7 जानेवारी 2020 चं राशीफळ, मेष राशीला मिळेल महागडी भेटवस्तू

7 जानेवारी 2020 चं राशीफळ, मेष राशीला मिळेल महागडी भेटवस्तू

मेष : महागडी भेटवस्तू मिळू शकते
सासरहून एखादी महागडी भेटवस्तू मिळू शकते. जोडीदारासोबत धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. नवीन संबंध दृढ होतील. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील.

कुंभ : विशेष जवळीक जाणवेल
एखाद्या जुन्या संबंधांप्रति विशेष जवळीक जाणवेल. वैयक्तिक बाबी लवकरच सोडवल्या जातील. नवीन संबंध व्यवसाय वाढीस मदत करतील. रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता आहे.

मीन : चांगल्या संधी गमावण्याची शक्यता
आळसामुळे चांगल्या संधी गमवाल. कामाच्या ठिकाणी किरकोळ भांडणामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत भेटीगाठी वाढतील. प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क राहा. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

वृषभ : करार रद्द होण्याची शक्यता
महत्त्वपूर्ण कामे रखडण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आवडीचे काम न मिळाल्यानं निराशा होईल. राजकारणात सक्रियता वाढेल. मित्रांसोबत झालेली भेट सुखद असेल.

मिथुन : तणाव वाढू शकतो
सहकर्मचाऱ्याच्या कटु वागणुकीमुळे मन अस्वस्थ राहील. तणाव वाढण्याची शक्यता आहे. मनाविरोधात प्रवास करावा लागू शकतो. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळेल. वर्दळ असणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. धार्मिक कार्यांमध्ये आवड वाढेल.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

कर्क : कलहातून सुटका मिळले
कौटुंबिक कलहातून सुटका मिळेल. सुखाची जाणीव होईल. प्रतिष्ठित व्यक्तींसोबत झालेली भेट सुखदायक असेल. सामाजिक कामांमध्ये सक्रिय राहाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.

सिंह : व्यावसायिक विस्ताराची शक्यता
आज वरिष्ठांकडून पदोन्नतीचे आश्वासन मिळू शकते. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. रखडलेली कामो पूर्ण होतील. एखाद्या संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग आहे.

कन्या : आर्थिक नुकसानीची शक्यता
निष्काळजीपणामुळे होणारे काम बिघडू शकते. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वडिलांच्या आरोग्याची चिंता राहील. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

तूळ : जुन्या आजारातून सुटका मिळेल
जुन्या आजारातून सुटका मिळेल. रचनात्मक कामांमध्ये आवड वाढेल. चांगल्या भविष्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. प्रियकरासोबत झालेली भेट सुखद असेल. व्यावसायिक यात्रा फायदेशीर ठरेल.

वृश्चिक : मन अस्वस्थ राहील
मुलांसंदर्भातील जबाबदाऱ्यांमुळे मन अस्वस्थ होईल. वरिष्ठांकडून तणाव वाढण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी त्रास देऊ शकतो. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बदलावे लागतील. व्यवहाराचे प्रश्न मार्गी लागतील.

धनु : पैशांसंबंधी आनंदाची बातमी मिळेल
प्रियकरासोबत फिरण्यात आणि खरेदी करण्यात वेळ व्यतित होईल. पैशांसंबंधी आनंदाची बातमी मिळू शकते.कामाच्या ठिकाणी सर्वांचं समर्थन मिळेल. राजकारणात आवड वाढू शकते. धार्मिक कामांमध्ये मन रमेल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

मकर : त्वचेसंबंधित समस्या
रक्तदाब किंवा त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. कोर्ट-खटल्याचे प्रकरणामुळे अस्वस्थ होऊ शकता. व्यवसायात नवीन करार स्थापित होण्याची शक्यता. रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांचा सहवास लाभेल.