धुरळा ! छोट्या लता दीदीनं गायलं अरिजितचं सुपरहिट गाणं

धुरळा ! छोट्या लता दीदीनं गायलं अरिजितचं सुपरहिट गाणं

आपल्या गोड आवजानं सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी छोटी लता दीदी म्हणजे प्रज्ञा मेधाचा नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता तिनं बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंगचं 2019 मधीर सुपरहिट गाणं ‘दिल का दरिया’ गायलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रज्ञा आपल्या आईसोबत गाताना दिसत आहे. छोट्या लता दीदीच्या या नव्या व्हिडीओनं नेटकऱ्यांना वेड लावलं आहे. शाहिद कपूरचा सिनेमा ‘कबीर सिंह’ मधील ‘दिल का दरिया’ गाण्याला सिनेरसिकांकडून प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला होता. हेच गाणं प्रज्ञा मेधानं गाऊन सोशल मीडियावर पुन्हा धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. प्रज्ञाच्या नव्या व्हिडीओमध्ये तिची आई गाण्याची सुरुवात करते, तिच्या पाठोपाठ प्रज्ञाही गोड आवाजात गाणं गाऊ लागते. जेव्हा तिची आई गाण्याची एक ओळ विसरते, तेव्हा प्रज्ञा तिला दुरुस्त देखील करते, हे देखील आपल्याला व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय.

(वाचा :‘अर्जुन रेड्डी’सोबत काम करण्यास करण जोहर उत्सुक, दिली मोठी ऑफर)

काही दिवसांपूर्वी याच चिमुकलीनं लता दीदींचं गाणं गायलं होतं. तिच्या या व्हिडीओवर लाईक आणि शेअरिंगचा पाऊस पडला होता. या गोंडस तान्हुलीनं लता मंगेशकर यांचं एव्हरग्रीन गाणं ‘लग जा गले’ सुरात गायलं होतं. 1964मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वो कौन थी’ सिनेमातील हे गाणं आहे. अभिनेत्री साधना यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं.

(वाचा : कमालच! 2 वर्षांची चिमुकली गातेय लतादीदींचं गाणं, सोशल मीडियावर धुमाकूळ)

View this post on Instagram

Ganapati Bappa Maurya 🙏🙏🙏🤗🤗🤗

A post shared by Pragya Medha (@pragyamedha11) on

सोशल मीडियामुळे कोणाला कधी, केव्हा, कशी आणि किती प्रसिद्धी मिळेल...याचा काहीच नेम नाही. हल्ली सोशल मीडियावर कित्येक व्हिडीओ झपाट्यानं व्हायरल होत आहेत. केवळ व्हायरलच नाही तर त्यांना प्रचंड हिट्सदेखील मिळतात. याचं सर्वात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे राणू मंडल. पश्चिम बंगालच्या रेल्वे स्टेशनवर गाणं गाव गाऊन पोटाची खळगी भरणाऱ्या राणू मंडल (Ranu Mandal) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच त्यांचं नशीबच बदललं. राणू मंडल यांनी गानकोकिळ लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची गाणी गाऊन लाखो लोकांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित केलं. सोशल मीडियावर झळकलेल्या राणू यांनी गायक/संगीतकार हिमेश रेशमियानं मोठी संधी दिली. देशाच्या कानाकोपऱ्यात आज राणू मंडल यांचं नाव पोहोचलं आहे.

राणू मंडल अशा झाल्या स्टार

(वाचा : शरीर साथ देत नाही, आता निवृत्त झालं पाहिजे… बिग बींचा भावनिक ब्लॉग)

View this post on Instagram

Ganapati Bappa Maurya 🙏🙏🙏🤗🤗🤗

A post shared by Pragya Medha (@pragyamedha11) on

हे देखील वाचा :

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.