ADVERTISEMENT
home / Periods
सॅनिटरी पॅडच्या कडा मांड्याना लागतात.. मग करा या सोप्या आयडिया

सॅनिटरी पॅडच्या कडा मांड्याना लागतात.. मग करा या सोप्या आयडिया

पिरेड्स कोणालाच नको असतात. म्हणजे त्याचा त्रास पाहता ते येऊच नये असे वाटतात. पण तुम्हाला आम्हाला नको असं म्हणून कसं चालेल नाही का? दर महिन्याला पिरेड्स हे येणारच आणि ते आल्यानंतर होणारा त्रासही होणारचं. आता काहींना पोटदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी.. कंटाळा येणं.. काहीही न करावसं वाटणं असे त्रास होतच असतात. पण तुम्हाला सॅनिटरी पॅड लागण्याचा त्रास होतो का? जर तुमचं उत्तर हो असेल तर मग तुमच्यासाठी आम्ही काही आयडियाच घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्हाला सॅनिटरी पॅडच्या कडा बोचणार नाही आणि पिरेड्सच्या पाचही दिवसात तुमच्या मांड्या सलामत राहतील. मग पाहुयात अशा काही आयडियाज

उन्हाळ्यात तुम्हालाही नकोसे होतात पिरेड्स, मग वाचाच

Instagram

ADVERTISEMENT

इंटिमेट पावडर

Instagram

हल्ली बऱ्याच जणी याचा वापर करतात. म्हणजे तुमच्या नाजूक भागांसाठीच  ही पावडर असते. ज्यांना खूप घाम येतो त्यांच्यासाठी ही पावडर अगदीच बेस्ट आहे. आता पिरेड्सच्या दरम्यान जेव्हा तुम्ही सॅनिटरी पॅड घालता त्यावेळी तुमच्या मांड्यांना घाम येतो. सतत होणाऱ्या फ्लोमुळे तुम्हाला खाली चिकट वाटत राहते. तुम्हाला प्रत्येकवेळी वॉशरुमला जाऊन ती जागा पुसता येत नाही किंवा स्वच्छ करता येत नाही. शिवाय तुम्ही घातलेली पँटी तंग असेल तर मग खाज किंवा ती लागण्याची शक्यता थोडी जास्तच असते. अशावेळी तुम्ही जर ही इंटिमेट पावडर लावली जर तुम्हाला आराम मिळेल. या पावडरमुळे मांड्यामध्ये होणारं घर्षण कमी होतं. त्यामुळे तुम्ही इंटिमेट पावडरचा वापर करा.( सॅनिटरी पॅड लावण्याआधी पँटीच्या कडांना ही पावडर लावू नका. कारण त्यामुळे तुमच्या पँटीचा गोंद कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सॅनिटरी पॅड लावल्यानंतर तुम्ही त्याच्या कडांना इंटिमेट पावडर लावा. 

पिरेड्समध्ये फ्लो सुरळीत होण्यासाठी करा हे घरगुती उपाय

ADVERTISEMENT

बनियनचा करा वापर

shutterstock

काही जणांच्या सॅनिटरी पॅडच्या विंग्स निघाल्यामुळे डाग पँटींच्या कडांना लागतात अशावेळी तुम्हाला सोपी आयडिया हवी असेल तर तुम्ही बनियनचा पातळ कपडा वापरु शकता. सॅनिटरी पॅड लावण्याआधी तुम्ही तुमच्या पँटीभोवती पातळ बनियनचा कपडा फिरवा. बनियनचा कपडा टिकवून राहावा यासाठी तुम्ही हा चौकौनी तुकडा खालून वर फोल्ड करा आणि त्यावर मग सॅनिडरी पॅट चिकटवा. बनियनच्या तुकड्यामुळे तुमच्या पँटी तुम्हाला अजिबात लागत नाहीत. शिवाय पँटीच्या कडांना डागही लागत नाही. हा बनियनचा कपडा तुम्ही स्वच्छ करुन मगच वापरा. यासाठी तुम्ही पुरुषांच्या बनियनचा वापर करु शकता कारण हा कपडा तुम्ही स्टरलाईज करुन घ्या.

कॉटन पॅडचा करा वापर

ADVERTISEMENT

shutterstock

आता जर तुम्हाला सॅनिटरी पॅड बदलता आले तर उत्तम. तुम्ही प्लास्टिकचे सॅनिटरी पॅड वापरत असाल तर तुम्ही कॉटन सॅनिटरी पॅडची निवड करा. पातळ आणि 100 टक्के कॉटन पॅड असले तरी त्याच्या बुडाशी प्लास्टिक असते. पण हे प्लास्टिक पातळ असते. त्यामुळे ते इतर पॅडच्या तुलनेत लागत नाही. शक्यतो सॅनिटरी पॅड  किमान 3 ते 4 तासांनी बदला. तुमच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या गोष्टींमध्ये बजेट पाहू नका. कारण त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. 

आता पिरेड्सच्या वेळी काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त काही गोष्टींची काळजी घ्या. 

पिरेड्समध्ये फ्लो सुरळीत होण्यासाठी करा हे घरगुती उपा

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

01 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT