2019 हे वर्ष छोट्या पडद्यावरच्या हिंदी कलाकारांसाठी आठवणीतले होतं. अनेक रिएलिटी शोज, डेली सोप्स आणि कॉमेडी सीरियल्सच्या लोकप्रियतेनुसार अभिनेते आणि अभिनेत्रींच्या लोकप्रियतेतही चढ-उतार पाहायला मिळाले. 2019 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, व्हायरल न्यूज आणि न्यूजप्रिंटवर लोकप्रियतेत असलेल्या 10 हिंदी टेलीव्हिजन कलाकारांची यादी स्कोर ट्रेंड्स इंडियाने काढली आहे.
या रेटिंगनुसार टेलीव्हिजन मालिका ‘कसौटी जिन्दगी की 2’ चा अभिनेता पार्थ समथान आणि अभिनेत्री हिना खानने 2019 च्या स्कोर ट्रेंड्सच्या वर्षाखेरीच्या यादीत 100 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. याच मालिकेत ‘पार्थ’, ‘अनुराग बासू’च्या भूमिकेत आणि हिना ‘कोमोलिका’च्या भूमिकेत दिसली होती. या दोघांच्या लोकप्रियतेनुसार, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर सर्वच्या सर्व गुण मिळवून हे दोघेही पूर्ण वर्षाच्या लोकप्रियतेच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहेत. न्यूजप्रिंट आणि व्हायरल न्यूजमध्येही बाकी टेलीव्हिजन सेलिब्रिटीजना या दोघांनी मागे टाकलं आहे.
टेलीव्हिजन स्टार दिव्यांका त्रिपाठीची मालिका ‘ये है मोहब्बतें’मुळे ती 32.7 स्कोर्ससह लोकप्रियतेत दूस-या क्रमांकावर आहे. तर मिस्टर बजाजची लोकप्रिय भूमिका साकारलेला अभिनेता करण सिंह ग्रोव्हर 92.5 गुणांसह दूस-या स्थानावर आहे, असं म्हटलं जातंय की, ‘कसौटी जिन्दगी की 2’मधून करण बाहेर पडल्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत खूप फरक पडला. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.
करणच्या एक्झिटनंतर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील कार्तिक म्हणजेच अभिनेता मोहसिन खान 72 गुणांसह तिस-या स्थानावर आहे. ‘ये है मोहब्बतें’चा रमन भल्ला म्हणजेच अभिनेता करण पटेल 52.4 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये प्रेरणा शर्माच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री एरिका फर्नांडीस 31 गुणांसह तिस-या आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ची नायरा म्हणजेच अभिनेत्री शिवांगी जोशी 22.8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. ‘इश्कबाज’चा शिवाय सिंग ओबेरॉय म्हणजेच अभिनेता नकुल मेहता 43.44 गुणांसह आणि ‘नागिन-3’ची सुरभि ज्योति 19.8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. सहाव्या स्थानावर ‘इश्क में मरजावां’चा राजदीप सिंह म्हणजेच अभिनेता अर्जुन बिजलानी तर सातव्या स्थानावर ‘बेपनाह प्यार’ चा रघुबीर मल्होत्रा म्हणजेच पर्ल वी पुरी आहे. तर, ‘ये है मोहब्बते’चा आदी म्हणजेच अभिषेक वर्मा 8 व्या स्थानावर आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ चा मोहित मलिक नवव्या स्थानावर आहे. तर ‘भाभीजी घर पे हैं’ चा अभिनेता आसिफ शेख दहाव्या स्थानावर आहे.
टेलीव्हिजन अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये, ‘नागिन 3’, ‘ये है मोहब्बतें’, ‘नच बलिए 9’ आणि ‘किचन चँपियन’मुळे अनिता हसनंदानी चार्टवर सहाव्या स्थानावर आहे. त्यानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिशा वाखानी सातव्या स्थानावर आहे. ‘कहा हम कहा तुम’ फेम दिपिका कक्कड नवव्या स्थानावर आहे. तर ‘नच बलिए 9’मुळे श्रद्धा आर्या रँकिंगमध्ये 10 व्या स्थानावर पोहोचलीय.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल याबाबत सांगतात की, “आम्ही मीडिया विश्लेषणासाठी 14 भाषांमध्ये 600 पेक्षा जास्त बातम्यांमधून डेटा संग्रहित करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, प्रिंट प्रकाशन, सोशल मीडिया, व्हायरल न्यूज, प्रकाशने आणि डिजिटल प्लेटफॉर्म समाविष्ट आहेत. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगज्स ठरवतो”
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.