मकर संक्रांतीच्या दिवशी काही खास गोष्टी केल्या जातात. त्यापैकी पतंग उडवणं, तिळगूळ वाटप आणि खाणं या गोष्टींसह सर्वात महत्त्वाची अजून एक गोष्ट असते ती म्हणजे संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाणं. तांदूळ, काळी डाळ अथवा मूगडाळ, मीठ, हळद, मटार आणि काही भाज्या असं मिळून ही खिचडी या दिवशी करण्यात येते. पण नक्की याचं कारण काय तुम्हाला माहीत आहे का? वास्तविक तांदूळ हे चंद्राचं प्रतीक मानण्यात येतं आणि काळी डाळ हे शनीचं. हिरव्या भाज्यांचा संबंध बुध ग्रहाशी जोडण्यात येतो. संक्रांतीच्या दिवशी खिचडीची उष्णता ही मंगळ आणि सूर्य या दोन्ही ग्रहाशी जोडण्यात येत असल्याचा समज आहे. तसंच या दिवशी खिचडी खाण्याने राशींमधील ग्रहांची स्थितीही उत्तम होते असाही समज आहे. खिचडी खाण्याचं हे एक कारण असून वैज्ञानिकदृष्ट्या संक्रांतीच्या वेळी असणारी थंडी खिचडीमधील धान्यातून अधिक उष्णता शरीराला मिळून कमी होते त्यामुळे खिचडी खाल्ली जात असल्याचं सांगण्यात येतं. दोन्ही गोष्टी समाजात मानल्या जातात. पण आपण परंपरागत याचा विचार न करता प्रत्येक संक्रांतीला खिचडी मात्र आवर्जून खात असतो. आता तुम्हाला याची कल्पना नक्कीच आली असेल.
मकर संक्रांतीच्या दिवसी खिचडी बनवण्याची परंपरा ही बाबा गोरखनाथ यांनी सुरु केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. खिलजीने आक्रमण केल्यानंतर नाथ पंथातील शिष्यांना संघर्षाच्या वेळात जेवण बनवण्यासाठी वेळ मिळत नव्हता. त्यामुळे हे सर्व योगी बऱ्याचदा भूकेने तळमळायचे आणि त्याची शारीरिक स्थितीही कमजोर झाली होती. रोज ही योग्यांची ढळती अवस्था पाहून गोरखनाथांनी या समस्येची सुटका म्हणून डाळ, तांदूळ आणि भाजी एकत्र शिजवण्याचा सल्ला दिला. हे मिश्रण एकत्र शिजल्यानंतर चविष्टदेखील लागतं आणि त्याने शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते. नाथ परंपरेतील शिष्यांना हा पदार्थ फारच आवडला आणि त्यांना त्यातून ऊर्जाही मिळू लागली. त्यामुळे याचं नाव गोरखनाथांनी खिचडी असं ठेवलं. झटपट तयार होणाऱ्या या पदार्थांमुळे योगींना ऊर्जाही मिळाली आणि खिलजीशी युद्ध करताना त्यांना यशही मिळालं. मकरसंक्रांतीच्या दिवशी खिलजीच्या त्रासातून मुक्त झाल्यामुळे गोरखपूर या ठिकाणी विजय दर्शन पर्व साजरा करण्यात येतं. या दिवशी गोरखनाथ मंदिराजवळ खिचडी मेळादेखील आयोजित करण्यात येतो. ही खिचडी प्रसाद म्हणून वाटण्यात येते. त्यामुळे या निमित्ताने मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतं. या दिवशी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेशही पाठवले जातात.
म्हणून संक्रांतीच्या काळात लहान मुलांना घातले जाते ‘बोरन्हाण’
आपण नेहमी बिरबलाच्या खिचडीची गोष्ट ऐकली आहे. पण भारतात येणाऱ्या अनेक विदेशी पाहुण्यांनीही खिचडीचा वेळोवेळी उल्लेख केलेला दिसून येतो. शेती करणाऱ्या मजदूरांचं हे दुपारचं जेवण होतं. केटी आचायाच्या ‘डिक्शनरी ऑफ इंडियन फूड’ या पुस्तकानुसार इब्न बतूता, अब्दुल रज्जाक आणि फ्रान्सिस्को प्लेजार्ट यांनीही खिचडीबाबत उल्लेख केल्याचं सांगण्यात आलं आहे. 1470 मध्ये एक रूसी यात्रेकरू अखन्सय निकितीनुसार त्यावेळी घोड्यांनाही खिचडी खाण्यासाठी देण्यात यायची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीला सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. त्यावेळी खिचडी खाण्यानेच सुरुवात होते. त्यामुळे मकर संक्रांतीला खिचडी खाण्याचं एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.
देशभर खिचडीचं वेगवेगळी रूपं आहेत. तामिळनाडूमध्ये मकर संक्रांतीला पोंगल म्हणतात. यावेळी करण्यात येणारे पक्वान्न म्हणजे तांदूळ, मूगडाळ, दूध आणि गूळ एकत्र करून पायसम तयार करण्यात येतं. तर उत्तरप्रदेशमध्ये मूगडाळ आणि तांदूळाची खिचडी करण्यात येते. पश्चिम बंगालमध्ये मूगाची डाळ भाजून त्याची खिचडी तयार करण्यात येते. दुर्गा पूजेला तर खिचडीचा प्रसादही चढवण्यात येतो. तर राजस्थान आणि गुजरातमध्ये बाजरीची खिचडी अधिक प्रसिद्ध आहे. हैदराबाद, दिल्ली आणि भोपाळ या शहरांमध्ये डाळ आणि मांस एकत्र करून खिचडा अथवा हलीम बनवण्यात येतं. मराठी लोकांमध्ये साबुदाण्याची खिचडी अथवा मूगडाळाची खिचडी बनवण्यात येते. तसंच प्रॉन्सचीदेखील तांदूळासह खिचडी बनवण्यात येते.विविध ठिकाणी विविध तऱ्हेने मकर संक्रांतीला खिचडी तयार करण्यात येते. पण प्रत्येक ठिकाणी खिचडी ही आवर्जून बनवण्यात येते.
मकर संक्रांत नक्की का साजरी करतात, जाणून घ्या अथपासून इतिपर्यंत
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.