मनातील असुरक्षितेची भावना कमी करण्यासाठी करा हे उपाय

मनातील असुरक्षितेची भावना कमी करण्यासाठी करा हे उपाय

आयुष्यात प्रत्येकालाच कधी ना कधी तरी असुरक्षित वाटत असतं. प्रत्येकासाठी या असुरक्षितपणाचं कारण नक्कीच निराळं असू शकतं. मात्र या भावनेमुळे जीवन जगणं असह्य होतं.  कधी कोणाला आर्थिक बाबतीत असुरक्षित वाटतं तर कोणाला करिअरबाबत असुरक्षित वाटतं. कोणाला रिलेशनशिपमध्ये असुरक्षित वाटतं तर कोणाला कमी आत्मविश्वास असल्याने जगाचा सामना करण्यात असुरक्षिता वाटू शकते. प्रत्येकाचं कारण निराळं असलं तरी प्रत्येकाला या भावनेवर मात करता येणं फारच आवश्यक आहे. कारण जर तुम्ही या समस्येवर लवकर मात नाही केली तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.

तुमच्या मनातील असुरक्षिततेची भावना कशी ओळखाल -

अती अपेक्षा आणि आग्रह यातून असुरक्षिततेची भावना निर्माण होते. अनेकदा अनावश्यक भितीतूनदेखील ही  भावना होते. सतत नकारात्मक विचार केल्याने ही भावना वाढतच जाते. मात्र ही भावना लवकर लक्षात आली तर तिच्यावर मात करणं सोपं जातं. यासाठीच वेळीच ही भावना समजून घ्या. कारण उशीर झाल्यास या भावनेचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होऊ शकतं. 

1. सतत चिडचिड करणे अथवा एखाद्या गोष्टीबाबत अती चिंता करणे हे यामागचे महत्त्वाचे लक्षण आहे. लोक तुमच्याबाबत काय आणि कसा विचार करतात. याचा तुम्ही फार विचार करत असाल तर तुमच्या मनात ही असुरक्षतेची भावना निर्माण होते. जर तुम्ही इतरांपेक्षा दिसण्यात, वागण्यात कुठेतरी कमी पडत आहात असं तुम्हाला वाटू लागलं की तुमची चिडचिड होते. काही घडलं की आपणच याला कारणीभूत आहोत असं सतत वाटण्यामुळेही तुम्ही स्वतःला असुरक्षित समजू लागता. 


2. मनातील इनसिक्युअरिटीची भावना ओळखण्याचं हे एक आणखी महत्त्वाचं लक्षण  आहे. गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा अती प्रयत्न करणे. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीला जास्त नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असते. अशावेळी  तुम्हाला तुमच्या हातातून काहीतरी निसटत आहे असं वाटत असतं. म्हणूनच सर्व गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये असाव्या असं तुम्हाला वाटू लागतं. 


3. तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असुरक्षित असता तेव्हा ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाऊ नये यासाठी तुम्ही त्यांची अती काळजी घेण्याचा प्रयत्न करता. मात्र तुमच्या अती काळजीचा त्या व्यक्तीवर कधी कधी चुकीचा परिणाम होत  आणि परिस्थिती नाजूक होऊ लागते. म्हणूनच अती काळजी करणं हे यामागचं आणखी एक लक्षण आहे.

Shutterstock

असुरक्षित भावनेमागची कारणे -

लहानपणी ज्या मुलांना चुकीची वागणूक मिळते अशा लोकांच्या मनात मोठेपणी असुरक्षितेतची भावना असू शकते.

काही मुलांचे पालक सतत भांडत असतात, त्यांच्या घटस्फोट होतो, लहानपणासून घरात वादविवाद  पाहिल्यामुळे अशा मुलांना मोठेपणी असुरक्षित वाटतं.

काही मुलांना आयुष्यात कधीच चांगले मित्र मैत्रिणी मिळत नाहीत ज्यामुळे मोठेपणी ते एककोंडे होतात. 

जर एखाद्याला रिलेशनशिपमध्ये धोका सहन करावा लागला तर ती व्यक्ती इनसिक्युअर होण्याची शक्यता जास्त असते.

ज्या लोकांचा आत्मविश्वास कमी असतो आणि स्वतःवर प्रेम नसतं अशी माणसं नेहमीच असुरक्षित भावनेत असतात.

असुरक्षिततेच्या भावनेवर अशी करा मात -

नात्यातील असुरक्षिततेवरील उपाय -

ज्यांना कोणत्याही जवळच्या नात्याबाबत असुरक्षित वाटत असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या प्रिय व्यक्तीशी याबाबत प्रेमाने आणि मोकळेपणाने बोलायला हवं. कारण काही गोष्टी फक्त मनात ठेवल्यामुळे तुमचा प्रश्न सुटत नाही. सुसंवाद हा कोणत्याही नात्याला सुदृढ करणारा दुवा आहे. शिवाय तुमच्या नात्याची तुलना कधीच इतरांशी करू नका. कारण प्रत्येकाचं नातं हे कधीच सारखं असू शकत नाही. नातेसंबंधाचे बंध निरनिराळे असतात. तुम्ही ते कसं निर्माण करता यावर ते किती टिकणार हे ठरत असतं. जर तुमच्या प्रिय व्यक्तीकडून एखादी चुक झाली तर त्या चुकीमुळे त्या व्यक्तीला नियंत्रणात ठेवण्यापेक्षा प्रेमाने त्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करा. कारण बंधनामुळे ती व्यक्ती तुमची कधीच होऊ शकत नाही. मोकळेपणाने संवाद साधून तुमचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. 

मित्रमैत्रिणींसोबत असुरक्षितेवरील उपाय -

मित्रमैत्रिणी टिकवण्यासाठी तुम्हाला निस्वार्थी मैत्री करावी लागेल. यासाठी स्वतः पुढाकार घ्या. कारण अशा पद्धतीने निर्माण झाली निस्वार्थ मैत्री तुमच्यासोबत कायम राहते. शिवाय मित्रमैत्रिणी निवडतानाच सावधपणे ते निवडा. चुकीच्या लोकांशी केलेली मैत्री तुमच्यासाठी कायम त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच सावध राहून मित्रमैत्रिणी निवडा ज्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्हाला असुरक्षित वाटणार नाही.

करिअरबाबत असलेल्या असुरक्षिततेवरील उपाय -

करिअरमध्ये नाव, पैसा आणि यश मिळवावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र त्यासाठी सतत चिंता आणि काळजी करणं चुकीचं आहे. यश मिळवण्यासाठी प्रयत्न जरूर करा मात्र यश मिळालंच पाहिजे असा अट्टाहास करू नका. करिअरबाबत विनाकारण चिंता न केलेलीच बरी. जर तुमचा एखादा दिवस त्रासदायक गेला असेल तर तुमच्या चुका मान्य करून पुन्हा त्या चुका करू नका. आधीच्या अनुभवातून शिका. अती आग्रह आणि सतत इतरांकडून अपेक्षा करणं टाळा. इतर सहकाऱ्यांशी उगाचच स्वतःची तुलना करत बसू नका. कामावर प्रेम करा आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करा. यश आज नाहीतर उद्या तुम्हाला मिळणार यावर विश्वास ठेवा. 

स्वतःबाबत असुरक्षिततेवरील उपाय -

स्वतःबद्दल असुरक्षित वाटण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव असणे. म्हणूनच स्वतःवर प्रेम करायला शिका. त्याचप्रमाणे जगात कोणीही परफेक्ट असेलच असं नाही. सहाजिकच प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होण्याचा आग्रह धरू नका. कधी कधी काही गोष्टींसाठी स्वतःला माफ करायला शिका. सकारात्मक विचार देणाऱ्या माणसांच्या आणि पुस्तकांच्या सहवासात राहा. जितकं आनंदी राहाल तितका आनंद तुमच्या जीवनात निर्माण होत राहील. 

फोटोसौजन्य -शटरस्टॉक

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

चंचल मन एकाग्र ठेवण्यासाठी करा ‘या’ 5 योगासनांचा सराव

आनंदी राहण्यासाठी डोक्यातील 'डिलीट' बटणाचा करा वापर


आनंदी राहण्यासाठी डोक्यातील 'डिलीट' बटणाचा करा वापर