चुकूनही करू नका 'फिश पेडिक्युअर' होऊ शकतो इनफेक्शनचा धोका

चुकूनही करू नका 'फिश पेडिक्युअर' होऊ शकतो इनफेक्शनचा धोका

प्रत्येकीला आपले पाय सुंदर  आणि आकर्षक दिसावेत असं वाटत असतं. पायांची स्वच्छता राखण्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी नियमित मेडिक्युअर करण्याचा सल्ला दिला जातो. पार्लरमध्ये यासाठी निरनिराळ्या पद्धतीचे पेडिक्युअर उपलब्ध असतात. कधी तळव्यांना स्वच्छ करण्यासाठी फिश पेडिक्युअर करण्याचा सल्ला दिला जातो. पाण्यात पाय बुडवल्यामुळे पायामधील धुळ, माती, प्रदूषण, डेड स्कीन वर येते. फिश पेडिक्युअर करताना  टबमधील मासे तुमच्या पायावरील डेडस्कीन खातात आणि स्वच्छ करतात. माशांच्या स्पर्शामुळे पायांना अलगद मसाजही होतो. वास्तविक ही एक प्रकारची थेरपी आहे. ज्यामुळे तुमचे पाय सुंदर आणि स्वच्छ होतात. शिवाय पेडिक्युअरचा हा प्रकार आकर्षित करणारा असल्यामुळे अनेक लोक या पेडिक्युअरकडे सहज आकर्षित होतात.

Shutterstock

फिश पेडिक्युअरमुळे नेमका काय फायदा होऊ शकतो -

फिश पेडिक्युअर ही एक पाय नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करणारी थेरपी आहे. यात तुमच्या पायाच्या त्वचेवरील डेड स्कीन मासे खाऊन टाकतात. ज्यामुळे तुमच्या पायाची त्वचा मऊ आणि मुलायम होते. शिवाय यामुळे पायांची दुखणी, वेदनाही कमी होऊ शकतात. फिश पेडिक्युअर फार खर्चिक नसल्यामुळे ते तुमच्या खिषाला परवडण्यासारखे असते. फिश पेडिक्युअर केल्यामुळे पायाच्या तळव्यांवरील त्वचा स्वच्छ होते ज्यामुळे तळव्याचे रक्ताभिसरण  सुधारते. मात्र जसे याचे चांगले फायदे आहेत तसेच अनेक दुष्परिणाम देखील आहेत. 

Shutterstock

फिश पेडिक्युअरमुळे होऊ शकतो इनफेक्शनचा धोका -

बऱ्याचदा फिश पेडिक्युअर एखाद्या मॉल अथवा पार्लरमध्ये करण्यात येते. या ठिकाणी एक मोठा टॅंक निर्माण  करण्यात येतो. ज्यामध्ये फिश पेडिक्युअर करण्यासाठी गारा रुफा नावाचे मासे सोडण्यात आलेले असतात. अनेक ठिकाणी मोठा टॅंक असल्यामुळे वापरण्यात येणारे पाणी प्रत्येकासाठी बदलण्यात येत नाही. एकाच वेळी एका पेक्षा जास्त लोक या पाण्यात पाय बुडवून बसू शकतात. सहाजिकच या पाण्यातील सुक्ष्म बॅक्टेरिआमुळे तुम्हाला इनफेक्शनचा धोका होऊ शकतो. जर या पार्लर अथवा मॉलचे मालक फिश पेडिक्युअरसाठी टॅंकमध्ये वापरत येणारे पाणी दररोज बदलत असतील. तरी दिवसभरात कितीतरी माणसे या पेडिक्युअरचा आनंद घेतात. कोणत्या व्यक्तीला कोणत्या त्वचेची समस्या आहे हे आपल्याला  माहीत नसतं. त्यामुळे ही जोखिम न घेणं योग्य आहे. जर तुम्हाला फिश पेडिक्युअर करायचं असेलच तर ज्या ठिकाणी एका वेळी एकच व्यक्ती पेडिक्युअर करू शकते आणि प्रत्येकवेळी टबमधील पाणी बदललं जातं अशाच ठिकाणी फिश पेडिक्युअर करा. 

Shutterstock

फिश पेडिक्युअर करण्यासाठी ही सावधगिरी बाळगा -

फिश पेडिक्युअर करण्यापूर्वी जर तुमच्या पायाला एखादी जखम झाली असेल तर कृपया फिश पेडिक्युअर न करणंच योग्य आहे.  कारण त्यामुळे तुम्हाला इनफेक्शन होण्याचा धोका जास्त आहे. जर तुम्हाला फिश पेडिक्युअर करताना एखादी जखम झाली तर पेडिक्युअर करणं थांबवा आणि पायाला अॅंटि सोप्टिक लावा. जर तुम्हाला एखादी शारीरिक समस्या असेल आणि तुम्ही अशक्त असाल तर फिश पेडिक्युअर करू नका. मधुमेही आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांनी फिश पेडिक्युअर न करणं हितकारक आहे. 

 

फोटोसौजन्य -  शटरस्टॉक

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय

डोळ्यांचे सौंदर्य खुलवणारे आयलायनर शोधत असाल.. तर हे आयलायनर नक्की घ्या

मुलायम आणि कोमल पायांसाठी झटपट घरगुती उपाय