ADVERTISEMENT
home / Diet
डाएटमध्ये असतील असे चमचमीत पदार्थ तर जंक फूड खाण्याचा होणार नाही मोह

डाएटमध्ये असतील असे चमचमीत पदार्थ तर जंक फूड खाण्याचा होणार नाही मोह

नव्या वर्षात तुम्ही डाएट करायचं अगदी मनापासून ठरवलं असेल तर तुमच्यासाठी आजचा विषय हा खास आहे. याचं कारण असं की, डाएट करायचा अनेकदा आपण विचार करतो पण आपल्याकडून डाएट होत नाही. उद्यापासून डाएट करायचा विचार केला की नेमकं त्याच दिवशी आपल्याला काहीतरी बाहेरचं चटपटीत खाण्याची इच्छा होते. आता या चटपटीत पदार्थांविषयी सांगायचे झाले तर बर्गर, फ्राईज, पिझ्झा, मोमोज, चायनीज असे हे पदार्थ असतात. ज्यांचा सुंगध आला की आपल्याला अगदी आवरतच नाही. जर तुम्ही करत असलेल्या डाएटमध्ये चमचमीत पदार्थ नसतील तर असचं होणार….कोण म्हणतं तुम्ही डाएटमध्ये चमचमीत पदार्थ खाऊ शकत नाही. तुम्ही अगदी हमखास हे पदार्थ खाऊ शकता. पण हे चमचमीत पदार्थ थोडे वेगळे आहेत. जाणून घेऊया असेच काही खास पदार्थ जे तुम्ही डाएटमध्ये खाऊ शकता. जे खाल्ल्यामुळे तुमचे वजनही वाढणार नाही… मग करुया सुरुवात

चिंतामुक्त होण्यासाठी करा ही पाच योगासने

चटपटीत चना चाट

Instagram

ADVERTISEMENT

आता तुम्ही अनेकदा चना चाटची गाडी पाहिली असेल. असे चना चाट तुम्हाला घरी करता येतील. 

साहित्य:उकडलेले काळे चणे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली काकडी,  कोथिंबीर- मिरची-आलं-लसूण याची चटणी, चाट मसाला, लिंबू (आवडत असेल तर) 

कृती: एका बाऊलमध्ये उकडलेले चणे घेऊन त्यात आवडीनुसार बारीक चिरलेला कांदा- टोमॅटो- काकडी आणि चटणी घालून त्यात चाट मसाला आणि छान लिंबू पिळा.  गरम गरम चणे तुम्ही खाल्ले तर फारच उत्तम. कारण हा पदार्थ गरमच छान लागतो. 

(तुमच्या संध्याकाळच्या भुकेवेळी तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता.) 

ADVERTISEMENT

डाएट पास्ता

Instagram

पास्ता हा पदार्थ सुद्धा अनेकांना आवडतो.  जंक फूडमध्ये येणारा हा प्रकार तुम्ही डाएटमध्ये सुद्धा खाऊ शकता. 

साहित्य: तुम्हाला आवडणारा पास्ता ( फक्त गव्हाचा पास्ता वापरल्यास उत्तम), तुमच्या आवडीनुसार  सॉस ( रेड अँड व्हाईट) भरपूर भाज्या 

ADVERTISEMENT

कृती: पास्ता छान उकडून घ्या.  एका पॅनमध्ये तेल गरम करुन तुम्हाला आवडत असेल तर आलं- लसूणची हलकी फोडणी द्या. त्यात आवडीच्या भाज्या घालून परतून घ्या. लो फॅट सॉस घालून ते परता आणि उकडलेले पास्ता घालून गरमा गरम पास्ता खा.आता पास्ता खाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तो अगदी एक लहान बाऊल खायचे आहे.

ब्राऊनब्रेड चीझ सँडवीच

Instagram

चीझ अनेकांचा वीक पाँईट असतो. त्यांना प्रत्येक गोष्टीत चीझ हवं असतं. तुम्ही असे चीझ लव्हर असाल तर तुम्हाला डाएटमध्ये असतानाही चीझ खाता येऊ शकते. 

ADVERTISEMENT

साहित्य: ब्राऊन ब्रेड, चीझ स्लाईस, भाज्या आवडत असल्यास 

कृती: ब्राऊन ब्रेड स्लाईस घेऊन तुम्हाला त्या तव्यावर परतून घ्या.गरम ब्रेड स्लाईसवर तुमच्या आवडीचे तीझ स्लाईस घेऊन त्यावर लेट्युस, काकडी, कांद्याच्या स्लाईस ठेवायच्या आहेत. तयार सँडवीच तुम्ही मस्त सर्व्ह करा. ( यात तुम्हाला व्हरायटी हवी असेल तर तुम्हाला यामध्ये अंड्याचं आम्लेटही घालता येईल. तुमच्या ब्रेकफास्टमध्येही तुम्ही याचा समावेश करु शकता) 

पोटातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पपई

ग्रील्ड तंदुरी

ADVERTISEMENT

Instagram

आता #chickenlover असणाऱ्यांसाठी एक आवडती रेसिपी म्हणजे ग्रील्ड तंदुरी. 

आता डाएटसाठी ती कशी बनवायला हवी ते पाहुया. 

साहित्य: चिकन ब्रेस्ट( एका वेळी साधारण 100 ग्रॅम  पुरेसे आहे ), आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, लिंबाचा रस, मीठ, काळी मिरी पूड, ऑलिव्ह ऑईल

ADVERTISEMENT

कृती: चिकन ब्रेस्ट स्वच्छ धुवून त्याला सुरीने चीरे द्या. त्याला सगळे मसाले लावून साधारण पाच  मिनिटं ठेवा. जाळीचा तवा किंवा शीगा असल्यास उत्तम त्यावर मॅरिनेटेड चिकन पीसेस शीगेला लावून ते आचेवर छान भाजून घ्या. तेलासाठी एक विशिष्ट ब्रश वापरुन त्याला ऑलिव्ह ऑईल लावा आणि तयार चिकनचे पीसेस छान सलादसोबत खा. रात्रीच्या जेवणात तुम्हाला असं चिकन खाता येईल. 

इडली-डोसा आणि सांबर

Instagram

साऊथ इंडियन पदार्थ हे नेहमीच सगळ्यांचा आवडीचे असतात. सकाळी इडली मेदू वडावाला दिसला की खायची इच्छा अगदी हमखास होते. जर तुम्ही असे पदार्थ नाश्त्याला खाणार असाल तर काहीच हरकत नाही.  तुम्ही इडली- डोसा आणि चटणी खाल्ल्यास फारच उत्तम. मेदुवडा थोडा तेलकट असल्यामुळे तुम्ही तो टाळल्यास उत्तम 

ADVERTISEMENT

 

आता डाएटचं टेन्शन घेऊ नका. जास्तीत जास्त पदार्थ घरी बनवून खा. तुम्हाला कोणताही त्रास न होता तुमचं वजन कमी करा. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

28 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT