Matrimony साईटवरुन फसवणूक होऊ नये म्हणून टाळा या चुका

Matrimony साईटवरुन फसवणूक होऊ नये म्हणून टाळा या चुका

लग्न ठरण्यासाठी चांगला आणि उत्तम पर्याय समजला जातो तो म्हणजे Matrimonial साईट. मराठीमध्ये सांगायचे झाले तर तुम्हाला सुयोग्य वधू/ वर मिळावा म्हणून तुमचे नाव वधु-वर सूचक केंद्रात नोंदवले जाते. पण काही जणांचे अनुभव इतके वाईट असतात की, त्यांना या माध्यमातून लग्न जुळवायचे म्हटले की, जरा टेन्शन येते. आता तुम्ही ही या संकेसस्थळांवरुन तुमचा योग्य जोडीदार निवडायचे ठरवले असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. या संदर्भातच आम्ही आज तुम्हाला टीप्स देणार आहोत मग करुया सुरुवात

या कारणांमुळे मुलींना वाटू शकते लग्न करण्याची भीती

स्थळ घ्या तपासून

shutterstock

साधारणपणे अशा साईट्सवर तुम्ही पैसे भरल्यानंतरच तुमच्या अपेक्षेमध्ये बसणारी आणि तुमच्या प्रोफाईशी साधर्म्य असलेली स्थळं तुम्हाला दिसू लागतात. तुमची प्रोफाईल आणि त्यांची प्रोफाईल तुम्हाला दिसू लागते. त्यांची इत्यंभूत माहिती तुम्हाला मिळते. तुम्ही जेव्हा या प्रोफाईल पाहता तेव्हा त्यातील काही निवडक स्थळांशी तुम्ही संपर्क साधता.  दिसायला चांगले आणि चांगली कमावणाऱ्या मुलांची किंवा मुलींची स्थळ अनेकांना आकर्षक वाटतात. पण लगेचच हुरळून जाऊ नका. नुसता पगाराचा आकडा किंवा त्यांचे फोटो पाहू नका. तर तुम्ही इतरही काही गोष्टी पाहा. घर, कुटुंबाची माहिती, त्या व्यक्तिची आवड- निवड जाणून घेणे तुमच्यासाठी खूपच गरजेचे असते. 

चौकशी असते महत्वाची

तुम्हाला आवडलेल्या स्थळाची भेट घ्यायची तुम्ही ठरवले असेल तर तुम्हाला पुढे जी गोष्ट जाणीवपूर्वक करायची आहे ती म्हणजे चौकशी.कोणत्याही स्थळाला भेटण्याआधी त्यांचा काही सोशल बॅकराऊंड तपासता आला तर फारच उत्तम कारण. अनेकदा प्रोफाईल आणि सोशल मीडियामध्ये बरीच तफावत असते. अशावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणालाही भेटण्याआधी तुम्ही त्यांची माहिती घ्या. ही माहिती घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागला तरी चालेल. आयुष्याचा एखादा निर्णय पटकन घेण्याची कोणी कितीही सांगितली तरी घाई करु नका.

भेट होणे महत्वाचे

shutterstock

आताच्या काळात वर-वधू दोघांनाही एकमेकांना समजून घेणारा जोडीदार हवा असतो. एखाद्याचा स्वभाव तुम्हाला त्या व्यक्तिला भेटल्याशिवाय कळत नाही.  एका भेटीत तुम्हाला त्याचा स्वभाव कळू शकत नाही. उदा. काही व्यक्ती या फार चिकट असतात. त्यांना कोणासाठीही काहीही करण्याची इच्छा नसते. समोरच्या व्यक्तिने खर्च करावा असेच त्यांना वाटते. तर काही जण फारच शो ऑफ करणारे असतात. त्यामुळे तुम्ही स्वभाव आधीच पारखून घ्या. या भेटीत तुमच्याशी एखादी व्यक्ती अपमानास्पद वागणूक देत असेल  किंवा तुम्हाला कमी समजत असेल तर तुम्ही ही गोष्ट तिथेच थांबवा. 

2019 संपले तरी अजूनही आहात सिंगल, तर मग वाचाच

लगेच कोणतीही गोष्ट करु नका शेअर

काही गोष्टी तुम्ही माणसाची परख झाल्याशिवाय सांगणे अजिबात चांगले नसते. म्हणजे तुमच्या अगदी खासगी गोष्टी तुम्ही माणसाची परख झाल्याशिवाय सांगितल्या नाही तर बऱ्या असतात. उदा. तुमची प्रॉपर्टी, तुमच्या सेव्हिंग्ज, तुमच्या पैशांचे व्यवहार एखाद्याला पटकन कळू देऊ नका. कधी कधी या साईटवर असणाऱ्या फेक स्थळांना फक्त पैसा लाटायचा असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी त्यांना पटकन घेऊन जाऊ नका. तुमचे पत्ते सगळे फोन नंबर शेअर करु नका. 


शक्य असेल तर तुम्ही तुमच्या परिचयातूनच लग्नसाठी स्थळ पाहा. असे करतानाही पूर्ण चौकशी केल्याशिवाय लग्नाला होकार देऊ नका. काही ठिकाणी तुम्हाला तडजोड करावी लागेल. पण वाईट माणसांना ओळखायला शिका. 

 

 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/