पोट आणि मांडीवरील चरबी कमी घटवण्यासाठी करा 'ही' योगासने

पोट आणि मांडीवरील चरबी कमी घटवण्यासाठी करा 'ही' योगासने

व्यस्त जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांना शारीरिक व्यायाम-श्रम करणं शक्य नसतं. यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागल्या आहेत. शरीरात अतिरक्त चरबी तयार होणे ही देखील त्यापैकीच एक समस्या आहे. असंतुलित वजन केवळ सौंदर्यच्या दृष्टीनंच नाही तर आरोग्याच्या बाबतीतही नुकसानकारक आहे. पण तुम्ही नियमित योगासनांचा अभ्यास केल्यास शरीर फिट राहण्यास मदत होईल. तास-न्-तास एकाच जागी बसून काम करणे, न चालणे, अयोग्य वेळी खाणे इत्यादी सवयींमुळे पोट आणि मांडीवरीस चरबी वाढू लागते. शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी नियमित योगासनांचा अभ्यास करावा. 

(वाचा : पाठ दुखीतून सुटका मिळवण्यासाठी करा ही दहा योगासने)

नौकासन

नौकासनामुळे कंबर आणि पोटाचे स्नायू बळकट होतात. शिवाय, कंबर-मांडीवरील चरबी देखील कमी होते. हात आणि पायांचंही आरोग्य सुधारतं. हर्नियाचा आजार असणाऱ्यांसाठी नौकासन लाभदायक आहे.

नौकासनाची स्थिती :

- पाठीच्या बाजूनं योग मॅटवर झोपावे. दोन्ही पायांमध्ये अंतर न ठेवता एकमेकांजवळ ठेवावेत. दोन्ही हात शरीराजवळ असावेत.

- श्वासोच्छवास सुरू ठेवत पाय आणि डोके वर उचलावेत आणि दोन्ही गुडघ्यांसमोर समांतर रेषेत ठेवावेत.

- तुमची नजर हातापायांच्या बोटांच्या रेषेत समांतर अशी असावी.

- आपल्या क्षमतेनुसार नौकासनाच्या अंतिम स्थितीत राहावे.

सूचना :

- दमा, तीव्र डोकेदुखी, कमी रक्तदाब, मायग्रेन किंवा तीव्र पाठदुखी असल्यास आसन करू नये.

- गर्भवती महिलांना नौकासन करणे टाळावे.

(वाचा : चंचल मन एकाग्र ठेवण्यासाठी करा ‘या’ 5 योगासनांचा सराव)

Instagram

उष्ट्रासन

निमयित उष्ट्रासन केल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासह चिंता दूर होण्यासाठी मदत होऊ शकते. हे आसन स्नायूंना आराम मिळवून देण्याचं काम करतं. सोबतच मेंदूचं आरोग्य सुधारतं, ज्यामुळे तणावासारख्या मानसिक समस्या कमी होतात.

उष्ट्रासनाची स्थिती :

- योग मॅट किंवा एखाद्या कापडावर गुडघ्यांवर उभे राहावे. दोन्ही पायांमध्ये कमीत कमी 1 फूट अंतर ठेवावे. यानंतर दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवावे. हळूहळू श्वास घेत मागील बाजूस झुकावे आणि आपलं डोकंही मागील बाजूस घेऊन जावं.

- दोन्ही हात मागील बाजूस न्या आणि पायांच्या टाचा पकडा.

- शरीराचा संपूर्ण समान भार दोन्ही हातांसह मांड्यांवर असावा.

- काही सेकंद उष्ट्रासनाच्या अंतिम स्थिती राहून थोड्या वेळानं हळूहळू श्वास घत आसनातून बाहेर यावं.

सूचना :

- मानेला गंभीर दुखापत झाल्यास, किंवा गंभीर वेदना होत असल्यास आसन करणं टाळावं.

- रक्तदाब पीडित रुग्णांनी हे आसन करू नये.

(वाचा : चिंतामुक्त होण्यासाठी करा ही पाच योगासने)

Instagram

भुजंगासन

पोट आणि मांडीवरील चरबी कमी करण्यासाठी भुजंगासन करावे. भुजंगासनामुळे शारीरिक तणाव दूर होतो. तणाव कमी झाल्यानं कंबर आणि पाठ दुखीतून आराम मिळतो. वजन वाढल्यानंही पाठ दुखीची समस्या निर्माण होऊ शकते. पोटावरील चरबी घटवण्यासाठी भुजंगासन लाभदायक आहे.

भुजंगासनाची स्थिती :

- योग मॅटवर पोटावर झोपावे.

- दोन्ही पाय सरळ ठेवावेत. पायांमध्ये किंचितसे अंतर असावं.

- आता दोन्ही हात खांद्यांजवळ आणावेत

- श्वास घेत कपाळ, नाक आणि हनुवटीनं जमिनीला स्पर्श करत वरील दिशेनं उचलावे आणि आकाशाकडे पाहावे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करून प्राणधारणा करावी.

- श्वासोच्छवास सुरू ठेवत पूर्वास्थितीत यावे.

सूचना :

- भुजंगासनमध्ये जेवढे शक्य आहे तेवढेच शरीर वर उचलावे. नियमित सरावानं तुम्हाला अंतिम स्थिती धारण करणं शक्य होईल

- सुरुवातीस स्नायूदुखी होण्याची शक्यता

- हर्निया आणि अल्सरचा त्रास असणाऱ्यांनी भुजंगासन करू नये.

- गर्भवती महिला, तीव्र गुडघे दुखीचा त्रास असणाऱ्यांनी आसन करू नये.

Instagram

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.