मिसकॅरेजचं दुःख कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

मिसकॅरेजचं दुःख कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

जीवन हे खूपच सुंदर आणि रहस्यमय गोष्टींनी भरलेलं आहे. जीवनाच्या प्रवासात प्रेम, लग्न, संसार, गर्भधारणा, बाळंतपण, मुलांचं संगोपन असे अनेक टप्पे येतात. लग्नानंतर या प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो जेव्हा घरात तान्ह्या बाळाचं आगमन होतं. आपल्यातून होणारी नवनिर्मिती ही भावनाच मुळात फार सुखकर आहे. मात्र लग्नानंतर काही जोडपी बाळाला जन्म देण्याचा निर्णय फारच उशीरा घेतात. ज्यामुळे त्यांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय मदत घ्यावी लागते. काहीजणींना करिअरमुळे हा निर्णय पुढे ढकलावा लागतो. पस्तिशीनंतर आई होणं सोपं नक्कीच नसतं. कारण निसर्गनियमांनुसार उशीरा बाळासाठी केलेल्या प्रयत्नांना पटकन यश मिळलेच असं नाही. सहाजिकच अशा महिलांना जास्त प्रमाणात मिसकॅरेजचा धोका निर्माण होतो. खरंतर मिसकॅरेज अथवा गर्भपात होण्यामागची कारणं निरनिराळी असू शकतात. व्हजानयल इनफेक्शन, काही आरोग्य समस्या, थायरॉईड असंतुलन, हॉर्मोनल असंतुलन, रोगप्रतिकार शक्तीची कमतरता, शारीरिक समस्या अशा अनेक कारणांमुळे एखाद्या स्त्रीला गर्भपाताला सामोरं जावं लागू शकतं. यामागचं कारण काहिही असलं तरी आजकाल अनेक जोडप्यांना या दुःखाला सामोरं जावं लागतं आहे हे मात्र नक्की.  आई होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मातेला अचानक मिळालेला मिसकॅरेजचा धक्का सहन करणं फार कठीण जातं. अशावेळी स्वतःची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच या गोष्टी तुमच्या फायद्याच्या ठरू शकतात.

Shutterstock

वस्तूस्थितीचा स्वीकार करा -

कोणताही मानसिक धक्का, दुःख कमी करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे. कारण जोपर्यंत तुम्ही घडलेल्या या गोष्टीचा स्वीकार करत नाही तोपर्यंत तुम्ही त्यातून बाहेर नक्कीच पडणार नाही. एकदा तुम्ही या वस्तूस्थितीचा स्वीकार केला की तुम्ही स्वतःला आणि जोडीदाराला यातून सावरणं शक्य होतं. जे काही घडलं ते थांबवणं तुमच्या हातात नव्हतं. त्यामुळे आता या गोष्टीचा अती विचार करून तुमचं भविष्य खराब करू नका. आई होणं ही एक गुंतागुंतीची आणि नाजूक भावना आहे. तेव्हा गर्भपात झाला आहे हे सत्य स्वीकार करणं गरजेचं आहे. तरंच तुमचं मन मजबूत होईल. असं न केल्यास तुम्ही या दुःखात अधिक खेचलं जाऊन तुम्हाला डिप्रेशन, मानसिक आजार होतील.

मन मोकळं करा -

जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या या भावनांना इतरांसमोर मोकळी वाट करून द्या. तुमच्या जोडीदारासोबत आणि कुटुंबासोबत याबद्दल मोकळेपणाने बोला. मनातल्या मनात स्वतःला याचा त्रास करून घेण्यापेक्षा घरातील लोकांशी याबद्दल स्पष्ट बोलणं नक्कीच योग्य ठरेल. जोपर्यंत तुम्ही मन मोकळं करत नाही तोपर्यंत तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे कोणालाच कळणार नाही. तुमच्या भावना समजल्यामुळे तुमचा जोडीदार आणि कुटुंबिय तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करू शकतील. 

