सावधान! तणावामुळे तुमच्या 'या' शारीरिक प्रक्रियेवर होतोय गंभीर परिणाम

सावधान! तणावामुळे तुमच्या 'या' शारीरिक प्रक्रियेवर होतोय गंभीर परिणाम

ज्या लोकांना नेहमी अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो, त्यांना चांगलंच माहिती असेल की हा आजार किती असह्य असतो. जेवणानंतर झोपणे, वजन वाढणे, धूम्रपान करणे, निमयित मद्यसेवन करणे, चहा-कॉफीसारखे कॅफिनयुक्त पेय प्यायल्यानं अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पण पौष्टिक अन्नपदार्थांचं  सेवन केल्यानंतरही तुम्हाला अ‍ॅसिडिटी होत असेल तर तणाव हे त्यामागील मुख्य कारण असू शकते. तणावामुळे तुमच्या पचनप्रक्रियेवर गंभीर परिणाम होतो. छाती आणि पोटात जळजळ होणे ही अ‍ॅसिडिटीची लक्षणे आहेत. स्पर्धात्मक करिअर, बदलती जीवनशैली यामुळे हल्ली प्रत्येकाचंच आयुष्य तणावग्रस्त होत चाललं आहे. ज्या दिवशी तुम्ही जास्त तणावाखाली असता, त्या दिवशी तुम्हाला पचनाच्या अधिक समस्या होण्याची शक्यता आहे. तणावामुळे आपल्या पचन प्रक्रियेवर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया.

(वाचा : हृदयरोग ते त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय, रोज खा हिरवे मटार)

जेव्हा तुम्ही शारीरिक किंवा मानसिक स्वरुपात अधिक तणावात असता, तेव्हा आपली  शारीरिक ऊर्जा या त्रासाविरोधात प्रतिकार करण्यास खर्च होते. या प्रक्रियेत मज्जातंतू प्रणाली एड्रेनल ग्रंथींना एड्रेनलिन आणि कॉर्टिसोल हार्मोन्सची निर्मिती करण्यासाठी सूचना देतात.  या हार्मोन्समुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो, पचनप्रक्रियेवरही परिणाम होतो. ब्लड प्रेशरमधील ग्लुकोजची पातळी जलद गतीनं वाढते. ताणतणावामुळे आतड्यांची काम करण्याची प्रक्रिया देखील मंदावते. 

अपचनामुळे होऊ शकतात या समस्या :

जर तुम्हाला वारंवार अपचनाचा त्रास होत असेल तर याकडे वेळीच लक्ष द्या. कारण दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर परिणामांना सामोर जावे लागू शकते.

(वाचा : पाठ दुखीतून सुटका मिळवण्यासाठी करा ही दहा योगासने Yoga For Back Pain In Marathi)

1. उलट्यांचा त्रास  

कित्येकदा ताणतणावामुळे पोट दुखी होते, मळमळ होणे, तीव्र डोके दुखी  इत्यादी त्रास उद्भवतात. अधिक तणावामुळे बहुतांश वेळा उलट्यांचा त्रास देखील सुरू होतो. 

2. रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम

तणावामुळे आपल्या शारीरिक ऊर्जेवर वाईट परिणाम होतो. कारण तणावाविरोधात प्रतिकार करण्यासाठी आपली ऊर्जा खर्च होते. अशातच शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत होते. यामुळे पचन प्रक्रियेवर थेट परिणाम होतो. 

3. तणाव कमी करण्याचे उपाय 

योगासनांचा नियमित अभ्यास केल्यास शारीरिक आणि मानसिक दोन्ही फायदे आपल्याला मिळतात. पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी  उत्तानासन करावे. उत्तासनामुळे शारीरिक-मानसिक तणाव कमी होतो. चक्कर येणे आणि थकवा सारख्याही समस्या दूर होतात. उत्तानासनाचा नियमित अभ्यास केल्यास पाठ दुखी आणि कंबर दुखीच्या समस्येतूनही मुक्तता मिळते.  या आसनामुळे डोक्यातील रक्त प्रवाहामध्ये सुधारणा होते. 

(वाचा : सायटिका आजाराकडे करताय दुर्लक्ष; कंबर, पायांवर होतील दुष्परिणाम)

हे देखील वाचा 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.