जर तुमचंही मुलं दूध पित नसेल तर करा हे उपाय

जर तुमचंही मुलं दूध पित नसेल तर करा हे उपाय

आजकाल प्रत्येक आई मुलाच्या दूध न पिण्याच्या सवयीमुळे हैराण असते. तिसऱ्या वर्षांपर्यंत आवडीने दूध पिणारी मुलं नंतर मात्र दूध पिण्यास टाळाटाळ करू लागतात. जी मुलं स्तनपान किंवा बाटलीने आवडीने दूध पितात. ती नंतर पेल्याने दूध पिण्यास नकार देतात. एकीकडे छोटी मुलं आवडीने दूध पितात तर जसंजशी ती मोठी होऊ लागतात ती दूधाचा ग्लास तोंडालाही लावत नाहीत. ज्यामुळे त्यांना पुरेशी पोषक तत्त्वं मिळत नाहीत. परिणामी शरीरात कॅल्शिअम आणि आर्यनची कमतरता निर्माण झाल्यामुळे शारिरीक आणि मानसिक विकास हळू गतीने होऊ लागते.

Canva

अनेक मातांना यामुळे मुलांच्या पोषणाबाबत चिंता वाटू लागते. कारण वाढत्या वयात मुलांनी दूध पिणं खूप गरजेचं आहे. पण जर तुमचं मुलंही दूध पिण्यास टाळाटाळ करत असेल तर पुढील उपाय करून पाहा.

1. फ्लेवर्ड दूध

अनेकदा मुलांना दूधाची चव आवडत नाही. त्यामुळे ते दूध पिण्यास नकार देतात. अशावेळी तुम्ही दूधामध्ये चॉकलेट किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवर घालून त्यांना देऊ शकता. मुलं असं फ्लेवर्ड दूध लगेच पितील.

2. नाश्त्याआधी दूध

जेव्हा मुलं उपाशी असतं तेव्हा त्यांना तुम्ही दूध प्यायला द्या. सकाळी रिकाम्या पोटी असलेली मुलं दूध लगेच पितात. तसंच खेळता खेलता मुलांना दूध प्यायला देण्याचा प्रयत्न करा.

3. आवडत्या कार्टूनचा ग्लास

तुमच्या मुलांना जे कार्टून आवडत असेल त्याचा मग किंवा कप आणून त्यात दूध प्यायला द्या. मग पाहा मुलं पटकन दूधाचा ग्लास रिकामा करतील.

4. मिल्कशेक बनवून द्या

तुम्ही विविध प्रकारचे मिल्कशेक्स बनवूनही मुलांना प्यायला देऊ शकता. ज्या ऋतूत जी फळं उपलब्ध असतील ती घालून मिल्कशेक बनवा. यामुळे मुलांना दूधाचं आणि फळाचं दोन्ही पोषण मिळेल.

Shutterstock

जर वरील उपाय करूनही मुलांनी दूध पिण्यास नकार दिला तर…

  • संत्र्याचा रस द्या
  • पोळी खाऊ घाला
  • त्यांच्या आहारात सोयाबीनचा समावेश करा
  • ताज्या फळांचा मिल्कशेक करून द्या.
  • भाज्यांचं सूप करून ते द्या
  • सॅलड किंवा कोशिंबीरी खाण्याची सवय लावा.
  • बदाम आणि चण्यांचा आहारात समावेश करा.

Canva

शेवटी मुलांनी कितीही नखरे केले तरी आपलं कर्तव्य आहे की, त्यांना युक्ती करून दूध देणं. मग तुम्हीही वरील उपाय नक्की करून पाहा. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.