ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
बिझनेस सुरू करताय, मग फॉलो करा या सोप्या टिप्स

बिझनेस सुरू करताय, मग फॉलो करा या सोप्या टिप्स

प्रत्येकाला नेहमीच असं वाटत असतं की, आपण नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करावा. कोणाकडे तरी नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस असणं हे नक्कीच स्वावलंबी होण्याचं एक उत्तम माध्यम आहे. मात्र बिझनेस चालेल की नाही, शिवाय यासाठी कोणता व्यवसाय निवडावा याबाबत पुरेसे  ज्ञान कोणाकडेच नसते. एखाद्या उद्योग सुरू करण्याचा धोपट मार्ग स्वीकारण्यापेक्षा सरळसाधी नोकरी करण्याचा पर्याय मग तुम्ही निवडता आणि आयुष्यभर बिझनेस करण्याचं फक्त स्वप्नच पाहत बसता. खरंतर आता उद्योगधंद्यांसाठी बरंच पुरक आणि पोषक वातावरण निर्माण होत आहे. दरवर्षी नव्याने सुरू होणाऱ्या व्यवसायांमध्ये आता पूर्वीपेक्षा अधिकच भर पडत आहे. त्यामुळे नवउद्योजकांसाठी हा सुगीचा काळ आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. मात्र असं असलं तरी व्यवसाय सुरू करणं आणि तो यशस्वीपणे वाढवणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. जसे दरवर्षी नव्याने  व्यवसाय सुरू होतात तसेच ते त्याच वेगाने काही बंददेखील होतात. ज्यामुळे आजही यशस्वी व्यवसाय खूपच कमी प्रमाणात सुरू आहेत. यासाठीच आम्ही तुम्हाला काही सोप्या बिझनेस टिप्स सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नव्या व्यवसायात नक्कीच चांगलं यश मिळेल. 

Shutterstock

व्यवसायात यश मिळण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स –

जर तुम्हाला व्यवसायातून स्वतःची नवी ओळख निर्माण  करायची असेल तर उद्योग हा एक चांगला पर्याय आहे. मात्र एखादा नवा बिझनेस सुरू करण्याआधी तुम्हाला मार्गदर्शनाची नक्कीच गरज असते. यासाठी या काही टिप्स तुमच्या फायद्याच्या ठरू शकतात. 

ADVERTISEMENT

व्यवसाय निवडताना सावध राहा –

कोणताही नवा व्यवसाय सुरू करण्याआधी त्याचा नीट विचार करा. तुमच्यामध्ये चांगला व्यवसायिक होण्याचे गुण आहेत याचं पहिलं लक्षण म्हणजे ‘संयम’. जो माणूस शांतपणे विचार करू शकतो तो नक्कीच चांगला उद्योजक होऊ शकतो. एखादा व्यवसाय आवडला म्हणून अथवा एखाद्या बिझनेसमध्ये जास्त नफा मिळतो म्हणून तुम्ही कधीही कोणताही विचार करता व्यवसाय सुरू शकत नाही. म्हणूनच बिझनेस सुरू करण्याआधी त्याचा नीट विचार करा. 

Shutterstock

व्यवसायातील गुंतवणूक ठरवा –

व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे गुंतवणूक. म्हणूनच तुम्ही जो व्यवसाय निवडला आहे त्यासाठी लागणाऱ्या गुंतवणूकीचा आधीच विचार करा. तुम्हाला व्यवसाय सुरू केल्यावर तो वाढवण्यासाठी सतत गुंतवणूक करावी लागेल. बिझनेस सुरू केल्यानंतर कमीत कमी तीन वर्ष नफा न कमवताही गुंतवणूक करता येईल इतके पैसे तुमच्याजवळ असायला हवे. वास्तविक काही  व्यवसाय असेही आहेत ज्यासाठी तुम्हाला फार गुंतवणूकीची गरज नसते. मात्र तुम्ही कोणता व्यवसाय निवडत आहात यावर तुमची गुंतवणूक ठरते.

ADVERTISEMENT

वाचा – छंदातूनही कमवू शकता पैसा, फक्त माहीत हवी योग्य सुरुवात

संशोधन करा –

कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी त्याबाबत आधी संशोधन करणं फार गरजेचं आहे. म्हणूनच तुमचा बिझनेस सुरू करण्याआधी तुमच्या बिझनेसबाबत सर्व गोष्टी  जाणून घ्या. तुमच्या बिझनेसशी निगडीत सर्व कौशल्ये शिकून घ्या. कारण शिकणे ही बिझनेससाठी आयुष्यभर करावी एक लागणारी प्रक्रिया आहे.

नोकरी करता करता व्यवसायाला सुरूवात करा –

बिझनेस सुरू करायचा आहे म्हणून लगेच तुमची आधीची नोकरी सोडून देऊ नका. कारण बिझनेस करतानाही काही वर्ष तुम्हाला नियमित इनकमची गरज लागते. यासाठीच लगेच नोकरी सोडण्याचा निर्णय मुळीच घेऊ नका. 

व्यवसायाबाबत कायद्यांचा अभ्यास करा –

प्रत्येक बिझनेसचे काही नियम असतात. तुम्ही जो व्यवसाय निवडला असेल त्याबद्दल सर्व कायदे आणि नियम समजून घ्या. कारण व्यवसाय करत असताना जर तुम्ही काही नियम मोडले तर त्याचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो. नुकसान टाळण्यासाठी याबाबत आधीच रिसर्च करा. विशेषतः अन्नप्रक्रिया केल्या जाणाऱ्या व्यवसायात असलेले नियम कठीण आणि काटेकोरपणे पाळावे लागतात.

ADVERTISEMENT

छोट्या प्रमाणावर व्यवसायाला सुरूवात करा –

सुरुवातीला व्यवसाय छोट्या प्रमाणावर करा. यासाठीच आधी खूप खर्च आणि गुंतवणूक करणं टाळा. शक्य तितकं साध्या आणि कमी प्रमाणात व्यवसायाची सुरूवात करा. कारण असं न केल्यास तुमच्या उत्पादनांची फायनल किंमत जास्त वाढू शकते.

चुकांमधून धडे घ्या –

माणसाकडून चुका होणं हे स्वाभाविक आहे. मात्र त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणूनच आधी झालेल्या चुकांमधून धडे घ्या आणि त्याप्रमाणे नियोजन करा. 

इतरांच्या अनुभवातून शिका –

बिझनेसमधील अनुभवी लोकांच्या अनुभवाचा तुम्हाला भविष्यात नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी यशस्वी उद्योजकांची पुस्तके वाचा, भाषणे ऐका. तुम्ही बिझनेसमधील तुमच्या आदर्श व्यक्तीचा सल्लादेखील याबाबत घेऊ शकता. 

डिजिटल माध्यमाचा वापर करा –

सध्या आपण आधूनिक युगात वावरत आहोत. ज्यामुळे डिजिटल माध्यमाचा व्यवसायासाठी वापर करणं नक्कीच गरजेचं आहे. तुमच्या व्यवसायाबाबतची वेबसाईट, सोशल अकाऊंट हॅंन्डल करण्यासाठी त्याबद्दलचं पुरेसं ज्ञान तुम्हाला असणं गरजंचं आहे. 

ADVERTISEMENT

जोखिम घेण्याची ताकद ठेवा –

बिझनेस करणं हे एका आव्हानापेक्षा कमी नक्कीच नाही. कारण बिझनेसमध्ये रोज नवनवी आव्हानं तुम्हाला पेलावी लागतात. यासाठी सतत जोखिम उचलण्यासाठी तुमची मनःस्थिती असायला हवी. तरच ती आव्हानं पेलवणं तुम्हाला शक्य होईल. शिवाय बिझनेसमध्ये  कोणतीही गोष्ट करताना तुमचा प्लॅन बीदेखील तयार असायलाच हवा. 

 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

तुमचं जीवन अधिक सुखकर करतील हे छोटेसे बदल

तुमच्या ‘या’ सवयींमुळे नकळत खर्च होत आहेत तुमचे पैसे

ADVERTISEMENT

शॉपिंगवर खूप खर्च करत असाल तर या पद्धतीने वाचवा पैसे

16 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT