9 जानेवारी 2020चं राशीफळ, मेष राशीला कुटुंबाकडून मिळेल प्रेम

9 जानेवारी 2020चं राशीफळ, मेष राशीला कुटुंबाकडून मिळेल प्रेम

मेष : कुटुंबाकडून प्रेम मिळेल
कुटुंबीयांकडून भावनिक प्रेम मिळेल. सहकर्मचाऱ्याकडे ओढ वाढू शकते. आत्मविश्वासामुळे मोठं यश मिळवाल. सामाजिक सन्मान आणि भेटवस्तूंमध्ये वाढ होईल.

कुंभ : नव्या व्यवसायाची शक्यता
नवीन व्यवसाय सुरू होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती शक्यता आहे. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. तणाव दूर होईल. सामाजिक सन्मानात वाढ होईल. धार्मिक कामांमध्ये आवड वाढू शकते.

मीन :आरोग्य बिघडू शकते
जंकफूड खाल्ल्यानं आरोग्य बिघडू शकते. योग्य खाणेपिणे आणि नियमित दिनक्रम स्वीकारा. कायदेशीर वादांमधून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध सुमधुर होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

वृषभ :करार रद्द होण्याची शक्यता
महत्त्वपूर्ण कामांमध्ये निष्काळजीपणा दाखवल्यास महागात पडू शकते. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता. शिक्षण स्पर्धेत विद्यार्थ्यांना अधिक कष्ट करण्याची आवश्यकता आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता
आज भाग्य तुमच्यासोबत आहे. व्यवसायात कित्येक चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल.

कर्क : नोकरीचा शोध कायम राहील
मनासारख्या नोकरीचा शोध कायम राहील. कामाच्या ठिकाणी कामाचा अधिक भार आल्यानं त्रस्त असाल. आत्मविश्वास कमी होईल. वादांपासून दूर राहा. प्रेमसंबंधप्रति सतर्क राहा. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

सिंह : तणाव वाढू शकतो
कौटुंबिक कलहामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. वयोवृद्धांच्या आरोग्याची चिंता राहील. व्यावसायिक यात्रेची शक्यता आहे. आर्थिक स्थिती ठीक राहील. रचनात्मक कामांमध्ये आवड वाढू शकते. धार्मिक कामांमध्ये मन रमेल.

कन्या : कुटुंबाचं सहकार्य मिळेल
एखाद्याच्या हृदयात स्वतःसाठी जागा निर्माण करू शकता. एखादं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी कुटुंबाचं सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. जोडीदारासोबत लाँग ड्राईव्हवर जाण्याची योजना आखली जाऊ शकते.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

तूळ : नवी योजना यशस्वी होईल
व्यावसायिक नवी योजना यशस्वी होईल. कार्यकुशलतेमुळे पदोन्नती होण्याची शक्यता आहे. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. निरर्थक खर्चावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना सतर्कता बाळगा.

वृश्चिक : पैसे गमावू शकता
एखाद्याच्या संमोहनात अडकून आपले पैसे गमावू शकता. व्यवसायात कमी लाभ होईल. जोडीदाराचं भावनिक सहकार्य मिळेल. सासरहून आनंदाची बातमी मिळू शकते. सध्या फिरण्याची योजना टाळा.

धनु : उत्साही वाटेल
नेहमीच्या दिनक्रमामुळे तुम्हाला उत्साही वाटेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि भेटवस्तूमध्ये वाढ होईल. आर्थिक स्थिती भक्कम होईल. अडकलेले महत्त्वपूर्ण काम पूर्ण होईल. यात्रेचा योग आहे.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

मकर : वाद वाढण्याची शक्यता
कौटुंबिक संपत्तीवरून वाद वाढण्याची शक्यता आहे. प्रेम प्रस्तावात निराशा मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या मालमत्तेतून धन लाभाची शक्यता. कामाच्या ठिकाणी योग्य व्यवस्था लागू होण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात.