8 जानेवारी 2020चं राशीफळ, मीन राशीला मिळेल मित्रांचं सहकार्य

8 जानेवारी 2020चं राशीफळ, मीन राशीला मिळेल मित्रांचं सहकार्य

मेष : विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागू शकतो
विद्यार्थ्यांना आपल्या हक्कासाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बदल होण्याचे योग आहेत. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. मित्रांच्या सहकार्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराचं भावनिक सहकार्य मिळेल.

कुंभ : गुडघे/पायदुखीमुळे त्रस्त
जोडीदार गुडघे किंवा पाय दुखीच्या समस्येमुहळे त्रस्त होऊ शकते. व्यावसायिक विस्ताराची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांची खेळामध्ये आवड निर्माण होईल. एखाद्या ठिकाणाहून आनंदाची बातमी मिळू शकते.

मीन : मित्रांचं सहकार्य पूर्ण मिळेल
संकटाच्या वेळी मित्रांचं संपूर्ण सहकार्य मिळेल. गरजवंतांची मदत केल्यानं आनंद मिळेल. तुमच्या सहकारी वर्तनामुळे सामाजिक प्रतिष्ठा आणि भेटवस्तूंमध्ये वाढ होईल. मित्रांच्या सहकार्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील.

वृषभ : अडकलेला पैसा मिळेल
कुटुंबीयांकडून भेटवस्तू मिळतील. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत एखाद्या समारंभात सहभागी होण्याची योजना आखली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांचे निकाल मिळू शकतात.

मिथुन : कामाच्या ठिकाणी अडचणी
टाळाटाळ करण्याची सवय प्रगतीच्या आड येऊ शकते. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. भागीदारी संपुष्टात आल्यानं आर्थिक नुकसान होऊ शकते. कायदेशीर प्रकरणांत तुमचा पक्ष अधिक बळकट होईल.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

कर्क : सर्दी-खोकल्याचा त्रास
अपत्याला सर्दी-खोकल्यामुळे त्रास होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. ज्या कामासंदर्भात तणाव आहे, ते काम लवकरात लवकर पूर्ण करा. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. राजकारणात आवड वाढू शकते.

सिंह : सहकर्मचाऱ्याकडे ओढ वाढेल
मनातील गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगितल्यास अडचणी दूर होतील. सामाजिक कामांमध्ये आवड वाढेल. प्रतिष्ठित लोकांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणार होईल. सहकर्मचाऱ्याकडे ओढ वाढू शकते.

कन्या : चांगले प्रस्ताव मिळतील
तरुणांना करिअरमध्ये चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढतील. महत्त्वपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. जुन्या समस्यांपासून मुक्तता मिळेल. प्रियकरासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

तूळ : आर्थिक बजेट बिघडेल
देखावा करण्याच्या नादात अनावश्यक खर्च वाढतील. आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे टाळा. नव्या संपर्कांमुळे लाभ होतील. धार्मिक कामांमध्ये श्रद्धा वाढेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

वृश्चिक : आरोग्य ठीक राहील
आरोग्य ठीक राहील. काही नवीन करण्यासाठी उत्साहित असाल. विद्यार्थ्यांना काही नवीन शिकण्यास सुरुवात करू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता. ज्या कामासंदर्भात समस्या आहे, ती कामे लवकर पूर्ण करा. जोडीदारासोबतचे संबंध सुमधुर राहतील.

धनु : गैरसमज दूर होतील
मित्रांसोबत झालेला एखादा गैरसमज दूर होऊ शकतो. सहकर्मचारी कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतील.वादांपासून दूर राहा. धार्मिक यात्रा होण्याची शक्यता आहे. व्यवहारांचे प्रकरण मार्गी लागतील.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

मकर : नवे काम सुरू होण्याची शक्यता
एखाद्या मोठ्या कार्यक्रमाची योजना आखली जाऊ शकते. नवीन कामाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सुख-सोयींच्या सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत परदेश प्रवासी होण्याची शक्यता. रखडलेली कामे पूर्ण होतील.