हिवाळ्याच्या दिवसात आवर्जून खा काळं गाजर

हिवाळ्याच्या दिवसात आवर्जून खा काळं गाजर

थंडीचा मोसम सुरू होताच बाजारात लाल लाल गाजरं दिसू लागतात. गाजरं बाजारात मुबलक प्रमाणात येताच गाजराचा हलवा, कोशिंबीर आणि अगदी ताजं लोणचं घालायचीही फर्माईश हमखास घरच्यांकडून होते. पण तुम्ही कधी काळ्या गाजराबाबत ऐकलं आहे का, कधी ते खाऊन पाहिलं आहे का? हो..गाजर काळ्या रंगाचंही असतं. थंडीच्या दिवसात नेहमीच्या गाजरांसोबतच काळं गाजरही आवर्जून खावं. कारण त्यात अनेक आरोग्यदायी गुण आहेत. काळ्या गाजरात (Black Carrot) अशी अनेक तत्त्वं आढळतात, ज्यामुळे शरीराला अनेक आजारांना दूर ठेवणं सहज शक्य होतं. काळ्या गाजरात असतात अनेक खनिजं तत्त्वं, जी शरीराला डिटॉक्स करतात.

Shutterstock

स्त्री वर्गासाठी खूपच गुणकारी

मुलींनी काळं गाजरं अवश्य खावं. कारण यातील गुणांमुळे तुमची त्वचा उजळते. तुम्ही काळ्या गाजराचाही हलवा करून खाऊ शकता. या गाजराचा तुमच्या त्वचेसाठी नक्कीच उपयोग होतो. तुम्ही याचा ज्यूस प्यायलासही गुणकारी ठरेल. चला जाणून घेऊया काळ्या गाजराचे काही फायदे.

  • डोळ्यांसाठी वरदान - काळं गाजरं हे नेहमीच्या लाल गाजरांप्रमाणेच डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे तुम्हाला चश्मा असल्यास त्याचा नंबर कमी होईल. तसंच डोळ्यांची पाहण्याची क्षमताही सुधारण्यास मदत होईल.
  • पोट होईल साफ - काळं गाजर पोटाशी निगडीत अनेक समस्याही दूर करतं. त्यामुळे जर तुम्हाला पोटाची समस्या असेल तर काळ्या गाजराचं सेवन करा. पोट निश्चितपणे साफ होईल. यासाठी तुम्ही रात्री झोपण्याआधी काळ्या गाजराचा ज्यूस प्या.
  • हृदय रोगावर काळं गाजर - काळ्या गाजराचं सेवन केल्याने हृदय रोगाच्या त्रासाला टाळता येऊ शकतं. हो जर तुम्हाला हृदयाची धडधड वाढल्यासारखी जाणवल्यास काळं गाजर भाजून खाल्लं तर तुम्हाला आराम मिळेल. याशिवाय काळ्या गाजराचं रोज सेवन केल्यास हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं.
  • ब्लड सर्क्युलेशन - जर तुमच्या रक्ताभिसरणाबाबत काही समस्या असतील तर तुम्ही काळ्या गाजराचं सेवन सुरू करावं. एवढचं नाहीतर काळ्या गाजराने रक्त शुद्धीही होते. यामुळे रक्तासंबंधींच्या सर्व समस्या दूर होतात.
  • कॉलेस्ट्रॉल - काळ्या गाजराचं सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची मात्राही कमी राहते. गाजराचा रस पिणं कधीही फायदेशीर असतंच. पण त्यातही रात्री जेवताना तुम्ही एक ग्लास गाजराचा ज्यूस प्यावा. यामुळे पचनासंबंधित समस्या जाणवत नाहीत.
  • रक्तशुद्धीकरण - आधीच वरं सांगितल्याप्रमाणे रक्तशुद्धीसाठी काळ्या गाजराचा फायदा होतो. कारण काळ्या गाजरामुळे रक्ताभिसरण सुरळीत होतं. जर तुम्ही रोज एक ग्लास गाजराच्या रसाचं सेवन केलं तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. टीप : तुम्हाला एखाद्या आजारावर काळ्या गाजराचा रस घ्यायचा असल्यास त्या आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.