वार्धक्याची ओळख म्हणजे नुसते केस पांढरे होणे नाही. तर तुमच्यामध्ये अनेक बदल होत असतात. साधारण पंचवीशीनंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याकडे लक्ष दिले नाही तर तुमची त्वचा सैल पडू लागते. यासोबतच तुमच्या ओठांच्या आजुबाजूला सुरकुत्या दिसू लागतात. ओठांचा चंबू केल्यानंतर जर तुमच्या ओठांवर सुरकुत्या पडलेल्या दिसत असतील तर आजपासूनच तुम्ही ओठांचा व्यायाम करायला घ्या. अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हा व्यायाम तुम्हाला घरच्या घरी करता येऊ शकतो. आज आपण पाहुया ओठांच्या सुरकुत्या कमी करणारे हे सोपे व्यायामप्रकार
पहिला प्रकार करायचा आहे तो म्हणजे ओठांचा चंबू. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पाऊट. सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाऊट करा. हा पाऊट करताना तुम्ही तशाच अवस्थेत काही सेकंद तरी तसेच राहा. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 10 सेकंद मनात म्हणून किमान 5 ते 6 वेळा ओठांचा चंबू करत राहा. यामुळे ओठांच्या कडा आकुंचन पावतील.
आता हनुमानासारखे तोंड कसे करायचे तुम्हाला माहीत असेलच. ओठांचा चंबू केल्यानंतर तुम्हाला हनुमानसारखे तोंड फुगवायचे आहे. वर केलेल्या व्यायामप्रकारानुसारच तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे. म्हणजे किमान 10 आकडे मनात म्हणे पर्यंत या व्यायामाच्या अवस्थेत राहायचे आहे. यामुळे तुमच्या ओठांच्या आजुबाजूला सैल पडलेली त्वचा ताणली जाईल.
आता या व्यायामासाठी तुम्हाला जीभेचा उपयोग होणार आहे. तोंड घट्ट मिटून तुम्हाला आतल्या बाजूने ओठांवर जीभ फिरवायची आहे. असे करताना तुम्हाला तोंड उघडू द्यायचे नाही. ओठांच्या वरील भाग आणि खाली दोन्हीकडे तुम्हाला गोलाकार जीभ फिरवायची आहे. तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही हा व्यायाम करु शकता.
आता हा व्यायाम तुम्हाला घरीच करावा लागेल. कारण आपण यामध्ये ओठांच्या कडांकडे बोटं घालणार आहोत. तर्जनी घेऊन तुम्हाला ओठांच्या आत फिरवायची आहे. थोडक्यात तुम्हाला ओठ फाकवायचे आहेत. असे केल्यामुळे तुमच्या ओठांच्या कडांवर ताण पडतो. त्यामुळे तेथील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.
आता सगळ्यात सोपा आणि तुम्हाला आवडेल असा व्यायामप्रकार म्हणजे ओठांचा मसाज तुम्हाला शक्य असेल तेव्हा कोणतेही क्रिम न घेता ओठांचा मसाज करा. हा मसाज करण्यासाठी अंगठा आणि तर्जनीचा उपयोग करा. तुम्ही फेशिअल करायला जाता त्यावेळी तुम्हाला अशाच पद्धतीचा मसाज केला जातो.
आता जर तुम्हाला तुमच्या ओठांवर सुरकुत्या दिसत असतील किंवा तुम्हाला सुरकुत्या आल्या नसतील तरी देखील तुम्ह हे व्यायामप्रकार नक्की करा. तुमच्या ओठांचा भाग कधीच सुरकुतलेला दिसणार नाही.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/