एका ठराविक वयात आल्यावर मुलींना घरातून आणि समाजातून लग्नासाठी आग्रह केला जातो.असं म्हणतात की मुलींनी योग्य वयात लग्न करणं फार गरजेचं असतं. कारण निसर्गनियमानुसार मुलींनी उशीरा लग्न केल्यास लग्नानंतर येणारं गरोदरपण, प्रसूती या गोष्टींमध्ये अडथळे येतात. निसर्गाने स्त्रीयांना प्रजननक्षमता दिलेली आहे. मात्र उशीरा लग्नाचा निर्णय घेतल्यास या प्रक्रियेवर विपरित परिणाम होतो. कारण निसर्गानुसार प्रत्येकाच्या शरीरात वयपरत्वे अनेक बदल होत असतात. शिवाय आजकाल उशीरा लग्न करणाऱ्या मुलींमध्ये वंधत्वाचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येत आहे. मात्र असं असूनही मुलींना लग्न करण्याची सतत भिती वाटत असते. शिवाय आजकाल मुलींना शिक्षण, करिअर यामुळे लग्नाचा निर्णय लवकर घेणं शक्य होत नाही. एवढंच नाही तर बदलत असलेले नातेसंबंध आणि पुरूषांबद्दल वाटत असलेला अविश्वास यामुळेदेखील मुलींना लग्न करण्याची भिती वाटते. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत मुलींना लग्नाचा निर्णय घेताना मनात येत असलेल्या असुरक्षितेबद्दलची काही कारणं शेअर करत आहोत.
मुली त्यांच्या आजूबाजूच्या म्हणजेच कुटूंब, कॉलेज अथवा ऑफिसमधल्या मुलांचं निरिक्षण करतात. अशा वेळी त्यांच्या संपर्कात आलेली अथवा ओळखीची तरूण मुलं जर बेजबाबदार असतील तर मुलींना आयुष्यात कोणत्याही मुलाबरोबर लग्नाचा निर्णय घेण्याची भिती वाटू शकते. कारण मुली नेहमीच शिक्षण, नोकरी, सामाजिक कार्य अशा सर्वच क्षेत्रात नंबर वन असतात. त्यामुळे त्यांना त्यांचा जोडीदारदेखील त्यांच्याप्रमाणेच जबाबदारीने वागणारा हवा असतो.
आयुष्यात प्रत्येकालाच वाईट सासू, सासरे, नणंद, दिर मिळतात असं नाही. पण इतरांचे वाईट अनुभव लहानपणापासून पाहिल्यामुळे तरूणपणी मुलींना तिच्या सासरच्या मंडळींबद्दल अनादर वाटू लागतो. भविष्यात सासरच्या मंडळींचा त्रास नको म्हणून मुली आजकाल लग्नाचा निर्णय घेण्यास तयार होत नाहीत.
आजकाल आपण नेहमी मुलींना मुलांकडून फसवण्यात आल्याची उदाहरणं पाहतो. त्यामुळे लग्न करून भविष्यात नवऱ्याकडून फसवलं जाऊ नये यासाठी मुली लग्नाचा निर्णय घेण्यास तयार होत नाहीत. शिवाय लग्नानंतर नवऱ्याने त्यांच्यावर हक्क गाजवलेला त्यांना आवडत नाही.
बऱ्याचदा मुली घरातील सुरक्षित वातावरणात मोठ्या होतात. वडील, भाऊ यांच्यासोबत घरातील सुरक्षित वातावरण नेहमीच आनंदाचं असतं. मात्र लग्न करून नव्या घरात जाणं, वैवाहिक जीवनातील नवनवीन आव्हाने स्वीकारणं, भविष्याबाबत शाशंक असणं यासाठी त्यांच्या मनाची तयारी नसते. त्यामुळे ज्या मुलींना आयुष्यात कधीच कोणतीच जोखिम घ्यायची नसते अशा मुली लग्नासाठी तयार होत नाहीत.
ज्या मुली लहानपणापासून नेहमीच स्वातंत्र्य मिळालेलं असतं अशा मुलींना कधीच कोणत्या बंधनात राहणं आवडत नाही. माहेरी मिळणारं स्वातंत्र्य, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची सूट त्यांना सासरी मिळेलच असं नसतं. स्वाभाविक अशा मुलींना त्यांचे स्वातंत्र्य प्रिय असतं. ते गमावलं जाऊ नये या भितीने मुली लग्नाचा निर्णय घेत नाहीत.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
हे ही वाचा -
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा -
लग्न ठरलंय, पण भविष्याचा विचार केलाय का
मैत्रिणीचं लग्न ठरलंय ? मग तुमच्या मनात हे विचार हमखास येणार
‘लग्न कधी करणार’ या प्रश्नाचा भडीमार करणाऱ्यांपासून अशी मिळवा सुटका