करण - अर्जुन झाले 25 वर्षांचे, आमिर खान होता सर्वात पहिली पसंती

करण - अर्जुन झाले 25 वर्षांचे, आमिर खान होता सर्वात पहिली पसंती

बॉलीवूडमधील काही चित्रपट हे असे  आहेत जे तुम्ही कधीही बघू शकता. त्यांची लोकप्रियता इतकी आहे की, तिथपर्यंत इतर चित्रपट पोहचूही शकत नाहीत. त्यापैकीच शाहरूख आणि सलमानचा ‘करण - अर्जुन’ हा चित्रपट. 13 जानेवारी 1995 रोजी निर्माता आणि दिग्दर्शक राकेश रोशनचा हा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. पहिल्यांदाच शाहरूख आणि सलमान ही जोडी मोठ्या पडद्यावर दिसली होती आणि प्रेक्षकांनी या जोडीला भरभरून प्रतिसाद दिला होता. आजही या चित्रपटाचा सिक्वेल यावा असं त्याच्या चाहत्यांना वाटतं आहे. या चित्रपटात राखी, अमरीश पुरी, काजोल, ममता कुलकर्णी या सर्वांच्या व्यक्तिरेखा इतक्या चपखल होत्या की, त्याठिकाणी इतर कोणत्याही कलाकाराची कल्पना करणं शक्य नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटासाठी राकेश रोशन यांची सर्वात पहिली पसंती आमिर खान होता. आता 25 वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने आपण या चित्रपटाच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया. 

आमिर खान होता राकेश रोशन यांची पहिली पसंती

जेव्हा या चित्रपटाच्या कास्टिंगला सुरुवात झाली होती, तेव्हा दिग्दर्शक राकेश रोशन यांनी आपलं मत सर्वांसमोर मांडलं होतं. या चित्रपटात सलमान खान आणि आमिर खान अशी जोडी असावी असं राकेश रोशन यांना वाटत होतं. जेव्हा ही भूमिका घेऊन आमिर खानकडे ते गेले तेव्हा आमिर खानने ही भूमिका वाचून आपण यामध्ये स्वतःला फिट समजत नाही असं सांगून नाकारली होती. 

शिकारीफेम नेहा खानच्या दिलखेचक अदा

सलमानच्या जागी अजय देवगण करण्यात आला होता फायनल

त्यानंतर राकेश रोशन यांनी करणची भूमिका अजय देवगणला ऑफर केली होती. अर्जुनची भूमिका ही त्यानंतर शाहरूखसाठी फायनल करण्यात आली. ‘दिलवाले’, ‘विजयपथ’, ‘सुहाग’ असे त्यावेळी अजयचे अनेक अॅक्शनपट सुपरहिट झाले होते. त्यामुळे अजय देवगण आणि शाहरूख खान यांची करण - अर्जुन जोडी दिसावी असं राकेश रोशन यांना वाटत होतं. पण अजय देवगण आणि शाहरूख खान हे दोनही कलाकार आतापर्यंत कधीही एकत्र दिसलेले नाहीत. त्यांच्यामध्ये अजिबातच मैत्री नसल्याने शाहरूखची भूमिका फायनल झाल्यावर अजयने या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला. तसंच यावरून राकेश रोशन यांच्याशीही अजय देवगणचा वाद झाल्याचे त्यावेळचे काही मीडिया रिपोर्ट्स सांगतात. 

एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग... ‘शहीद भाई कोतवाल'चा ट्रेलर लाँच

1995 मध्ये सर्वात जास्त गल्ला कमावणारा दुसरा चित्रपट

करण अर्जुनमधील जबरदस्त संवाद, कलाकार हे सगळेच योग जुळून आले होते. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धमाल केली होती. शाहरूख आणि काजोलचा याच वर्षी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट धुमाकूळ घालत होता. तर हीच जोडी करण - अर्जुनमध्येही होती. त्यामुळे हा 1995 मध्ये सर्वात जास्त गल्ला कमावणारा दुसरा चित्रपट ठरला होता. 

रेशम टिपणीस झळकणार या चित्रपटामध्ये

राखी आणि अमरीश पुरीचे संवाद गाजले

या चित्रपटातील संवाद ही या चित्रपटाची अजून एक भक्कम बाजू होती. त्यावेळी राखी आणि अमरीश पुरी यांची जुगलबंदी या चित्रपटाचा स्तर अजूनच वर घेऊन गेली. त्यांचा प्रत्येक संवाद गाजला. आजही 25 वर्षांनंतर ‘मेरे करन - अर्जुन आयेंगे’ हा संवाद प्रत्येकाच्या ओठी जसाच्या तसा येतो. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.