Shutterstock

मित्रमैत्रीणींसोबत वेळ घालवा -

प्रत्येकाला आयुष्यात काही ना काहीतरी समस्या या असतातच. मात्र या समस्या कमी कशा करायच्या यासाठी शहाणपण वापरावं लागतं.  जेव्हा तुमच्या समस्या तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्ती अथवा जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करता तेव्हा त्या नक्कीच कमी होतात. जर तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमचा जोडीदार अथवा तुमच्या  कुटुंबियांना सांगू शकत नसाल तर त्या जवळच्या मैत्रीणींसोबत शेअर करा. मैत्रीचं नातं जगातील एक अतिशय सुंदर आणि प्रेमळ नातं आहे. फ्रेंडसोबत वेळ घालवल्यामुळे तुम्ही तुमचे दुःख काही काळासाठी नक्कीच विसराल. 

तुमचे मन इतर गोष्टींमध्ये गुंतवा -

आता तुमच्या मनातील या भावनांची तीव्रता जास्त आहे. म्हणून तुम्हाला एवढा त्रास होत आहे. मात्र यावर वेळ हेच एक उत्तम औषध आहे. जसा जसा वेळ जाईल तुम्ही या दुःखातून बाहेर पडाल. मात्र त्यासाठी तुम्ही तुमचा आताचा वेळ इतर गोष्टींमध्ये गुंतवायला हवा. यासाठी तुम्हाला बरं वाटेल, मनोरंजन होईल अशा गोष्टींमध्ये तुमचं मन गुंतवा. अचानक मिसकॅरेजच्या धक्क्या बसल्यामुळे तुम्हाला काहीच नकोसं वाटू लागलं आहे. गेल्या कितीतरी महिन्यांपासून तुम्ही तुमच्या बाळाची स्वप्न पाहिलेली असतील हे स्वप्न अगदी लवकरच पूर्ण होणार अशा अवस्थेत असताना अचानक स्वप्नभंग होणं नक्कीच त्रासदायक असू शकतं. मात्र आता वेळ यातून बाहेर पडण्याची आहे हे समजून घ्या.

समुपदेकांचा सल्ला घ्या -

मिसकॅरेजमुळे तुम्हाला मानसिक धक्का बसला आहे. जर तुमचा त्रास असह्य होत असेल तर मानसिक दुःखातून बाहेर पडण्यासाठी एखाद्या तज्ञ्जांची मदत घ्या. कारण स्वतःच स्वतःच्या भावनिक अवस्थेला हाताळण्यापेक्षा यासाठी एखाद्या प्रोफेशनलची मदत घेणं चांगलं ठरू शकतं. यासाठी मुळीच संकोच बाळगू नका. कारण ते तुमच्या फायद्याचं ठरेल.

भविष्याचा विचार करा -

तुम्ही आज ज्या अवस्थेचा सामना करत आहात त्याचा परिणाम तुमच्या भविष्यावर पडू देऊ नका. गेलेला काळ कधीच परत येत नाही पण तुमचं भविष्य मात्र तुमची नक्कीच वाट पाहात आहे. कारण भविष्यात तुम्ही पुन्हा आई नक्कीच होऊ शकता. समाजात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी भुतकाळात मिसकॅरेजचा सामना करूनही नंतर निरोगी आणि सक्षम बाळाला जन्म दिला आहे. जर तुम्हाला तुमचे उज्जल भविष्य हवे असेल तर आताच सावध व्हा आणि हे दुःख विसरण्याचा प्रयत्न करा. 

तुमच्या बाळाला इतर गोष्टींमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा -

बाळाला गमवण्याचं दुःख पचवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. जर तुम्ही पुन्हा कधीच आई होऊ शकत नसाल तर स्वतःला यासाठी दोषी ठरवू नका. जरी तुम्ही तुमच्या बाळाला जन्म नाही देऊ शकला तरी समाजात अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्यावर तुम्ही तुमच्या प्रेमाची पखरण करू शकता. समाजातील अनाथ आणि मदतीची गरज असलेल्या मुलांमध्ये तुमच्या बाळाला पाहा. त्यांना मदत केल्यामुळे तुम्हाला आई होण्यापेक्षा कितीतरीपट जास्त समाधान मिळेल. 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

वारंवार 'मिसकॅरेज' होत असेल तर करा हे उपाय

पस्तिशीनंतर नैसर्गिक पद्धतीने आई होण्यासाठी या टीप्स अवश्य फॉलो करा (How to get pregnant after thirty five)

आई व्हायचंय...तर गर्भावस्थेबद्दल सर्व गोष्टी घ्या जाणून