सेक्सची समस्या दूर करण्यासाठी मदत होईल योगाची

सेक्सची समस्या दूर करण्यासाठी मदत होईल योगाची

योगा आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे याबाबत कोणतीच शंका नाही. योग्य पद्धतीने योगा केल्यास त्याचे कोणतेही साईड ईफेक्ट्स होत नाहीत आणि तुम्ही फिट व निरोगी राहण्यासही मदत होते. पण तुम्हाला माहीत आहे का की, यौन क्षमता वाढवण्यातही योगाची मदत होते. तसंच योगा हा काही सेक्स समस्या दूर करण्यासाठीही उपयोगी आहे. जर तुम्हाला योगा आणि यौनक्षमता याबाबत जाणून घ्यायचं असल्यास वाचा हा लेख.

योगा आणि यौन इच्छा

लेखक विलियम ब्रॉड यांचं पुस्तक 'द सायन्स ऑफ योगा' नुसार योगाच्या अभ्यासाने आपल्या यौन इच्छा आणि सेक्शुअल डिझायरवरही प्रभाव पडतो. कारण योगा हा आपल्या पेल्व्हीक भागातीला रक्तप्रवाह वाढवतो. योगा तुमच्या शरीराला उर्जैचं मॅनेजमेंट शिकवतो. या उर्जेचा उपयोग तुम्हाला सेक्स करताना होऊ शकतो. 

नियमितपणे योगा करण्याची आवश्यकता

काही दिवस योगा केला आणि तुमची सेक्शुअल पॉवर वाढली असं होत नाही. तुम्ही जितका जास्त योगा कराल तेवढं तुम्ही तुमच्या शरीराला ओळखू शकाल. काही अभ्यासातून हेही समोर आलं आहे की, योगामध्ये अशी अनेक योगासने आहेत जी नियमितपणे केल्याने संपूर्ण सेक्स फंक्शन सुधारता येतं आणि सेक्शुअल डिझायर म्हणजेच कामेच्छासुद्धा वाढते.

इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्याही योग करतो दूर

योगा केल्याने स्ट्रेस आणि चिडचिड कमी होते आणि पुरूषांमधील प्रॉस्टेट हेल्थसाठीही फायदेशीर आहे. अनेक संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, नियमितपणे योगा करणाऱ्या पुरूषांच्या स्पर्म्सची क्वालिटी चांगली असते. ज्यामुळे आपोआपच इरेक्टाइल डिस्फंक्शनच्या समस्येपासून सुटका मिळते आणि सेक्शुअल एनर्जीही वाढते. एकूणच योगाचे फायदे पाहिल्यास इंफर्टिलिटी समस्येला दूर करता येतं.

या समस्या दूर करण्यासाठी प्रामुख्याने ही चार योगासनं उपयुक्त असल्याचं आढळलं आहे.

बटरफ्लाय पोज किंवा बद्धकोनासन 

%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8
दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये मोडून पायांचे तळवे जुळवावेत. हातांची बोट एकमेकांत गुंफून पायांची बोटे खालील बाजूने पकडावीत. यानंतर फुलपाखराप्रमाणे पाय वर-खाली करावेत. आपल्या क्षमतेनुसार बद्धकोनासन करावे. या आसनामुळे पेल्व्हिक आणि ग्रोईनच्या भागात फ्लेक्सिबिलिटी येते. या आसनाने सेक्स ऑर्गन्समध्ये एनर्जी चॅनलाईज होते आणि सेक्स करण्याची इच्छा वाढते. 

माउंटन क्लाइंबर पोज

हे योगासन केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि हिप व इनर थाईज म्हणझेच जांघांमधील अंतर्गत भागातील पेशी स्ट्रेच होतात. ज्यामुळे सेक्स करण्याची क्षमता वाढते.  परिणामी तुमची सेक्सलाईफ चांगली होते. 

कोब्रा पोज किंवा भुजंगासन

%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8

दोन्ही पाय सरळ ठेवावेत. पायांमध्ये किंचितसं अंतर असावं. आता दोन्ही हात खांद्यांजवळ आणावेत. श्वास घेत कपाळ, नाक आणि हनुवटीनं जमिनीला स्पर्श करत वरील दिशेनं उचलावे आणि आकाशाकडे पाहावे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करून प्राणधारणा करावी. श्वासोच्छवास सुरू ठेवत पूर्वस्थितीत यावे. हे आसन दिवसातून 10 वेळा केल्यास पोटाच्या खालील भागाची चरबी लवकर कमी होते. एवढंच नाहीतर या आसनाने सेक्शुअल एनर्जीही  स्टिम्युलेट होते व सेक्स करण्याचा उत्साहही वाढतो. 

ब्रिज पोज किंवा सेतूबंधासन

%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8
जर तुम्हाला कमरेशी निगडीत एखादी समस्या असेल तर सेतूबंधासन हा एकदम योग्य पर्याय आहे. तसंच पोटावरील एक्स्ट्रा चरबीही आरामात कमी होते या आसनामुळे. या आसनामुळे तुमच्या पाठीच्या कण्याचं हाडं मजबूत आणि सरळ होतं. ज्यामुळे तुम्हाला सेक्सदरम्यान कमी वेदना होतात आणि सेक्शुअल एक्टीव्हीटीसुद्धा तुम्ही मोकळेपणाने एन्जॉय करू शकता.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.