तुमचं जीवन अधिक सुखकर करतील हे छोटेसे बदल

तुमचं जीवन अधिक सुखकर करतील हे छोटेसे बदल

छोट्या छोट्या गोष्टी जीवनात अनेक चांगले बदल करण्यासाठी कारणीभूत ठरतात. खरंतर लहानपणापासून आपले आईवडील आपल्याला हे सांगतच असतात. पण आपण त्याबाबत कधीच नीट विचार करत नाही. पण जर तुम्ही आजपासूनदेखील जरी यावर थोडासा विचार केला तर उद्या तुमचं आयुष्य नक्कीच वेगळं असू शकेल. तुमचं जीवन अधिक आनंदी आणि आरामदायक करण्यासाठी काही गोष्टींबाबत अवश्य सावध राहा. कारण तुम्ही स्वतःमध्ये केलेले हे बदल तुमच्या भविष्यासाठी हितकारक आहेत.

1.तुमचा मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा -

बऱ्याचदा फोन वेळेवर चार्ज न केल्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात मग कधी घरी उशीरा येणार हे कळवण्यासाठी फोन करणं असू देत अथवा तातडीने ओला अथवा उबर बुक करणं असू देत तुम्हाला फोनची सतत गरज असते. मात्र आपण फोनवर सतत व्यस्त असतो आणि नेमकं महत्त्वाच्या कामाच्या वेळी तुमच्या फोनची  बॅटरी संपते. घराबाहेर असाल तर तुम्हाला पटकन फोन चार्ज करणं शक्य होत नाही. ज्यामुळे मग तुमच्या आयुष्यात अनेक गोंधळ निर्माण होतात. घरात वेळेवर फोन न केल्यामुळे घरची मंडळी रागावतात, एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहचण्यासाठी गाडी बुक करता येत नाही, पैशांचे व्यवहार फोनवरून करता येत नाहीत. यासाठीच तुमचा फोन वेळेवर चार्ज करायला विसरू नका.

giphy

2. प्रवास करताना सावध राहा -

सुरक्षित राहण्यासाठी कुणी घरात बसून राहत नाही. किंवा एखाद्या शहरात एकटं राहण्याची भिती वाटते म्हणून अथवा प्रवासाची भिती वाटते म्हणून म्हणून कोणी चांगला जॉब सोडत नाही. म्हणूनच जर तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल तर प्रवास करताना सावध राहण्याचा प्रयत्न करा. ओला अथवा उबरने प्रवास करत असाल तर तुमच्या टॅक्सी ड्रायव्हरची माहिती तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. त्याचप्रमाणे रात्री उशीरा घराबाहेर पडू नका. 

3. मद्यपान करून गाडी चालवू नका -

मद्यपान करून गाडी चालवणे हा एक अक्षम्य गुन्हा आहे. तेव्हा अशी चुक तुमच्या आयुष्यात मुळीच करू नका. वास्तविक मद्यपान करणं शरीरासाठी हितकारक नाही. मात्र असं असुनही जर कधी तुम्ही मद्यपान केलं तर कृपया अशा अवस्थेत गाडी तरी चालवू नका. कारण त्याचे दुष्परिणाम तुम्हाला, तुमच्या प्रियजनांना आणि रस्त्यावरील इतरांना भोगावे लागतील. अशा वेळी तुमच्यासोबत असलेल्या इतरांना गाडी चालवण्याची विनंती करा अथवा ओला, उबरने प्रवास करा.

4. घराबाहेर असताना आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा -

बऱ्याचदा आपण आपल्याच गोष्टींमध्ये इतकं गुंग होऊन जातो की आजूबाजूच्या वातावरणाचं भानच राहत नाही. बऱ्याचदा मोबाईल वापरताना अथवा त्यावर गाणी ऐकताना असं अनेकदा होतं. मात्र घराबाहेर असताना प्रत्येकाने याबाबत सतत सावध राहायला हवं. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी कधीही काहिही घडू शकतं. तुमचं पाकीट, तुमचा मोबाईल फोन चोरीला जाण्याच्या घटना अशाच बेसावध क्षणी केल्या जातात. म्हणूनच घराबाहेर असताना याबाबत नेहमी सावध राहा.

giphy

5.तुमच्या जवळ आपत्कालीन संपर्क संपर्क सूची ठेवा -

घराबाहेर पडताना तुमच्याजवळ नेहमी आपत्कालीन संपर्क संपर्क सूची असणं गरजेचं आहे. कारण या गोष्टींची तुम्हाला कधीही गरज लागू शकते. जसं की, काही महत्त्वाच्या हेल्पलाईनचे नंबर, पोलिसांचा नंबर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला त्यांची कधीही मदत मिळू शकते.  

 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

आनंदी जीवन जगण्यासाठी या '10' गोष्टी अवश्य करा

कृतज्ञ राहण्यासाठी करा नियमित या छोट्या छोट्या गोष्टी

यशस्वी जीवनासाठी प्रयत्नपूर्वक करा सकारात्मक विचार