व्हजायनाच्या आजूबाजूला काळी वर्तुळं झाली असतील तर करा सोपे उपाय

व्हजायनाच्या आजूबाजूला काळी वर्तुळं झाली असतील तर करा सोपे उपाय

मुलींना अथवा महिलांना बऱ्याचदा व्हजायनाच्या  आजूबाजूला काळी वर्तुळं निर्माण होण्याचा त्रास सहन करावा लागतो. अन्य त्वचेच्या तुलनेत महिलांची ही त्वचा अधिक काळी पडते. शिवाय व्हजायना आणि त्याच्या आजूबाजूचा भाग हा इतका संवेदनशील असतो की, तिथे तुम्हाला अन्य कोणत्याही प्रकारेच कॉस्मेटिक्स अथवा उत्पादन वापरता येत नाही. पण तुम्हाला व्हजायनाच्या आजूबाजूची ही काळी वर्तुळं काढून टाकायची असतील तर काही सोपे घरगुती उपाय आहे. बऱ्याचदा गुप्तांगावरील केस काढून टाकण्यासाठी आपण रेझर अथवा क्रिम्सचा वापर करतो. पण ज्याने तुम्हाला कोणतंही नुकसान होणार नाही आणि त्वचाही उत्तम राहील असे सोपे उपाय हवेत. तसंच त्वचेची व्यवस्थित काळजी घेता येईल. आपण बऱ्याचदा व्हजायनाच्या आजूबाजूच्या त्वचेला त्रास नको म्हणून त्यावर काहीच उपाय करत नाही आणि तो काळा झालेला भाग तसाच राहू देतो. पण हे चुकीचं आहे. आपल्या शरीरावरील प्रत्येक भाग हा साफ आणि स्वच्छ राहायला हवा. त्यासाठी तुम्ही हे आम्ही देत असलेले उपाय बिनधास्त घरच्या घरी पाहून करू शकता. याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होणार नाही. तुम्हाला अगदीच काही त्यामध्ये धोका वाटत असेल तर त्वचेवर उपाय करण्यापूर्वी एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी नक्की बोलून घ्या. पाहूया नक्की काय आहेत हे सोपे घरगुती उपाय - 

1. लिंबू आणि मध

Shutterstock

यासाठी आपण  अर्ध लिंबू कापून त्याचा रस काढून घ्यावा. लिंबाच्या सालावर तो रस आणि मध लावून ते साल साधारण 5 मिनिट्सपर्यंत व्हजायनाच्या आऊटर भागावर लावून मसाज करा. असं दिवसातून तुम्ही दोन वेळा करा. साधारण 15 दिवसात तुम्हाला याचा उत्तम परिणाम दिसून येईल. व्हजायनाच्या आजूबाजूला असणारी काळी वर्तुळं अथवा काळा भाग तुम्हाला निघून गेलेला दिसून येईल. तुम्हाला त्यासाठी जास्त त्रास घ्यायचीदेखील गरज भासणार नाही. 

2. कोरफड

Shutterstock

व्हजायनाच्या आजूबाजूला काळ्या झालेल्या भागावर तुम्ही कोरफड जेल लावा. तुम्ही ही जेल लावून त्या भागावर मसाज करा. तुम्हाला हवं तर कोरफडीच्या पानानेदेखील तुम्ही हा मसाज करू शकता. साधारण 10 मिनिट्स मसाज केल्यानंतर अतिशय स्वच्छ आणि मऊ कपड्याने हा भाग पुसून घ्या. त्यानंतर अर्ध्या तासाने पाण्याने ही जागा स्वच्छ धुवा. असं तुम्ही साधारण आठवड्यातून तीन ते चार वेळा करा. तुम्हाला याचा 10 दिवसात चांगला परिणाम दिसून येईल. 

जाणून घ्या व्हजायनल यीस्ट इन्फेक्शनची कारणं आणि घरगुती उपचार

3. हळद आणि मध

Shutterstock

यासाठी तुम्ही अजून एक उपाय करू शकता तो हळद आणि मधाचा. 1 चमचा मधामध्ये तुम्ही 2 चिमूटभर हळद मिक्स करा. त्यानंतर व्हजायनाच्या आजूबाजूच्या काळ्या वर्तुळांना हे मिश्रण लावा आणि मसाज करा. मसाज केल्यानंतर साधारण 15 मिनिट्स हे तसंच राहू द्या. असं दिवसातून तुम्ही कमीत कमी दोन वेळा करा. तुम्हाला योग्य परिणाम हवा असल्यास हे तुम्ही रोज 15 दिवस सतत करायला हवं.lime juice

4. लिंबाची सालं

Shutterstock

तुम्ही व्हजायनच्या आजूबाजूला काळ्या वर्तुळांच्या भागावर लिंबाची सालं रगडू शकता. यामध्ये सायट्रिक अॅसिड असतं, जे त्वचेचा  रंग उजळण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यासाठी तुम्ही लिंबू धुवा आणि ते कापून घ्या आणि त्याचा रस काढून टाका. त्यानंतर त्याची सालं घेऊन ती रगडा आणि हे तसंच साधारण अर्धा तास राहू द्या. त्यानंतर पाण्याने ती जागा स्वच्छ धुवा. 

यीस्ट इन्फेक्शनशिवाय ‘या’ ५ कारणांनीही येऊ शकते व्हजायनामध्ये खाज

5. बटाट्याचा रस

Shutterstock

तुम्ही बटाट्याचे स्लाईस कापून घ्या. आता हे स्लाईस काळ्या झालेल्या भागावर घासा अथवा याचा रस लावून मसाज करा. दिवसातून दोन वेळा साधारण 10-10 मिनिट्स तुम्ही हे करून पाहा. आठवड्याभरात तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल. व्हजायनाच्या  आजूबाजूचा काळा भाग निघून जाऊन तिथे तुमची उजळलेली त्वचा दिसून येईल.

अशा प्रकारे घ्या आपल्या ‘प्रायव्हेट पार्ट’ च्या हायजीनची काळजी

6. हळद आणि कोरफड

Shutterstock

हे कॉम्बिनेशनदेखील उत्तम काम करतं. कोरफड जेल 1 चमचा घ्या आणि त्यामध्ये साधारण 2 चिमूटभर हळद मिक्स करा. हे नीट मिक्स करून घ्या आणि त्या भागाला लावून मसाज करा. काही वेळ ठेवा आणि मग धुवा. ही प्रक्रिया तुम्ही दिवसातून किमान दोन वेळा तरी करा. योग्य परिणामासाठी तुम्ही हे सतत 15 दिवस करून पाहा. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.