ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Woolen clothes care tips: लोकरीचे कपडे धुण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Woolen clothes care tips: लोकरीचे कपडे धुण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

 

सध्या थंडी वाढत आहे आणि अशावेळी आपण आपल्या कपाटात सांभाळून ठेवलेले गरम कपडे काढणं नक्कीच सुरू केलं असेल. स्वेटर, शाल आणि जॅकेट तुम्ही असंच घालू शकत नाही. ते घालण्यापूर्वी तुम्हाला एकदा तरी या कपड्यांना ऊन दाखवणं गरजेचं आहे. लोकरीचे कपडे घालण्यापूर्वी त्यांना व्यवस्थित एक वेळा धुऊन घेणं आवश्यक ठरतं. कारण यामधून येणारे किटकनाशक औषधांचे वास आणि बरेच दिवस तसेच कपडे ठेवल्यामुळे येणारा एक प्रकारचा वास घालवणं गरजेचं ठरतं. थंडीच्या दिवसात लोकरीचे कपडे नक्की कसे धुवायचे याची पद्धत बऱ्याच जणांना माहीत नसते. त्यामुळे तुम्हाला जर हे कपडे धुवायचे असतील आणि याची व्यवस्थित काळजी घ्यायची असेल तर आम्ही तुम्हाला या लेखातून माहिती देणार आहोत. तुम्हालाही या कपड्यांची काळजी घेणं सोपं होईल. 

लोकरीचे कपडे घरी कसे धुवायचे याची योग्य पद्धत

 

लोकरीचे कपडे धुताना नक्की कसे धुवायचे याची पद्धत सर्वांना माहीत नसते. त्यामुळे त्याची योग्य पद्धत आम्ही तुम्हाला सांगत आहोत – 

लोकरीचे कपडे ऊन्हात ठेवणे

Shutturstock

 

वर्षभर कपाटात राहिलेले लोकरीचे कपडे अर्थात स्वेटर, जॅकेट हे कपडे तुम्ही घालण्याआधी किमान दोन ते दिवस उन्हात ठेवणं आवश्यक आहे. कपाटात राहून राहून त्याला एक वेगळाच वास येत असतो. उन्हात ठेवल्याने हा वास निघून जातो आणि या कपड्यांची ऊब व्यवस्थित राहाते. त्यामुळे सर्वांत पहिल्यांदा हे कपडे उन्हात ठेवणं आवश्यक आहे. 

ADVERTISEMENT

डाग असल्यास घ्यावी टिश्यू पेपरची मदत

 

तुमच्या स्वेटर अथवा अन्य लोकरी कपड्यांवर कोणत्याही प्रकारचा डाग असल्यास, तुम्ही टिश्यू पेपरची मदत घ्यावी. टिश्यू पेपरच्या सहाय्याने तुम्ही हा डाग काढण्याचा प्रयत्न करावा. खाण्या पिण्याचे डाग काढण्यासाठी बऱ्याचदा काही जण कपडे खसाखसा चोळतात. पण लोकरीच्या कपड्यांच्या बाबतीत असं करू नये. 

अशाप्रकारचे कपडे घातल्यास दिसणार नाही तुमचं #tummyfat

माईल्ड सर्फमध्ये कपडे भिजवा

Shutterstock

 

उन्हात कपडे ठेवल्यानंतर दोन दिवसांनी कपडे धुण्यासाठी तुम्ही माईल्ड सर्फ अथवा लोकरीच्या कपड्यांसाठी असलेल्या खास साबणाच्या चुऱ्यात तुम्ही हे भिजवून ठेवा. कपडे लिक्विड सोपमध्येच भिजवा आणि महत्त्वाचं म्हणजे गरम पाणी वापरू नका. कपडे भिजवण्यासाठी तुम्ही गार पाण्याचा वापरच करा अथवा लोकरीचे कपडे खराब होऊन त्यातील लोकर बाहेर येते. 

ADVERTISEMENT

हलक्या हातांनी धुवा कपडे

 

स्वेटर धुताना नेहमी हलक्या हाताने धुवा. वॉशिंग मशीनमध्ये स्वेटर अथवा शाल धुतल्यास, कपड्यांची चमक निघून  जाते. तसंच कपड्यांचे दोरेही बाहेर निघतात. त्यामुळे वॉशिंग मशीनमध्ये हे कपडे धुवायला टाकू नयेत. तसंच हाताना धूत असतानाही याची योग्य काळजी घ्यावी. कपडे जास्त चोळून धुवू नयेत. 

पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

धुतल्यानंतर अति उन्हात सुकवू नका

Shutterstock

 

लोकरीचे कपडे अर्थात स्वेटर शाल हे धुतल्यानंतर तुम्ही कडक उन्हामध्ये सुकवू नका. स्वेटर धुतल्यानंतर अगदी हलक्या हाताने त्यातील पाणी काढून घ्या आणि सौम्य उन्हामध्ये सुकू द्या. अथवा हवेवर सुकवा. अति उन्हात सुकवल्यास,  कपडे खराब होतात आणि अति ताठ होतात. त्यामुळे घातल्यानंतर अंगावर टोचतात. त्यामुळे ही काळजी नक्की घ्या. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे चुकूनही लोकरीचे कपडे वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये घालू नका. यामुळे तुमच्या कपड्यांचे दोर सुटून हे कपडे खराब होण्याची शक्यता असते. लोकरीचे कपडे हे अत्यंत नाजूक असतात आणि त्याची हाताळणीदेखील नाजूक पद्धतीनेच करावी लागते. त्यामुळे कपडे धुताना आणि सुकवतानाही या कपड्यांची काळजी घ्यावी लागते. 

ADVERTISEMENT

कपाटात कपडे कसेही कोंबण्यापेक्षा असे करा तुमचे कपाट ऑरगनाईज

कपड्यावरील डाग कसे काढावे, जाणून घ्या सोपे उपाय

25 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT