एक्स बॉयफ्रेंड स्वप्नात आला तर ‘या’ गोष्टीचा इशारा समजा

एक्स बॉयफ्रेंड स्वप्नात आला तर ‘या’ गोष्टीचा इशारा समजा

प्रत्येकाच्या आयुष्यात एक्स ही संकल्पना बहुतांशी अस्तित्वात असते. एक वेळ अशी असते की या व्यक्तीबरोबर आपल्याला आपलं पूर्ण आयुष्य घालवायचं असतं. आयुष्यात आपल्याला अशी काही माणसं भेटतात जे आपल्याला आवडतात आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवणंही आपल्याला आवडत असतं. पण काही कारणांमुळे आपलं हे नातं शेवटपर्यंत पोहचू शकत नाही. एकमेकांपासून दूर जावं लागतं.आयुष्यात आपल्या आवडत्या माणसापासू दूर जाणं हे कोणालाही सहन करण्यासारखं नसतं. पण या त्रासातून पूर्णतः वर येण्याचा प्रयत्न प्रत्येक जण नक्कीच करत असतो. आपणही आपल्या भूतकाळातील अगदी पहिल्या बॉयफ्रेंडला विसरून पुढचं आयुष्य पुढे  सुरू करतो. पण कधी अचानक होतं का की, तुमच्या स्वप्नात अचानक तुमचा एक्स बॉयफ्रेंड येतो? असं झालं असेल तर त्याची अनेक कारणं असतात. काही मुलींबरोबर असं होतं. आपल्या सध्याच्या जोडीदाराबरोबर आनंदी असतानाही त्यांना स्वप्नात आपला एक्स बॉयफ्रेंड दिसतो. त्यामुळे त्यांच्या मनातही अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण त्याचं नेमकं कारण काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो. त्याची खालीलपैकी कोणतीही कारणं असण्याची शक्यता आहे. 

त्रासदायक ब्रेकअप

Shutterstock

प्रत्येक ब्रेकअप हे नक्कीच त्रासदायक असतं. पण काही ब्रेकअप हे दोघांच्या मर्जीने आणि मैत्रीपूर्वकही घेतले जातात.  पण काही ब्रेकअपच्या बाबतीत परिस्थिती अगदीच वाईट असते. तुमच्या जोडीदाराने तुमचा विश्वासघात केला असेल आणि तुमच्या मनाला अगदी खोलवर ही गोष्ट खटकली असेल. तर बऱ्याचदा तुम्हाला झोपेत एक्स बॉयफ्रेंड दिसू शकतो. ही अत्यंत कॉमन गोष्ट आहे.  त्यावर अधिक विचार करण्याची अजिबातच आवश्यकता नाही. त्याने त्रास करून घ्यायचीही गरज नाही. 

Love Tips: मुलीचा परफेक्ट ‘बॉयफ्रेंड’ बनायचं असेल, तर काय करायला हवं

काही गोष्टी अर्धवट राहिल्यास

Shutterstock

नात्यामध्ये  बऱ्याचदा आपण आपल्या जोडीदाराबरोबर कम्फर्टेबल असतो. ती कम्फर्ट लेव्हल बऱ्याचदा इतरांबरोबर कधीही येत नाही. ब्रेकअपनंतर आपल्या गोष्टी शेअर करण्यासाठी ती व्यक्तीच नसते. त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशी गोष्टी अर्धवट वाटू लागतात. तसं तर तुमच्याजवळ तुमचा नवा जोडीदारही असतो.  पण तरीही तुम्हाला काहीतरी मनाला चुटपूट लागून राहतेच. तुम्हाला तुमच्या एक्सची आठवण येत राहाते आणि त्यातूनच एक्स स्वप्नात दिसणंही सुरू होतं. ही गोष्टदेखील शक्य आहे. त्यामध्ये विचार करण्यासाठी कोणतीही गोष्ट नाही. ही अत्यंत कॉमन गोष्ट आहे. 

एकांतात घालवलेले काही सुखद क्षण

Shutterstock

ब्रेकअपचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमच्या एक्स बॉयफ्रेंडबरोबर जे काही सुखद क्षण घालवलेले आहेत ते तुम्ही विसरून जाल. हे क्षण प्रत्येकाच्या हृदयात कायमस्वरूपी राहतात. त्यामुळे एखाद्या दुःखाच्या क्षणी तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडबरोबर घालवलेले हे सुखद क्षण स्वप्नात दिसातात. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हटलं जातं ते इथे परफेक्ट लागू पडतं. 

तुमचा बेस्टफ्रेंडच होऊ शकतो तुमचा बॉयफ्रेंड...कसं ओळखायचं?

सध्याचा आणि एक्स बॉयफ्रेंड असणारी समानता

Shutterstock

तशी तर प्रत्येक व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. पण काही सवयी एकसारख्या असू शकतात. सवयींशिवाय राहणीमान, ड्रेसिंग, हेअरस्टाईल यासारख्या गोष्टीही समान असू शकतात. तुमच्या सध्याच्या बॉयफ्रेंड आणि एक्स बॉयफ्रेंडमध्ये काही सवयी समान असतील तर तुम्हाला बऱ्याचदा एक्सची आठवण नक्कीच येते. पण तुम्ही कोणालाही त्याबद्दल सांगू शकत नाही. अशावेळी तुम्हाला तुमचा एक्स बॉयफ्रेंड स्वप्नात दिसण्याची शक्यता असते. 

तुमचा बॉयफ्रेंड तुमची फसवणूक तर करत नाही ना?

कोणतीही जुनी आठवण आल्यास

Shutterstock

तुम्ही तुचम्या एक्सबरोबर घालवलेला वेळ, त्याची सोबत हे सर्व एखाद्या निवांत वेळी अचानक आठवणी जागृत होऊन आठवता. त्यावेळी त्याचा विचार तुमच्या मनात येतो.  एखाद्या ठिकाणी तुम्ही जर नेहमी जात असाल आणि तुम्ही अचानक त्या ठिकाणी गेल्यास तुम्हाला तुमच्या एक्सची आठवण येते. दिवसभर तुमच्या डोक्यात त्याच आठवणी रूंजी घालतात आणि मग रात्री झोपल्यानंतर तुम्हाला स्वप्नातही एक्स बॉयफ्रेंड दिसणं हे साहजिक आहे. 

एक्स बॉयफ्रेंडचं स्वप्नं येणं यामध्ये कोणतीही चुकीची अथवा वाईट गोष्ट नाही. ही मानसिकता आहे. हे कोणाच्याही बाबतीत सहज घडू शकतं. त्यामुळे या गोष्टी तुमच्यासह घडल्या तर त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका अथवा चुकीचं समजू नका. तुम्ही नॉर्मल असण्याचा हा इशारा आहे असं समजा. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.