ADVERTISEMENT
home / Fitness
तुमच्या दातांच्या सौंदर्याचा विचार करणेही तितकेच गरजेचे

तुमच्या दातांच्या सौंदर्याचा विचार करणेही तितकेच गरजेचे

तुमचा चेहरा सुंदर असेल पण तुमचे दात खराब असतील तर तुमच्या सौंदर्याला काहीच अर्थ नाही. आता तुम्ही म्हणाल सौंदर्य हे बाह्य अंगावर नाही तर आंर्तमनावर अवलंबून आहे. हो.. ते खरे असले तरी तुम्ही ज्यावेळी गोड हसता त्यावेळी तुमच्याकडे अनेकांच्या नजरा आकर्षित होतात. त्यावेळी ते तुमचा रंग, तुमचा बांधा किंवा इतर गोष्टी पाहत नाहीत तर पाहत असतात गोड हसू. आता हसल्यावर दात तर दिसणारच ना! म्हणूनच दाताची अधिक काळजी घेणं तुम्ही गरजेचं असतं. आता दाताच्या सौंदर्याचा विचार करता तुम्हाला नक्की काय गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मग करुया सुरुवात

सॅनिटरी पॅडच्या कडा मांड्याना लागतात.. मग करा या सोप्या आयडिया

दोन वेळा घासा दात

shutterstock

ADVERTISEMENT

काहींना नियमितपणे दिवसातून दोनवेळा दात घासायची सवय असते. सकाळी आणि रात्री झोपताना. जर ही सवय तुम्हाला नसेल तर ती आताच अंगवळणी पाडा. कारण ही चांगली सवय आहे. दातांचे डॉक्टरही तुम्हाला सकाळी आणि रात्री ब्रश करण्याचा हमखास सल्ला देतात. त्यामुळे तुम्ही कितीही दमला भागला असाल तरी दोन वेळा दात घासाच. ही सवय लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही आहे. कारण आपल्या दातांच्या फटीमध्ये अन्नपदार्थ अडकलेले असतात जर ते बाहेर आले नाही तर मग तुमच्या दातांना किड लागण्याची दाताच्या फटीमध्ये अन्न कुजून घाणेरडा वास येण्याची शक्यता असते. 

समोरच्या दाताने टणक वस्तू खाऊ नका

shutterstock

काही जाहिराती पाहून तुम्हाला तुमचे दातही छान मजबूत आहे असे वाटत असतील तर थोडं थांबा बरं का! कोणतीही टणक गोष्ट चावताना थोडी काळजी घ्या. काहींना त्यांच्या पुढच्या दातांनी लाडू किंवा एखादा टणक पदार्थ चावून खाण्याची घाई असते. तुम्ही पुढच्या दाताने जर सतत खात असाल तर तुमच्या पुढच्या दातांना त्रास होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला तुमचे दात नाजूक वाटत असतील तर तुम्ही हे मुळीच करु नका. कारण अशामुळे तुमचे दात तुटण्याची भीती असते आणि हिरड्याही सुजतात.

ADVERTISEMENT

म्हणून रोज सकाळी भिजवलेले बदाम खाण्याचा दिला जातो सल्ला

दातांच्या फटी भरुन घ्या

shutterstock

तुमच्या दातांमध्ये खूपच गॅप असेल तर मग तुम्ही तुमच्या दातांच्या फटी भरुन घ्या. याचे कारण असे की, दातांच्या फटीमध्ये अन्नाचे कण अडकू शकतात. हे अन्नकण जास्त वेळासाठी अडकले तर दातांना कीड लागू शकते. शिवाय दातांच्या फटीमध्ये अन्न अडकून राहिले तर तोंडाला वास येऊ शकतो. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने दातांच्या फटी भरुन घ्या. दातांच्या फटी भरुन घेण्याचा फार खर्च येत नाही.

ADVERTISEMENT

डेंटल चेकअप महत्वाचं

shutterstock

आता तुम्ही म्हणाल की काळजी घेतली तर डेंटिस्टची गरज काय? बरेचदा आपण दातांच्या शुभ्रपणासाठी घरगुती उपाय करतो. पण आपण घेत असलेली काळजी  पुरेशी नसते. तुम्हाला अधिक काय काळजी घ्यायला हवी ते फक्त एक्सपर्ट सांगू शकतात. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरी सुद्धा दातांची काळजी ही महत्वाची असते. तुमच्या तोंडाचे आरोग्य खराब असेल तर तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तीन महिन्यातून एकदा तरी डेंटल चेकअप करण्यासाठी जा.

चारचौघात दातांमुळे तुमचा विचका होऊ नये असं वाटत असेल तर दातांच्या सौंदर्याकडेही लक्ष द्या

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

You Might Like This:

अक्कल दाढ दुखीवर उपाय तुम्हाला माहीत आहेत का

दातांचा पिवळेपणा दूर करतील हे सोपे घरगुती उपाय

ADVERTISEMENT
06 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT