ADVERTISEMENT
home / आरोग्य
गरोदरपणातही करा ही सोपी योगासने

गरोदरपणातही करा ही सोपी योगासने

आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सुखद काळ असतो. या काळात तुमचं मन अनेक गोड भाव-भावनांनी भरलेलं असतं. मात्र हा काळ वाटतो तितका सहज सोपा नक्कीच नसतो. कारण गरोदरपणात प्रत्येक स्त्रीला शारीरिक आणि माननिक बदलांमधून प्रवास करावा लागतो. तिच्या शरीरात गरोदरपणाच्या नऊ महिन्यात सतत नवनवीन बदल होत असतात. ज्याचा परिणाम तिच्या मानसिक स्थितीवरदेखील होत असतो. कधी तिचा मूड चांगला असतो तर कधी ती अचानक अस्वस्थ होते. तिच्या मनात सतत प्रश्न आणि संभ्रम निर्माण होतात. या क्षणी बाळ काय करत असेल? बाळाची योग्य वाढ आणि पोषण होत आहे का? काय खावं आणि काय खाणं टाळावं? ती चांगली आई होईल का? आई होण्याचं हे नक्की योग्य वय आहे का? असे अनेक प्रश्न तिला सतावत असतात. ज्यामुळे तिचं मन नहमी अस्वस्थ आणि गोंधळातच असतं. म्हणूनच अशावेळी मन आणि शरीर या दोघांना जास्तीत जास्त  शांत आणि निवांत ठेवण्याची गरज असते. जर तुम्ही पहिल्यांदाच आई होणार असाल तर या सर्व गोष्टी तुम्ही नक्कीच अनुभवाल. मात्र असं असेल तर मुळीच काळजी करू नका. कारण या काळातही तुम्हाला तुमचं मन आणि शरीरा निवांत ठेवण्यासाठी अनेक उपाय करता येतील. व्यायामामुळे मन आणि शरीराचे आरोग्य राखण्यास मदत होते. वास्तविक गरोदरपणात कठीण व्यायाम करण्यास मनाई केली जाते. मात्र तुमचं मन शांत आणि शरीरा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही हे हलके फुलकी योगासने नक्कीच करू शकता. ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि शारीरिक हालचालदेखील होईल. 

गरोदरपणात तीन तिमाहीचा टप्पा तुम्हाला ओलांडावा लागतो. पहिल्या तीन महिन्यांच्या काळाला पहिली तिमाही, चौथ्या महिन्यापासून सहाव्या महिन्याच्या काळाला दुसरी तिमाही आणि सातव्या, आठव्या आणि नवव्या महिन्याच्या काळाला तिसरी तिमाही असं म्हणतात. या प्रत्येक तिमाहीमध्ये बाळाची निरनिराळ्या पद्धतीने वाढ आणि विकास होत असतो. पहिल्या तिमाहीमध्ये आणि शेवटच्या तिमाहीमध्ये जासस्त काळजी घेण्याची गरज असते. म्हणूनच या तीन प्रकारच्या तिमाहीमध्ये तुम्हाला शरीराला निरनिराळ्या प्रकारची योगासने करण्याची  गरज असते. 

विशेष सूचना –

योगासनांमधील अगदी साध्या आणि सोप्या आसनांमुळे तुम्हाला गरोदरपणात फायदा होऊ शकतो. मात्र त्यासाठी तुम्ही आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाची शरीरप्रकृती आणि गरोदरपणातील समस्या निरनिराळ्या असतात. 

ADVERTISEMENT

काही महत्त्वाच्या सूचना –

व्यायामासाठी नेहमी घरातील मोकळी आणि हवेशीर जागा निवडा. विशेषतः एखादी बाल्कनी, बाग, टेरेस यासाठी उत्तम ठरेल. घरात व्यायाम करायचा असेल तर खिडक्या उघड्या ठेवा आणि आजूबाजूला ताजी फुलं असतील याची काळजी घ्या. ज्यामुळे वातावरण ताजे आणि प्रफुल्लित राहील. योगासने करण्यासाठी योगामॅट, सतरंजीचा वापर करा. जवळ पाण्याची बाटली ठेवा. घाम स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ टॉवेल व्यायामाला बसण्याआधीच जवळ ठेवा. तुम्हाला आवडणारं एखादं मंद संगीत लावा. व्यायाम करण्याआधी दहा ते पंधरा वेळा संथ श्वास ध्या आणि सोडा. ज्यामुळे तुम्हाला आरामदायक वाटेल. 

Shutterstock

ADVERTISEMENT

पहिली तिमाही (क्रॉस लेग चेस्ट लिफ्ट)

पहिल्या तिमाहीत हा व्यायामाचा प्रकार तुम्ही नक्कीच करू शकता. ज्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारेल आणि पाठीचा ताण कमी होईल.

काय कराल –

योगामॅटवर शांतपणे बसा. मांडी घाला. हात जोडा आणि छातीला समांतर वरच्या दिशेने वर उचला. अशा पद्धतीने खाली नेत पुन्हा वरच्या दिशेने लिफ्ट करा. शांत पणे श्वास घ्या आणि पुन्हा संथपणे श्वास बाहेर टाका. अशी कमीत कमी चार ते पाच आवर्तने करा. जास्त ताण न घेता हे आसन करा. 

दुसरी तिमाही ( कटी चक्रासन)

या योगासनामुळे तुमच्या कंबरेकडील भागाला व्यायाम मिळू शकतो. शिवाय कंबर आणि मांड्यांचा ताणदेखील कमी होईल. तुम्हाला हलके आणि प्रसन्न वाटू लागेल.

ADVERTISEMENT

काय कराल – 

योगामॅटवर उभे राहा. दोन पायात थोडे अंतर ठेवा. श्वास घेत हात छातीपर्यंत वर उचला. श्वास सोडत तुमचे शरीर डाव्या बाजूने लिफ्ट करा. शरीर डावीकडे लिफ्ट करताना डाव्या खांद्याकडे पाहा आणि उजवा हात डाव्या खांद्यावर आणि डावा हात पाठीच्या दिशेने ठेवा. दोन सेकंदासाठटी श्वास रोखून धरा. श्वास सोडून द्या. व्यायाम करताना पाय जमिनीवर नीट ठेवा ज्यामुळे तुमचा तोल जाणार नाही. दुसऱ्या बाजूने हे आसन रिपीट करा. शरीराला जास्त ताण न देता हा व्यायाम करा. 

तिसरी तिमाही ( वीरभद्रासन)

हे आसन तुमच्या शरीराला मजबूत आणि रिलॅक्स करेल. या व्यायामामुळे पाय, हात, खांद्यांना चांगला व्यायाम मिळेल. 

काय कराल –

ADVERTISEMENT

ताठ उभे राहा श्वास घेताना तोल सांभाळण्याचा प्रयत्न करा. तुमचा उजवा पाय उचलून पुढच्या दिशेने ठेवा. डावा आतल्या दिशेने थोडासा झुकवा. हात जमिनीच्या दिशेने समांतर ठेवा. तळवे जमिनीच्या दिशेने असू द्या. श्वास घ्या डोकं उजव्या बाजूने वळवा. उजव्या गुडघ्यावर शक्य असेल तितका ताण द्या. श्वास सोडा आणि पुन्हा शरीराची स्थिती पूर्ववत करा. दुसऱ्या बाजूने पुन्हा हिच स्थिती रिपीट करा.

फोटोसौजन्य – इंन्स्टाग्राम

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

रोज दोन अंडी खाण्याचे फायदे वाचाल तर आजपासूनच अंड्याचे सेवन कराल सुरु

गरोदरपणात म्हणून वापरायला हवेत ‘प्रेग्नंसी गाऊन’

गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते हे जाणून घेण्यासाठी ही माहिती वाचा

ADVERTISEMENT
12 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT