#Mystory : परिस्थिती आमच्या हातातून निसटून गेली आणि...

#Mystory : परिस्थिती आमच्या हातातून निसटून गेली आणि...

कधी कधी काही गोष्टी आपल्या हातून निसटून जातात. तुम्ही त्या परिस्थितीत कितीही स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला तरी ती परिस्थिती हातातून निघूनच जाते. असेच काहीसे झाले होते. नेहा आणि निशांतमध्ये. प्रेमाला दोन महिने होत नाही तोच त्यांना एकमेकांबद्दल इतके आकर्षण होते की, त्यांच्याकडून नको ते होऊन बसते. ज्याची कल्पना त्यांनी देखील केलेली नसते. जाणून घेऊया त्यांच्या नेमकं काय झालं त्यांच्यासोबत आणि त्यांच्या या गोष्टीतून आपण नेमकं काय शिकायला हवं ते जाणून घेऊया.

भांडण झाल्यावर सेक्स करण्यात येते अधिक मजा, जाणून घ्या ट्रिक्स

shutterstock

नेहा आणि निशांत यांना यांच्या नात्याला नुकतीच एक वर्ष पूर्ण झाली. प्रेम नवं नवं असेल तर एकमेकांबद्दलचे आकर्षण फारच असते. नेहा आणि निशांतमध्येही अगदी तसेच होते. त्यांना एकमेकांशिवाय अगदीच करमत नव्हते. सतत एकमेकांसोबत त्यांना वेळ घालवावा असेच वाटत होते. सतत फिरायला जाणं. ऑफिसनंतर एकमेकांना भेटणं. तासनतास फोनवर बोलणं हे सगळं सुरळीत सुरु होतं. सकाळी ऑफिसनंतर त्यांना एकमेकांना भेटण्याची ओढ इतकी वाढली की, त्यांना त्या वेळाही नकोशा होत होत्या. शहरांसारख्या ठिकाणी कपल्सना एकांत असा मिळत नाही. मग अशावेळी त्यांना वेगवेगळे मार्ग निवडावे लागतात. आता इतर जोडप्यांप्रमाणे नेहा आणि निशांतला शरीराची भूक नव्हती. पण एकमेकांच्या मिठीत विसावण्याची जबरदस्त ओढ होती. त्यासाठी त्यांची धडपड सुरु झाली. निशांतने नेहाला घेऊन बाहेर जाण्याचा प्लॅन केला. या प्लॅनसाठी त्याने सगळी तयारी केली. 

नेहा आणि निशांत पहिल्यांदाच बाहेर जाण्याचा प्लॅन करत होते. घरी न सांगता जायचे होते. म्हणून त्यांनी डे आऊटचा प्लॅन केला. निशांतने छान रिसोर्ट बुक केलं. दिवसभर मस्त फिरायचं….पाण्यात डुंबायचं. छान लंच आणि डीनर डेट करुन उशीराने घरी परतायचं असं त्यांचं हे प्लॅनिंग..मग काय तो दिवस उजाडला. नेहा आणि निशांत बाहेर पडले. रिसोर्टला आल्यानंतर मस्त पाण्यात डुंबण्यासाठी त्यांनी रुममध्ये जाऊन कपडे बदलले आणि पाण्यात डुंबू लागले. पहिल्यांदाच ते एकमेकांच्या इतके जवळ होते. त्यांच्या शरीराचा एकमेकांना होणारा स्पर्श त्याची उब त्यांना एकमेकांकडे अधिक आकृष्ट करत होती. त्यांना आता त्यांच्या शरीराची तीच उब हवीहवीशी झाली होती. त्यांनी पाण्यातून बाहेर येत सरळ हॉटेल रुमवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा कंट्रोल जात होता. एकमेकांना किस करता करता त्यांनी एकमेकांचे कपडे कधी काढले हे त्यांना कळले नव्हते. निशांत आणि नेहा आता आकंठ प्रेमात बुडाले होते. त्यांना आपण काय करत आहोत ते कळत नव्हते. पण त्यांना ही गोष्ट थांबवाशीही वाटत नव्हती.पण या सगळ्यामध्ये असताना त्यांच्याकडून सेक्स कधी झालं हे त्यांनाच कळलं नाही.  कोणतीही काळजी न घेता त्यांच्याकडून ही चूक झाली होती. पुढे नेहाला सगळं काही आलबेल आहे की नाही ते तपासेपर्यंत त्या दोघांनी एकमेकांशी बोलणं सोडून दिलं. त्या दोघांच्या नात्यामध्ये नको तो तणाव आला होता. दोघांची चुकी असूनही ते एकमेकांना दोष देत होते. महिन्याशेवटी ज्यावेळी तिची खात्री पटली त्या दिवशी तिने निशांतला फोन करुन झालेल्या प्रकाराची माफी मागितली. पण तोपर्यंत त्यांच्या नात्यामध्ये अनेक उतार चढाव आले. अखेर त्यांचे नाते तुटले. जे सेक्स नात्याची दोर घट्ट करण्याचे काम करते. तीच दोर त्यांनी कोणतीही गोष्ट समजून न घेता तोडल्यामुळे एका चांगल्या नात्याचा असा शेवट झाला. नात्यात ज्यावेळी सेक्स येतं त्यावेळी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे असते. एकमेकांच्या संंमतीने आणि योग्य वेळी होणे गरजेचे असते. नाहीतर काही नाती उगाचच न समजता तुटून जातात. 

नेहा आणि निशांतच्या या अनुभवातून तुम्ही नव्या नात्यात लगेचच घाई करु नका हाच मोलाचा संदेश आहे.

या कारणांमुळे मुलींना नको असते लग्नाची जबाबदारी

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/