जर काही वर्षात तुम्ही निरीक्षण केलं असल्यास आजकाल पुरूषांमध्ये दाढी ठेवण्याचा ट्रेंंड वाढताना दिसत आहे. अगदी सेलिब्रिटी अभिनेत्यांपासून ते क्रिकेटर्सपर्यंत सगळेचं आजकाल दाढी ठेवताना दिसत आहेत. तुमच्याही बॉयफ्रेंडने दाढी वाढवली आहे का, तुम्ही सांगितल्यामुळे. हो ना..मग अशा बियर्ड लुक ठेवणाऱ्या पुरूषांसाठी आहे खुषखबर. एका नव्या रिसर्चनुसार दाढी ठेवणाऱ्या पुरूषांकडे महिला जास्त आकर्षित होतात.
या नव्या रिसर्चनुसार, दाढी ठेवणारे पुरूष हे शारीरिक आणि सामाजिकरित्या जास्त प्रभावी वाटतात. कदाचित याचमुले महिलाही दाढी किंवा बियर्ड लुक असणाऱ्या पुरूषांकडे जास्त आकर्षित होतात. या रिसर्चमध्ये दाढी असणाऱ्या पुरूषांकडे आकर्षित न होणाऱ्या महिलांच्या मानसिकतेबाबतही सांगण्यात आलं आहे. खरंतर काही महिला या स्वच्छतेबाबत काटेकोर असतात. ज्यामुळे केसांमध्ये वाढणाऱ्या बॅक्टेरियाबाबत त्यांना भीती असते. त्यामुळेच त्या दाढी असणाऱ्या पुरूषांना नापसंत करतात आणि क्लीन शेव्ह असणाऱ्या पुरूषांकडे आकर्षित होतात. पण सगळ्यांच महिलांचं असं नाहीयं. या रिसर्चमध्ये जास्तकरून महिलांनी पसंती दिली ती दाढी म्हणजेच बियर्ड लुक असणाऱ्या पुरूषांना. मर्दानी लुक असणाऱ्या पुरूषांच्या दाढी असणाऱ्या फोटोजना जास्त पसंती मिळाली.
बियर्ड लुक असणाऱ्या पुरूषांना मिळणाऱ्या पसंती मागील कारण शोधताना तज्ज्ञ सांगतात की, मर्दाना चेहरे शारीरिक रूपाने मजबूत आणि सामाजिकरित्याही प्रभावशाली वाटतात. तसंच दाढीमुळे रूंद जबडा आणि चेहऱ्यावरील इतर कमी आकर्षक भागांना लपवतात. त्यामुळे स्त्रिया दाढी असणाऱ्या पुरूषांना जास्त पसंती देतात.
नुकत्याच सुपर-डुपर हिट ठरलेल्या कबीर सिंग चित्रपटात अभिनेता शाहीद कपूरने बियर्ड लुक ठेवला होता. ज्याला फिमेल फॅन्सची भरपूर पसंती मिळाली. कबीर सिंगच्या ओरिजिनल असलेल्या अर्जुन रेड्डीमधील दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडाच्या बियर्ड लुकवरही त्याच्या फॅन्स फिदा आहेत. अगदी शाहरूखच्या लव्ह यू जिंदगीमधल्या बियर्ड लुकवरही अनेक जणी भाळल्या होत्या.
‘कागर’ मधून मराठी चित्रपटांमध्ये एंट्री केलेल्या शुभंकर तावडेलाही जबरदस्त फॅन्स आहेत. हिरकणी या चित्रपटातील अभिनेता अमित खेडकरला त्याच्या अभिनय आणि लुकमुळे पसंती मिळाली आहे. मराठीतील बियर्ड लुकमध्ये सिद्धार्थ चांदेकर, भूषण प्रधान, गश्मीर महाजनी, आदिनाथ कोठारे आणि अजिंक्य ननावरे यांचाही समावेश आहे.
बॉलिवूडचा ऋतिक रोशन ठरला 2019 मधील 'सर्वात सेक्सी आशियाई पुरूष'
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.