केस गळतीवर वेळीच करा उपचार

केस गळतीवर वेळीच करा उपचार

स्त्री असो वा पुरुष दोघांच्या सौंदर्यात केस हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मात्र बदलती जीवनशैली, हार्मोन्सचे असंतुलन, वाढता ताणतणाव, प्रदूषण अशा विविध कारणांमुळे केस गळतीची समस्या वाढल्याचं दिसून येत आहे.

पुरूष आणि स्त्रियांमधील केस गळतीची प्रमुख कारणं

पुरुषांमधे केस गळती विशिष्ट प्रकारे होत असल्याचं दिसून येतं. ज्यामध्ये सुरुवातीला केस विरळ होतात. सामान्यतः अशाच प्रकारे केस गळू लागतात आणि पुरुषांमध्ये वयाच्या कोणत्याही टप्प्यावर याची सुरुवात होऊ शकते. अगदी त्याच्या पौगंडावस्थेत देखील ही समस्या उद्भवू शकते. असं साधारणतः तीन घटकांच्या आंतरक्रियेमुळं होतं, टक्कल पडण्याची अनुवांशिकता, पुरुषी संप्रेरक आणि वाढतं वय. 

Shutterstock

तर स्त्रियांमध्येही डोक्याचा वरचा संपूर्ण भाग किंवा वेणीचा भाग विरळ होऊ शकतो. याला अपवाद असतो तो फक्त कपाळावरचा भाग. थायरॉईड समस्या (जसं हायपोथायरॉईडीझम किंवा हायपरथायरॉईडीझम) लैंगिक संप्रेरकांचं असंतुलन किंवा एखादा गंभीर पोषणात्मक आजार, विशेषतः प्रथिनं, लोह किंवा बायोटीन यांची कमतरता अशा प्रकारच्या वैद्यकीय आजारांमुळं केस गळणं हे एक लक्षण दिसू शकतं.

मासिक पाळी आणि सेक्स हार्मोनमुळेही केसगळती

मर्यादित आहार घेणारे लोक किंवा ज्या स्त्रियांना अतिप्रमाणात मासिक स्त्राव होत असेल त्यांच्यामध्ये ही कमतरता अधिक प्रमाणात दिसून येतात. मेल पॅटर्न बॉल्डनेस किंवा फिमेल पॅटर्न बॉल्डनेस हा अनुवंशिक घटकही केसगळतीचं प्रमुख कारण असतो. जनुकीयदृष्ट्या ही अवस्था उद्भवण्याच्या शक्यता असलेल्या लोकांमध्ये सेक्स हॉर्मोनमुळे केस कायमचे गळू शकतात. हा घटक पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून येत असून याची सुरुवात पौगंडावस्थेपासूनही होऊ शकते.

काय आहेत केस गळतीवर उपचार

Shutterstock

केस गळतीच्या उपचारात केसांची देखभाल, केस गळण्यास प्रतिबंध तसेच केसांची वाढ यांचा समावेश आहे. हे उपचार प्रामुख्याने तीन प्रकारे केले जातात. केस गळतीसाठी औषधं, मुळापासून केस येण्याकरिता शस्त्रक्रिया आणि ज्या व्यक्तींमध्ये केसांची वाढ किंवा कृत्रिम उपाय करणे शक्य नाही अशा लोकांसाठी कृत्रिम त्वचा. यापैकी बहुतेक सर्व केस आपल्या केसांचे शेडिंग कमी करण्यासाठी, वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि काही प्रकरणांमध्ये केस गळती लपविण्यासाठी डिझाईन केलेले आहेत.

 

औषधोपचार

Shutterstock

केसांच्या वाढीचा टप्प्यात तसंच अधिक केस गळती होऊ नये याकरिता गोळ्या आणि सप्लीमेंटचा वापर केला जातो. बायोटिन, स्पायरुलिना, लोहाचा समावेश असलेल्या गोळ्या तसेच मायक्रोन्युट्रिएंट कॉम्बीनेशनसारख्या पूरक घटकांचा वापर केला जातो.


मिनॉक्सिडील : (2%, 5% किंवा 10% सोल्युशन) हे स्प्रे, जेल व लोशन असून टक्कल पडलेल्या भागावर दिवसातून दोन वेळा थेट स्कॅल्पवर लावायचे असते. मिनॉक्सिडीलमुळे पुरुष आणि महिलांमधील केसगळती कमी होते, केसांची मुळे वाढतात आणि केस जाड होतात.


फेनास्टेरॉईड : हे औषध 5-अल्फा रेड्युक्टेस टाईप-क हे एनझाईम स्त्रवण्याला प्रतिबंध करते. हे एन्झाईम टेस्टोस्टेरॉनपासून केसांच्या बीजामधील डिहायड्रोस्टेटे स्टोस्टेरॉनमध्ये (डीएचटी) परिवर्तित करते. अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाने मान्यता दिलेले केसगळतीसाठी हे एकमेव ओरल मेडिसीन (तोंडावाटे घ्यायचे औषध) आहे.

 

ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट इंजेक्शन्स

हे घटक उपचार करणार्‍या पेशी एकत्र करण्यासाठी जबाबदार असतात. उर्वरित केसांच्या मुळांना वाढण्यास प्रारंभ करण्यासाठी समान घटकांचा वापर केला जातो. रुग्णाच्या स्वत: च्या रक्ताद्वारे घेतलेल्या या इंजेक्शनचा नियमित वापर केल्यास उल्लेखनीय सुधारणा होऊ शकते. चांगल्या परिणामांसाठी किमान 6 महिन्यांचा उपचार आवश्यक आहे.

केस प्रत्यारोपण

केस प्रत्यारोपण करण्याच्या प्रामुख्याने 2 पद्धती आहेत

एफयुई - ज्या भागात काढून लावण्याजोगे केस आहेत तेथून ते काढले जातात आणि टक्कलग्रस्त भागावर, सुया चिमटा किंवा इम्प्लांटर्स वापरुन त्यांचे रोपण केले जाते.

एफयुटी - सुरक्षित दात्याच्या क्षेत्रामधून त्वचेचा एक तुकडा कापला जातो, त्याचे बारीक तूकडे करून टक्क्ल असलेल्या भागात सुया चिमटा किंवा इम्प्लांटर्स वापरुन त्यांचे रोपण केले जाते.

वरील लेखातील माहिती दिली आहे डॉ मोहन थॉमस यांनी. जे कॉस्मेटीक सर्जन असून कॉस्मेटीक सर्जरी इन्स्टीट्युटमध्ये कार्यरत आहेत. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.