप्न होईल पूर्ण

6 जानेवारी 2020 चं राशीफळ, वृषभ राशीचे स्वप्न होईल पूर्ण

मेष : कामाच्या ठिकाणी अडचणी येतील
व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. नवीन प्रॉपर्टी शोधताना अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

कुंभ : अडचणी वाढण्याची शक्यता
व्यवसायात घाईमध्ये निर्णय घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. प्रतिस्पर्धी त्रास देऊ शकतात. परीक्षेत वाईट निकाल मिळू नये, यासाठी अधिक कष्ट घ्या.

मीन : धन लाभाची शक्यता
अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. भावना व्यक्त केल्यानं जोडीदारासोबत असलेले संबंध सुमधुर होतील. सामाजिक सन्मान आणि धन संपदेत वाढ होईल. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असाल.

वृषभ : आरोग्याची विशेष काळजी घ्या
भविष्याच्या चिंतामुळे मनात नकारात्मक विचार येतील. आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजना सफल होतील. कामाच्या ठिकाणी सहकर्मचाऱ्यांचं सहकार्य मिळेल. धार्मिक कामांमध्ये आवड वाढण्याची शक्यता.

मिथुन : कुटुंबीयांचं सहकार्य मिळेल
संकटाच्या वेळी कुटुंबीयांची सोबत मिळेल. प्रॉपर्टीसंबंधित वाद मार्गी लागण्याची शक्यता. कुटुंबात लग्न समारंभाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता. आर्थिक स्थितीत मजबूत होईल. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

कर्क : पदोन्नतीची शक्यता
कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कार्यशैलीचं कौतुक करतील. व्यावसायिक करार वेळेत पूर्ण झाल्यास पदोन्नती होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशवारी होण्याची शक्यता आहे.

सिंह : मौल्यवान वस्तूच्या नुकसानीची शक्यता
एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा तिचं नुकसान होण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चांमुळे घरातील बजेट कोलमडू शकते. व्यावसायिक यात्रा करावी लागू शकते. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल.

कन्या : तणाव दूर होईल
योग्य खाणेपिणे आणि नियमित दिनक्रमामुळे तणाव दूर होईल. काही नवे करण्यासाठी उत्साहित असाल. एखाद्या प्रति प्रेम भावना निर्माण होतील. व्यावसायिक विस्ताराची योजना आखली जाईल. प्रवासाचा योग आहे.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

तूळ : कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता
बाह्य हस्तक्षेपामुळे कौंटुबिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदारीत फूट पडण्याची शक्यता आहे. आज वाहन चालवताना काळजी घ्या. प्रेमात त्रिकोणाची परिस्थिती निर्माण होईल. अचानक एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : स्वप्न लवकरच पूर्ण होईल
नवीन घर खरेदी करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होण्याचा योग आहे. व्यावसायिक यात्रेमुळे धन लाभाची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. अपत्याला खेळात पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.

धनु : मन अस्वस्थ राहील
एखाद्या भीतीमुळे मन अस्वस्थ होऊ शकते. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड निर्माण होईल. मित्रांच्या सहकार्यामुळे उत्पन्नाचे अन्य स्त्रोत मिळतील. व्यवहार प्रकरणात सतर्क राहा.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

मकर : वडिलांचे सहकार्य मिळेल
वडिलांच्या सहकार्यामुळे अडचणीतून दिलासा मिळेल. कुटुंबात तुमचा सल्ला अतिशय महत्त्वपूर्ण असेल. वादांपासून दूर राहा. धन संबंधी आनंदाची बातमी मिळू शकते.शिक्षण किंवा स्पर्धेत यश मिळेल.