ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
महिलांसाठी उत्तम ठरणारं 36-24-36 हे शरीराचं परफेक्ट माप नक्की का आहे, जाणून घ्या

महिलांसाठी उत्तम ठरणारं 36-24-36 हे शरीराचं परफेक्ट माप नक्की का आहे, जाणून घ्या

आपल्याला पण नेहमी हा प्रश्न मनात येत असेल की अरे स्त्री च्या सौंदर्याचं 36-24-36 हे माप नक्की कोणी ठरवलं? नेहमी याच आकारात राहण्याचा अट्टाहास का? तर आज आम्ही तुम्हाला याचसंदर्भात माहिती देणार आहोत. खरं तर हे माप पुरूषांनीच ठरवलं असण्याची शक्यता आहे. कारण पूर्वी स्त्री ही वस्तूप्रमाणेच पाहिली जायची. त्यामुळे त्याचं एक ‘माप’ ठरवण्यात आल्याचं काही अभ्यासात म्हटलं गेलं आहे. असा तर्क खरा तर लढवण्यात आला पण खरं सांगायचं तर साधारण अठराव्या शतकामध्ये फॅशनला सुरुवात झाली. युरोपियन देशांमध्ये बिकीनी सारख्या वस्त्रांची सुरुवात झाली आणि ही बिकिनी कमनीय बांध्यावर अधिक चांगली दिसते हे लक्षात आल्यानंतर 36-24-36 या मापाचा उपयोग व्हायला लागला. तिथूनच त्याचा शोध लागला. त्यामुळेच त्याआधीची चित्र जर आपण पाहिली तर त्यातील महिला या अशा स्वरूपाच्या मापाच्या नाहीत. पूर्वी जास्तीत जास्त मोठे स्तन असलेली महिला सुंदर समजण्यात येत होती. पण कालानुसार यात बदल होत गेला. खरं तर काळानुसार हे माप अस्तित्वात आलं. 

36-24-36 हे नक्की काय माप आहे?

Shutterstock

महिलांच्या शरीराचं हे योग्य माप असल्याचं समजण्यात येतं. आपलं शरीर या मापात ठेवण्यासाठीच बऱ्याच महिला अगदी डाएट आणि जिमचा वापर करत असतात. ही सर्व मापं इंचामध्ये आहेत. नक्की हे माप कशाचं असा महिलांना अथवा इतर पुरूषांनाही प्रश्न पडतो. तर 36 हा पहिला आकडा स्त्री च्या स्तनांचा अर्थात छातीचा आहे, त्यानंतर 24 हा आकडा स्त्री च्या कमनीय बांध्याचा अर्थात कंबरेचा आहे आणि त्यानंतरचा सर्वात शेवटचा 36 हा आकडा नितंबाचा आहे. आजही हेच माप योग्य समजण्यात येतं. मध्यंतरी करिना कपूरमुळे 0 फिगर असाही बांधा अस्तित्वात आला होता. पण अशा बांध्याने नक्कीच पुरूष आकर्षिक होत नाही असाही समज बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. मात्र गेल्या काही वर्षात 36-24-36 हा आकडा काहीसा दुर्लक्षित झाला असून 0 फिगरवरच बऱ्याच जणींनी लक्ष केंद्रित केलं असल्याचंही दिसून येत आहे. पण आपण जसे आहोत त्या बांध्यापेक्षा आरोग्याकडे योग्य तऱ्हेने लक्ष द्यायला हवं हे फारच कमी जणींना कळतं. जाडी कमी करायची आहे आपल्याला बारीक दिसायचं आहे या नादात कोणत्याही प्रकारचं डाएट फॉलो करून नको त्या गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या मुलींची संख्याही वाढत चाललेली दिसून येत आहे. 

ADVERTISEMENT

मलायकासारखी फिगर हवीय, पाहा तिच्या फिटनेसचं रहस्य सांगणारा VIDEO

फॅशनच्या दुनियेतील फिगरची गणितं

Shutterstock

फॅशनच्या दुनियेत साधारण चार प्रकारचं महिलांच्या शरीराचं माप असतं. कसं ते पाहूया – 

ADVERTISEMENT

स्पून – या मापामध्ये छातीचं माप हे नितंबाच्या मापापेक्षा कमी असतं. तसंच शरीरावर चरबीचं प्रमाण हे इतर आकारांपेक्षा अधिक असल्याचं दिसून येतं. 

एक्स बॉडी – या मापामध्ये छाती आणि नितंबाचं माप हे कमरेपेक्षा अधिक असतं. त्यामुळे शरीराचा आकार हा दिसताना वाळूच्या घड्याळासारखा दिसतो. साधरणतः फॅशनच्या दुनियेत बऱ्याच मॉडेलच्या शरीराचं माप हे अशा प्रकारचं आपल्याला दिसून येतं.

रेक्टँग्युलर – या आकारात नितंब आणि छातीपेक्षा कंबर ही साधारण 9 इंचाने कमी असते. शरीरावरील चरबी ही समान पसरलेली दिसून येते. त्यामुळे महिलेचं शरीर हे एखाद्या पट्टीसारखं दिसून येतं. 

इन्व्हर्टेड ट्रँगल – या मापामध्ये महिलेचे खांदे हे रूंद असतात तर कंबर कमी असते. त्याशिवाय छातीचा आकारही मोठा असतो आणि शरीराचा आकार हा उलट्या त्रिकोणाप्रमाणे भासतो. तर मांड्या आणि पायांचा आकारही कमी असतो. 

ADVERTISEMENT

परफेक्ट फिगरसाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील बदल

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

15 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT