ADVERTISEMENT
home / Care
हिवाळ्यात केसांची अशी काळजी घेतली तर नाही होणार त्रास

हिवाळ्यात केसांची अशी काळजी घेतली तर नाही होणार त्रास

प्रत्येक सीझननुसार तुमच्या त्वचेमध्ये जसे बदल होतात. अगदी तसेच बदल तुमच्या केसांमध्येही होत असतात. उन्हाळ्यातील केसांमध्ये आणि हिवाळ्यातील केसांमध्ये बराच फरक असतो. म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यात केसांमधून घाम येणे, जास्त घामामुळे केसांना वास येणे असा त्रास होऊ शकतो. तर हिवाळ्यात मात्र केसांच्या बाबतीत वेगळेच काहीसे घडते. अशावेळी तुमचे केस अधिक कोरडे आणि क्षुष्क वाटू लागतात अगदी तुमच्या त्वचेप्रमाणे. हिवाळ्याच्या आल्हाददायक वातावरणात तुमच्या केसात कोंडा होणे, केस तुटणे असे त्रास अगदी आरामात होताना दिसतात. हिवाळ्यात तुमच्याही केसांसोबत असे काही होत असेल तर तुम्ही आजपासूनच तुमच्या केसांची काळजी अशी घ्या. म्हणजे हिवाळ्यातही तुमचे केस चांगले राहतील.

केस गळतीवर वेळीच करा उपचार

गरम पाणी टाळा

केसांसाठी वापरु नका गरम पाणी

shutterstock

ADVERTISEMENT

हिवाळ्यात छान कडकडीत पाण्याची आंघोळ करायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. पण तुमच्या केसांसाठी कडकडीत पाणी अजिबात चांगले नाही. किमान केसांच्या आरोग्यासाठी गरम पाणी अजिबात चांगले नाही. जर तुम्ही तुमचे केस धुण्यासाठी गरम पाण्याचा उपयोग करत असाल तर तो करणे टाळा याचे कारण असे की, गरम पाण्यामुळे तुमच्या स्काल्पवरील पोअर्स ओपन होतात. आणि त्यामुळेच तुमचे केस गळण्याची आणि त्यात धूळ, माती अडकून पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्ही केसांसाठी कोमट पाणी वापरले तर अधिक चांगले. 

कंडिशनरचा अति वापर देऊ शकतो कोंडा

हिवाळ्यात घ्या केसांची काळजी

shutterstock

आता कंडिशनरचा उपयोग केस शॅम्पूने धुतल्यानंतर करायला हवा हे आम्हालाही माहीत आहे. पण ज्यावेळी तुम्ही कंडिशनरचा वापर करता त्यावेळी ते कंडिशनर तुमच्या केसांमधून व्यवस्थित जायला सुद्धा हवं. थंडीच्या दिवसात पाण्यात जास्त वेळ बसण्याचा सगळ्यांनाच कंटाळा असतो अशावेळी तुम्ही लावलेले कंडिशनर जर केसांमधून संपूर्ण निघाले नाही आणि जर ते तुम्ही तुमच्या स्काल्पला लावलेले असेल तर अशावेळी तुम्हाला कोंडा होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कंडिशनरचा कमीत कमी वापर करा.

ADVERTISEMENT

हेअर सीरमचा करा वापर

केसांना सीरम लाावायला विसरु नका

shutterstock

जर तुम्हाला कंडिशनर वापरणे या काळात टाळता आले तरी चालू शकते. म्हणजे तुम्ही केस धुतल्यानंतर हेअर सीरमचा वापर करु शकता. त्यामुळेही तुमच्या केसांना आवश्यक असलेली चमक तुम्हाला मिळू शकेल. तुम्हाला हातावर तेलाप्रमाणे हे सीरम घेऊन केसांना लावायचे आहे आणि मगच केस विंचरायचे आहे. 

 

ADVERTISEMENT

दिवसातून चार वेळा तरी विंचरा केस

रोज विंचरा केस

shutterstock

आता हा सल्ला तुम्हाला थोडा विचित्र वाटेल खरा. पण हिवाळ्यात तुमच्या केसांचा अधिक गुंता होतो. तुमचे केस सतत गुंतत राहतात. जर तुम्ही स्वेटर किंवा जॅकेट असे काही कपडे घालत असाल तर तुमच्या मानेखाली होणारा केसांचा गुंता तुम्हाला माहीत असेलच. अशावेळी तुम्ही केसांचा गुंता होऊन तुमचे केस तुटू नये म्हणून तुम्ही तुमचे केस किमान  4 वेळा तरी विंचरा. 

अशाप्रकारे तुम्ही हिवाळ्यात केसांची काळजी घ्याल तर तुमचे केस अगदी हिवाळ्यातही छान राहतील.

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

17 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT