Vastu Tips: सूर्यप्रकाश आहे वास्तूसाठी आवश्यक

Vastu Tips: सूर्यप्रकाश आहे वास्तूसाठी आवश्यक

सृष्टीचा आधार आहे सूर्य. सूर्याच्या उर्जैने पृथ्वीवर जीवन आहे. असं आपण लहानपणापासून विज्ञानात ऐकत आलो आहे. वास्तूशास्त्रांमध्येही वास्तूसाठी सूर्यप्रकाशाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. त्यामुळेच आपण घर घेतानाही नेहमी भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या वास्तू खरेदीला प्राधान्य देतो. या लेखात जाणून घेऊया वास्तूसाठी सूर्यप्रकाश किती महत्त्वाचा आहे.

वास्तू आणि सूर्यप्रकाश

वास्तूनुसार पूर्व दिशेचा स्वामी हा सूर्य ग्रह असतो. सूर्य धन-संपत्ती, ऐश्वर्य, आरोग्य आणि तेज देणारा ग्रह आहे. वास्तूची पूर्व दिशा जर आरोग्यदायी आणि दोषमुक्त असेल तर त्या घराचा स्वामी आणि त्यात राहणारे सदस्यही नेहमी महत्त्वकांक्षी,सत्त्वगुणयुक्त आणि उत्साही असतात.

सूर्य आहे मान-सन्मानाचं प्रतीक

सकाळच्या वेळी पूर्व दिशेने घरात येणारी सूर्याची किरणं ही अनंत गुणधर्मयुक्त असतात. याच कारणामुळे सूर्यकिरणांना वास्तूशास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे. सूर्यप्रकाश हा तुमच्या वास्तूत सकारत्मकता आणतो. वर सांगितलेल्या वास्तूत राहिल्याने घरातील सदस्यांना भरपूर मान-सन्मान मिळतो, याचं कारण आहे सूर्याची अपार शक्ती आणि प्रकाशाची देवता आहे. त्यामुळे प्रत्येक वास्तूसाठी सूर्यप्रकाश हा महत्त्वाचा आहे.

सूर्यानुसार करा वास्तूसाठी या गोष्टी

  • सूर्योदयाआधी पहाटे 3 ते सकाळी 6 पर्यंतचा काळ ब्रह्म मुहूर्ताचा असतो. या काळात सूर्य पृथ्वीच्या उत्तर-पूर्व भागात असतो. हा काळ चिंतन-मनन आणि अभ्यासासाठी उत्तम असतो. त्यामुळे तुम्हाला चिंतन करायचं असल्यास किंवा विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा असल्यास त्यांनी या वेळात करावा.
  • सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या पूर्व भागात असतो. त्यामुळे या काळात घरात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्यावी. यामुळे घरात नक्कीच प्रसन्न वातावरण राहील. 
  • सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या दक्षिण-पूर्व भागात असतो. हा काळ जेवण बनवण्यासाठी उत्तम असतो. 
  • स्वयंपाक आणि बाथरूम हे नेहमी ओलं असतं. त्यामुळे हे अशा ठिकाणी असायला हवं जिथे सूर्याचा प्रकाश पुरेश्या प्रमाणात असावा. ज्यामुळे ही ठिकाणं कोरडी आणि आरोग्यदायी राहतात. 
  • दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंतचा काळ हा आरामाचा असतो. सूर्य तेव्हा दक्षिणेला असतो. त्यामुळे आरामाची खोली नेहमी या दिशेला असावी. 
  • दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा काळ हा अभ्यास आणि कार्याचा काळ असतो. या काळात सूर्य दक्षिण-पश्चिम भागात असतो. त्यामुळे हा काळ तुम्ही अभ्यासात किंवा वाचनलयात घालवणं उत्तम असतं. 
  • संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतचा काळ हा जेवण, बसणे आणि वाचनासाठी असतो. त्यामुळे वास्तूनुसार घराचा पश्चिमी कोपरा हा जेवण आणि बैठकीसाठी शुभ असतो. 
  • संध्याकाळी 9 ते मध्यरात्रीच्या काळात सूर्य घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला असतो. या स्थानात बेडरूम, पाळीव प्राणी ठेवावं. तुम्हीही वास्तूशास्त्र मानत असाल तर या गोष्टी नक्की करून पाहा.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.