सौंदर्यासोबत संवेदनशीलताही जपण्याचा स्तुत्य उपक्रम

सौंदर्यासोबत संवेदनशीलताही जपण्याचा स्तुत्य उपक्रम

बाजारात अनेक सौंदर्य उत्पादने तयार करण्याऱ्या कंपनी आहेत. मात्र यामध्ये  एक कंपनी अशीही आहे जी सौंदर्यासोबतच संवेदनशीलता जपण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतंच ‘जॉय’ या ब्रॅंडची स्कीन केअर उत्पादने तयार करणाऱ्या आरएसएच कंपनीने सेन्सेटिव्ह सौंदर्य उत्पादनांची नवीन श्रेणी सुरू केली आहे.  विशेष म्हणजे ही उत्पादने अॅसिड हल्लातून वाचलेल्या तरूणींसाठी असणार आहेत. या तरूणींची त्वचा या हल्ल्यामुळे नाजूक आणि संवेदनशील झालेली असते. म्हणून ही खास अशा अतीसंवेदनशील त्वचेसाठी निर्माण करण्यात येणार आहेत. दीपिका पादुकोणचा या संवेदनशील विषयाला हाताळणारा छपाक हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबरोबरच या कंपनीने सुरु केलेली सेन्सेटिव्ह श्रेणीतील सौंदर्योत्पादने यामुळे अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलांना जगण्याचं नवं बळं नक्कीच मिळेल. 

कशी असतील जॉय सेन्सेटिव्ह उत्पादने

जॉय सेन्सेटिव्ह श्रेणीत फेसवॉश, मॉश्चराईझर क्रीम, सनस्क्रीन अशा अनेक स्कीन केअर प्रोडक्ट्सचा समावेश असणार आहे. अॅसिड हल्ल्यातून वाचल्यावर या तरूणींची त्वचा अती संवेदनशील झालेली असते. ज्यामुळे या त्वचेची नियमित स्वच्छता आणि काळजी घ्यावी लागते. याचा नीट विचार करून ही सर्व उत्पादने तयार करण्यात  आलेली आहेत. यात कोरफड, कॅमोमाईलचा अर्क अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे त्वचेला या उत्पादनांमुळे कोणतेही साईड इफेक्ट सहन करावे लागत नाहीत. शिवाय नैसर्गिक घटकांमुळे त्वचेचं पोषण होतं. शिवाय कोरफडामध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेचा दाह कमी होतो. कॅमोमाईल एक नैसर्गिक जंतूनाशक आहे. ज्यामुळे त्वचा निर्जंतूक राहण्यास मदत होते.  या उत्पादनांमुळे त्वचेवरील पोत चांगला राहण्यास मदत होते आणि आतून त्वचेला पुर्नजीवन मिळू लागतं. शिवाय ही उत्पादने हायपोअॅलर्जेनिक, नॉन कॉमेडोजेनिक, केमिकल विरहित, सल्फेट फ्री असून त्यांच्यावर सर्व प्रकारच्या त्वचेसाठी विविध चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. 

Instagram

या उत्पादनांच्या निर्मितीचा उद्देश

जॉय सेन्सेटिव्ह या ब्रॅंडने नुकतंच स्कीन ऑफ करेज या मोहिमेचं उद्धाटन केलं आहे. ज्यामध्ये अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांसाठी रोजगार मोहीम आखण्यात येत आहे. छपाक या दीपिका पादूकोनच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीदेखील या ब्रॅंडने काही उपक्रमदेखील हाती घेतले आहेत. या कंपनीच्या अध्यक्ष सुनील अग्रवाल यांच्या मते, " जगभराच्या तुलनेत भारतात अॅसिड हल्ल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या हल्ल्यातून वाचलेल्या महिलांच्या अतीसंवेदनशील त्वचेसाठी बाजारात जास्त प्रमाणात सौंदर्योत्पादने आहेत. शिवाय ती दुर्मिळ आणि महाग आहेत.  म्हणूनच जॉय सेन्सेटिव्ह या ब्रॅंडची उत्पादने आम्ही तयार केली आहेत. जी स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडण्यासारखी असणार आहेत. चांगल्या गुणवत्तेच्या या उत्पादनांच्या निर्मितीबद्दल आम्ही समाधानी आहोत." ‘जॉय सेन्सिटिव्ह’ व ‘छपाक’ या दोन्हींतर्फे 200 हून अधिक अ‍ॅसिड पिडितांसाठी या चित्रपटाचा खास खेळ आयोजित करीत आहोत. ‘स्किन ऑफ करेज’ मोहीमेचा एक भाग म्हणून एका स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने अ‍ॅसिड हल्ल्यापासून वाचलेल्यांसाठी देशव्यापी रोजगार अभियान देखील राबवण्यात येणार आहे.  

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -  

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

छपाकच्या सेटवर दीपिकाच्या भावनांचा का फुटला बांध

भारतातील सर्वोत्तम पॅराबेन फ्री (Paraben Free) आणि सल्फेट फ्री (Sulphate Free) उत्पादने

निरोगी त्वचेसाठी ब्युटी टिप्स